Daily Horoscope 02 Feb 2023 in Marathi: सिंह राशीला लाभेल प्रेम तर तुळ राशीला असेल चिंता; जाणून घ्या इतर राशींचे भविष्य

Daily Horoscope 02 Feb 2023 In Marathi : आज तूळ राशीच्या लोकांनी आर्थिक बाबतीत सावध राहण्याची गरज आहे. मेष राशीच्या लोकांना आज लाभ होताना दिसत आहे.

Daily Horoscope 02  February 2023
सिंह राशीला लाभेल प्रेम तर तुळ राशीला असेल चिंता  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • स्वतःवर आत्मविश्वास असेल आणि तुम्ही तुमची कार्य क्षमता मजबूत करण्यासाठी मोठा विचार कराल.
  • काय आहे आजचे राशीभविष्य
  • कौटुंबिक दृष्ट्या अचानक फळ देईल आजचा दिवस.

Daily Horoscope 02  February 2023 : कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस आणि कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ रंग काय आहे याची सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा. जाणून घ्या मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या 12 राशींसाठी कसा असेल आजचा दिवस? (Daily Horoscope 02  February 2023 आजचे राशीभविष्य मराठी)

अधिक वाचा  : लक्ष्मी मातेच्या नावावर ठेवा आपल्या मुलीचं नाव, घरात होईल धनवर्षा

मेष 

दिवसाच्या सुरुवातीला प्रेम जीवनाचा आनंद घ्याल आणि उत्पन्न देखील चांगले राहील. दुपारनंतर परिस्थिती बदलू शकते. तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबत चांगला वेळ घालवण्याची संधी मिळेल.

वृषभ

कार्य क्षेत्रात महत्वाचे निर्णय घ्याल .भाग्य स्थानातील रवि धर्म आणि सामाजिक जीवनात प्रतिष्ठा देईल. प्रकृतीची काळजी घ्या. तसेच प्रवास आणि कौटुंबिक दृष्ट्या चांगला काळ आहे.  आजचा शुभ रंग - निळा.

मिथुन 

घरगुती जीवन शांततेत जाईल, एकमेकांसोबत वेळ घालवायला आवडेल. प्रेम जीवनामध्ये असलेल्यांसाठी आजचा दिवस चांगला राहील, शुभ रंग : गुलाबी

अधिक वाचा  : ब्राऐवजी तुम्ही काय- काय परिधान करू शकता

कर्क  

या राशीतील  लोकांनी आज कोणत्याही प्रकारच्या प्रवासाला जाणे टाळावे. विवाहित लोकांचे जीवन सामान्य असेल, प्रेमाने भरलेले संवाद असतील आणि एकमेकांवर विश्वास असेल. आजचा शुभ रंग - लाल आणि पांढरा.

सिंह 

चंद्र भ्रमण लाभ स्थानातून होत आहे. घरामध्ये नवीन खरेदी होईल. जास्त काळ घरामध्ये घालवाल. कामाच्या ठिकाणी चढ-उतार येऊ शकतात. परिश्रम करत राहा आणि इतरांच्या कामात ढवळाढवळ करू नका. आजचा शुभ रंग - पांढरा.

कन्या 

राशीच्या लोकांचा आज स्वतःवर आत्मविश्वास असेल आणि तुम्ही तुमची कार्य क्षमता मजबूत करण्यासाठी मोठा विचार कराल. भाग्य स्थानातील चंद्र प्रकृती आणि कौटुंबिकदृष्ट्या अचानक फळ देईल. शनी शुक्र लाभ दायक आहे. आजचा शुभ रंग - निळा आणि हिरवा.

अधिक वाचा  : व्हॅलेंटाईन डेला पहिली डेट करत असाल विचारा थेट हे प्रश्न

तुळ 

राशीचे लोक आज दुपारपर्यंत एखाद्या गोष्टीबद्दल थोडेसे चिंतेत राहतील. दुपारनंतर परिस्थिती मजबूत होईल आणि आराम मिळेल. सामाजिक घटना घडतील. राशीतील केतू मानसिक ताण निर्माण करेल. आजचा शुभ रंग - पांढरा.

वृश्चिक 

कौटुंबिकदृष्ट्या अचानक फळ देईल. माणसं जोडणे आणि जपणे हिताचे हे लक्षात ठेवाल तर प्रगती कराल. आजसाठी  रंग - निळा आणि हिरवा शुभ असेल. 

अधिक वाचा  : वयाच्या तिशीनंतर ही तरुण दिसायचं आहे, मग करा हे काम

कुंभ 
 

कुंभ राशीच्या लोकांसाठी दिवस संपूर्णपणे अनुकूल असेल, त्यामुळे तुम्हाला तुमच्या कामात यश मिळेल. संतती आणि मित्र मंडळी सोबत मजेत दिवस जाईल.

धनु  

आर्थिक बाजू समाधानी असेल तर दिवस आनंदात जातो. परंतु आजचा दिवस मानसिक ताण निर्माण करतील. तृतीय रवि बंधू साठी अनुकूल आहे. प्रवास जपून करा .भवताल परिस्थितीचे भान ठेवा.  प्रेम जीवनामधील लोकांना आज आपल्या जोडीदाराला खूश करण्यासाठी खूप मेहनत करावी लागेल. आज या राशीसाठी पांढरा आणि जांभळा शुभ असेल. 

मकर

व्यवसाय वाढीसाठी केलेले प्रयत्न फलदायी ठरतील. प्रेम जीवनामध्ये रोमांस राहील. कुटुंबातील सदस्यांसोबतच्या नातेसंबंधात तुम्हाला मजबूती जाणवेल. यातील काही लोकांना राशी स्थानातील शनी शुक्र मानसिक ताण देतील .विरक्त वृत्तीचा अनुभव येईल. 

मीन

मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाईल.  मेहनत करत राहा. प्रेम जीवनात असलेल्यांसाठी आजचा दिवस चांगला राहील.  आजचा शुभ रंग पांढरा आणि पिवळा आहे. 


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी