Chandra Grahan 2023: या दिवशी होणार वर्षातील पहिले चंद्रग्रहण, या 5 राशींवर दिसणार चंद्रग्रहणाचा मोठा प्रभाव

भविष्यात काय
Updated Mar 31, 2023 | 15:38 IST | टाइम्स नाऊ मराठी

Chandra Grahan: चंद्र आपल्यासाठी अनुकूल किंवा प्रतिकूल असेल, हे चंद्रग्रहणाच्या स्थितीवर देखील बरंच अवलंबून असतं. या वर्षातलं पहिलं चंद्रग्रहण  5 मे 2023 रोजी होणार असून ते दुपारी 1.34 मिनिटांनी लागणार आहे आणि त्याचा थेट परिणाम 5 राशींवर होणार आहे.

Chandra Grahan 2023 first lunar eclipse of year will have a big impact on these 5 zodiac signs
Chandra Grahan 2023: या दिवशी होणार वर्षातील पहिले चंद्रग्रह  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • या वर्षातलं पहिलं चंद्रग्रहण कधी होणार?
  • कोणत्या राशींवर होईल परिणाम ? 
  • चंद्रग्रहणाच्या स्थितीवर बरंच अवलंबून असतं.

Chandra Grahan 2023: वैदिक शास्त्रांमध्ये चंद्राचा आणि मनुष्याचा थेट संबंध सांगितला आहे. असं म्हणतात की चंद्राच्या अनुकूलतेमुळे व्यक्तीचा स्वभाव शांत आणि सर्जनशील बनतो. तर प्रतिकूलतेमुळे माणसाचं जीवन विस्कळीत व्हायला वेळ लागत नाही. चंद्र आपल्यासाठी अनुकूल किंवा प्रतिकूल असेल, हे चंद्रग्रहणाच्या स्थितीवर देखील बरंच अवलंबून असतं. या वर्षातलं पहिलं चंद्रग्रहण  5 मे 2023 रोजी होणार असून ते दुपारी 1.34 मिनिटांनी लागणार आहे आणि त्याचा थेट परिणाम 5 राशींवर होणार आहे. (Chandra Grahan 2023 first lunar eclipse of year will have a big impact on these 5 zodiac signs)

कोणत्या राशींवर होईल परिणाम ? 

कर्क 
या राशीच्या लोकांना काही आरोग्याशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागू शकतो. तुम्ही मानसिकदृष्ट्याही तणावात राहाल. कुटुंबात कलह होऊ शकतो. तुम्ही भगवान शंकराची पूजा करून स्वतःला सृजनात्मक कार्यात व्यस्त ठेवल्यास चांगले परिणाम दिसून येतील.

अधिक वाचा: व्रत संपल्यानंतर कलशात ठेवलेल्या नारळाचे काय करायचे? माहित नसेल तर इथे वाचा

वृषभ 
या राशीच्या लोकांचे भावंडांशी मतभेद होऊ शकतात. वडिलोपार्जित संपत्तीबाबत मतभेद वाढू शकतात. इच्छा नसतानाही बाह्य चिंता तुम्हाला घेरतील. या ग्रहणादरम्यान शांती मिळविण्यासाठी आपल्या कुटुंबासोबत अधिक वेळ घालवा. मानसिक शांतीसाठी तुम्ही मंदिरातही जाऊ शकता. 

कन्या 
नोकरीमध्ये तुम्ही स्वतःला झोकून द्याल पण यामुळे तुमच्या आरोग्यावर परिणाम होईल. तुम्हाला आरोग्याशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. तुमच्या सतत व्यस्त राहण्याने नातेवाईकांमधील तुमचे अंतर वाढू शकते. 

अधिक वाचा: Daily Horoscope 31 March 2023 : कसा असेल 2022-23 या आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस? जाणून घ्या शुक्रवार 31 मार्च 2023 चे राशीभविष्य

मेष 
अति घाईघाईने घेतलेल्या निर्णयामुळे तुम्हाला आर्थिक नुकसान सहन करावे लागू शकते. तुमचे दिलेले पैसे बुडू शकतात. कायदेशीर वादातही अडकण्याची शक्यता आहे. जीवनात हुशारीने निर्णय घ्या. मानसिक शांततेसाठी उपाय करा. 

सिंह 
या राशीच्या लोकांसाठी अशुभ माहिती घेऊन येईल. सध्या तुम्ही कोणतेही नवीन काम हाती घेऊ नये अन्यथा नुकसान होऊ शकते. कुटुंबासोबत काही अनुचित प्रकार घडण्याचा धोका आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी