Numerology । मुंबई : मानवी जीवनात शास्त्रानुसार अंकशास्त्राला विशेष महत्त्व आहे. अंकशास्त्राद्वारे कोणत्याही व्यक्तीचा स्वभाव आणि जीवनाविषयी माहिती मिळू शकते. एखाद्या व्यक्तीचा जन्म ज्या तारखेला होतो त्याचा योग त्याचा मूलांक असतो. दरम्यान आज आपण अशाच एका मूलांकाबद्दल भाष्य करणार आहोत, ज्या तारखांना जन्मलेली मुले अतिशय हुशार आणि कुशाग्र बुद्धीची असतात. त्यांच्यावर बुद्धीची देवता म्हणजेच बुध ग्रहाची विशेष कृपा असते. आज आपण मूलांक ५ मधील लोकांबद्दल भाष्य करणार आहोत. (Children born on these 3 dates are very smart, Gain a lot of fame in life).
अधिक वाचा : घरात चुकूनही लावू नये सात घोड्यांचा असा फोटो
दरम्यान, ज्या लोकांची जन्मतारीख ५, १४ आणि २३ आहे त्यांचा मूलांक क्रमांक हा ५ असतो. या मूलांकातील लोक बुद्धीने खूप हुशार असतात. ते बुद्धी आणि ज्ञानाच्या जोरावर जीवनात कोणतीही गोष्ट मिळवू शकतात. लक्षणीय बाब म्हणजे ते समाजात त्यांची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी माहिर असतात. नेहमी काहीतरी मोठे काम करण्याचा ते विचार करत असतात. त्यांना कोणाच्याही दबावाखाली काम करणे आवडत नाही. अशा लोकांचा व्यवसायाकडे जास्त कल असतो. हे आव्हानात्मक कामे करायला बिल्कुल घाबरत नाहीत.
मूलांक ५ मधील लोकांनी एखादे काम करण्याचे ठरवले की ते त्या कामाला तडीस नेऊनच मोकळा श्वास घेतात. त्यांचे व्यक्तिमत्व खूप आकर्षित असते. त्यांच्यामध्ये निर्णय घेण्याची क्षमता चांगली असते. ते बोलण्यात खूप माहिर आहेत. त्यांच्या बोलण्याच्या पद्धतीने ते कोणाचेही मन जिंकतात. ते भविष्यातील घडामोडींचा अचूक अंदाज अगोदरच लावू शकतात. त्यांना पराभव बिल्कुल मान्य नाही.
मूलांक ५ असलेले लोक खूप जिद्दी आणि कष्टाळू असतात. ते त्यांच्या शब्दावर ठाम राहतात. त्यांची विनोदबुद्धी खूप चांगली आहे. ते स्वत: आनंदी असतात आणि इतरांनाही आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करतात. त्यांना प्रत्येक गोष्ट पद्धतशीरपणे करायला आवडते. ते अतिशय शिस्तप्रिय आहेत.