Sun Transit 2022: सूर्याच्या उष्णतेच्या या राशींना बसणार झळा! जाणून घ्या सूर्याच्या संक्रमणाचे राशीभविष्य

भविष्यात काय
Updated May 18, 2022 | 11:50 IST | टाइम्स नाऊ मराठी

Sun Transit in May 2022 । सूर्याने आता मेष राशी सोडून वृषभ राशीत प्रवेश केला आहे. पंचांगानुसार १५ मे २०२२ रोजी रविवारी पहाटे ५.४५ वाजता सूर्याने वृषभ राशीत प्रवेश केला होता, या राशीमध्ये सूर्यदेव १५ जून २०२२ पर्यंत राहणार आहेत.

Changes in the Sun sign will have a detrimental effect on these signs
सूर्याच्या उष्णतेच्या या राशींना बसणार झळा, वाचा सविस्तर   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • सूर्याने आता मेष राशी सोडून वृषभ राशीत प्रवेश केला आहे.
  • रविवारी पहाटे ५.४५ वाजता सूर्याने वृषभ राशीत प्रवेश केला होता.
  • मिथुन राशीच्या लोकांसाठी हा राशी बदल खूप शुभ आणि लाभदायक असेल.

Sun Transit in May 2022 । मुंबई : सूर्याने आता मेष राशी सोडून वृषभ राशीत प्रवेश केला आहे. पंचांगानुसार १५ मे २०२२ रोजी रविवारी पहाटे ५.४५ वाजता सूर्याने वृषभ राशीत प्रवेश केला होता, या राशीमध्ये सूर्यदेव १५ जून २०२२ पर्यंत राहणार आहेत. दरम्यान सूर्याच्या या संक्रमणाच्या झळा काही राशींना बसणार आहेत. चला तर म जाणून घेऊया या काळातील राशीभविष्य. (Changes in the Sun sign will have a detrimental effect on these signs). 

अधिक वाचा : काँग्रेस नेते मोबाईलमधे मश्गुल असतात - हार्दिक पटेल

१) मेष राशी (Aries) - मेष राशीमध्ये सूर्याचे राशी परिवर्तन होत आहे, जिथे बुध आणि राहू हे दोन ग्रह आधीच अस्तित्वात आहेत. अशा स्थितीत सूर्याच्या आगमनानंतर तुमच्या राशीमध्ये तीन ग्रहांचा योग आहे, या काळात तुम्हाला गोंधळापासून दूर राहावे लागेल. यासोबतच अहंकाराचा त्याग करावा लागेल. लक्षणीय बाब म्हणजे तुम्ही हे करू शकला नाही तर मोठे नुकसान होण्याची दाट शक्यता आहे. 

२) मिथुन राशी (Gemini) - मिथुन राशीच्या लोकांसाठी हा राशी बदल खूप शुभ आणि लाभदायक असेल. पालकांच्या सहकार्याने सर्व कामे पूर्ण होतील. कामाच्या ठिकाणी अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. वाहन खरेदीची शक्यता आहे. गुंतवणुकीत फायदा होईल. मन प्रसन्न राहील.

३) कर्क राशी (Cancer) - ठरवलेली सर्व कामे पूर्ण होतील. कार्यक्षमतेत वाढ होईल, ज्यामुळे कामाच्या ठिकाणी तुमची वेगळी ओळख निर्माण होईल. प्रेमसंबंधात यश मिळेल. नवीन आर्थिक स्रोत निर्माण होतील. उत्पन्न वाढेल.

४) कन्या राशी (Virgo) - वृषभ राशीत सूर्याच्या प्रवेशाने कन्या राशीच्या लोकांचे नशीब उजळेल. त्यांना नशिबाची पूर्ण साथ मिळेल. व्यवसायात लाभ होईल. आर्थिक आणि व्यावसायिक दृष्टीने केलेले प्रवास अत्यंत फलदायी ठरतील. नोकरी व्यवसायासाठी हा काळ चांगला राहील.

५) तूळ राशी (Libra) - तूळ राशीतील लोकांनी वादविवादापासून दूर राहिले पाहिजे. गोंधळ आणि तणावामुळे योग्य निर्णय घेणे कठीण होऊ शकते. या दरम्यान दुखापत होण्याची भीती राहील. सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. अनोळखी लोकांवर खूप लवकर विश्वास ठेवणे घातक आणि हानिकारक ठरू शकते. जोडीदाराचा सल्ला महत्त्वाच्या कामात उपयोगी पडेल. जास्त पैसे खर्च करू नका.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी