Daily Horoscope 03 December:कोणत्या राशीला असेल धन लाभ; कोणाला असेल नोकरीचा योग, जाणून घ्या 3 डिसेंबरचे भविष्य

Today's Horoscope 03 December 2022: आजचा दिवस कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल याबाबत सविस्तर माहिती जाणून घ्या. पाहूयात मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या बारा राशींसाठी कसा असेल हा दिवस? 

daily horoscope 03 December rashi bhavishya
कसा असेल 03 डिसेंबरचा दिवस; कोणचं चमकेल नशीब, जाणून घ्या   |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
 • मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस विजयाचा असेल.
 • आजचा दिवस हा पैसा आणि करिअरच्या दृष्टीने लाभाच्या अनेक संधी घेऊन येणारा
 • मिथुन या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला जाणार आहे.

Today's Horoscope 03 December 2022:  शनिवार 3 डिसेंबरचा दिवस हा पैसा आणि करिअरच्या दृष्टीने लाभाच्या अनेक संधी घेऊन येणारा असेल. तर काहींना आजचा दिवस हा खर्च वाढणारा ठरणार आहे.(daily horoscope 03 December rashi bhavishya in marathi aajche rashi bhavishya )

 1. मेष- पैसा आणि करिअरच्या बाबतीत मेष राशीच्या लोकांसाठी दिवस शुभ राहणार आहे. आज तुम्ही थोडे अधिकचे प्रयत्न करून सर्व कामे पूर्ण करू शकाल.चंद्र आणि गुरी व्यय स्थानी आहे. तसेच कर्म स्थानी शनि असल्याने व्यवसायात लाभ मिळण्याची शक्यता आहे.आज तुमचं मन आध्यात्मकडे वळणार आहे. नोकरीत तुमची कामगिरी ही आनंददायी असेल. तर विद्यार्थ्यांना आजचा दिवसा आनंदाचा असेल. आज तुमचा शुभ रंग हा लाल आणि पांढरा असेल. 
 2.  वृषभ -आजचा दिवशी  चंद्र  गुरुसोबत अकराव्या स्थानी राहिल्याने दिवस शुभ असेल. आज काहीशा समस्या येतील त्यांना तोंड द्यावे लागेल. धार्मिक कामात तुम्ही व्यस्त असाल. या राशीतून सप्तम सूर्य शुभ असून दुसरा मंगळ संपत्ती प्रदान करेल. निळा आणि आकाशी रंग शुभ असतील.
 3. मिथुन- या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला जाणार आहे. चंद्र कर्मा स्थानात गुरू सोबत असल्याने संतती लाभ होईल. मकर राशीत शनीच्या संक्रमण होणार असल्याने नोकरीतील बदलाशी संबंधित कोणताही निर्णय काळजीपूर्वक घ्यावा.  आज तुमच्यासाठी पांढरा आणि निळा रंग शुभ असेल. 
 4. कर्क- आजच्या दिवशी नवव्या घरात चंद्र हा गुरूसोबत आहे. यामुळे विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस हा यशाचा आहे. व्यवसायात उत्साही आणि आनंदी राहाल. पिवळा आणि केशरी रंग तुमच्यासाठी शुभ असणार आहे. 
 5. सिंह-गुरु-चंद्राचे आठवे घरात असेल आणि सूर्याचे चतुर्थस्थान आज तुम्हाला प्रत्येक कामात यश देईल.  सध्या तुम्हाला धैर्य आणि संयमाने काम करावे लागेल. सध्या कोणतेही काम करण्याची घाई करू नका. आज तुमच्यासाठी पिवळा आणि नारंगी रंग हा शुभ असेल. 
 6.  कन्या-सप्तम घरातील चंद्र आणि गुरु संतती आणि वैवाहिक जीवनासाठी शुभ आहेत.नोकरीत प्रगतीमुळे आनंदी राहाल. कोणाकडे अडकलेले पैसे परत मिळतील. आर्थिक लाभ संभवतात.भगवान विष्णूची पूजा करत राहा. केशरी आणि लाल रंग तुमच्यासाठी शुभ असेल. 
 7. तूळ- आयटी आणि बँकिंगचे लोक यशस्वी होतील. व्यवसायातील प्रगतीबद्दल तुम्ही आनंदी राहाल. नोकरीतील कामगिरीवर समाधानी राहाल. आरोग्य सुखासाठी हनुमान बाहुकचा पाठ करा आज कर्क आणि सिंह राशीच्या मित्रांचे सहकार्य तुम्हाला आशावादी बनवेल. हिरवा व पिवळा रंग तुमच्यासाठी  शुभ असेल. 
 8. वृश्चिक- या राशीतून चंद्र पाचव्या आणि शनि तिसऱ्या स्थानातून जात आहेत. नोकरीत यश मिळेल. व्यापारी वर्गाच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे.  आज या तुमचा शुभ रंग हा हिरवा आणि आकाशी असेल.
 9. धनु- आज चंद्र चौथ्या घरात आहे आणि सूर्य या राशीतून बाराव्या घरात भ्रमण करत आहे. मुलांच्या बाबतीत चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. आज काही नवीन खर्च तुमच्या समोर येऊ शकतात. एवढेच नाही तर आज कोणी तुमच्यावर खोटे आरोप करू शकते. तुमच्यासाठी आजचा रंग हिरवा आणि केसरी शुभ असेल. 
 10. मकर - तृतीय घरात चंद्र आणि गुरू एकत्र आहेत. नोकरीशी संबंधित कामात लाभ मिळू शकतो.  वडिलांच्या आशीर्वादाचा लाभ होईल. आज तुम्हाला शैक्षणिक क्षेत्रात विशेष प्रगती मिळेल. ज्यामुळे तुम्हाला समाजात मान-सन्मान मिळेल.आज तुमच्यासाठी हिरवा आणि जांभळा रंग शुभ असेल.
 11. कुंभ- विद्यार्थ्यांना यश मिळेल, शिक्षणात यशासाठी कठोर परिश्रम करा आणि वडिलांचा आशीर्वाद घ्यावा. आज तुमचा खर्च जास्त असेल. त्यामुळे तुम्हाला कर्जही घ्यावे लागू शकते. जांभळा आणि पांढरा रंग तुमच्यासाठी शुभ असेल. 
 12.  मीन- मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस विजयाचा असेल. या राशीत चंद्र आणि गुरु मिळून गजकेसरी योग तयार करत आहेत. शुक्र शुभ आणि फलदायी आहे.आज या राशीतून अकरावा शनि आणि या राशीत थांबलेला गुरु धनाच्या आगमनास कारणीभूत ठरू शकतो. प्रेम जीवनात सुखद प्रवासाचे संकेत आहेत.लाल आणि केशरी रंग शुभ आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी