Daily Horoscope 1 December: डिसेंबर महिन्यातील पहिला दिवस 'या' राशींसाठी शुभ, अचानक धनलाभ होईल

Today's Horoscope 1 December 2022: आजचा दिवस कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल याबाबत सविस्तर माहिती जाणून घ्या. पाहूयात मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या बारा राशींसाठी कसा असेल हा दिवस?

Today's Horoscope
आजचे राशीभविष्य  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • पाहा आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असणार
  • जाणून घ्या 12 राशींसाठी आजचा दिवस कसा
  • तुमच्या राशीत आज काय लिहिलंय? वाचा

Daily Horoscope in Marathi; 1 December 2022 Rashi Bhavishya: आजचा दिवस कुठल्या राशीसाठी कसा असेल आणि कुठल्या राशीसाठी शुभ रंग काय असेल जाणून घेऊयात. (daily horoscope 1 december rashi bhavishya in marathi aajche rashi bhavishya)

  1. मेष राशी भविष्य / Aries Horoscope Today: मनात नकारात्मक विचार येतील. बोलताना विशेष काळजी घ्या. नोकरीची नवी संधी चालून येईल. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. मान-सन्मान वाढेल. कुटुंबात वाद होऊ शकतात. खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे. आजचा शुभ रंग - पिवळा.
  2. वृषभ राशी भविष्य / Tauras Horoscope Today: रागावर नियंत्रण ठेवा. मानसिक त्रास होऊ शकतो. कुटुंबातील सदस्यांचे चांगले सहकार्य मिळेल. नव्या नोकरीची संधी उपलब्ध होईल. व्यापारात वाढ होईल. आजचा शुभ रंग - पांढरा.
  3. मिथुन राशी भविष्य / Gemini Horoscope Today: आत्मविश्वास वाढेल. व्यवसायात अडचणींचा सामना करावा लागू शकतो. आजचा दिवस धावपळीचा असेल. अचानक धनलाभ होईल. एखाद्या मित्राच्या मदतीने नोकरीची संधी चालून येईल. आजचा शुभ रंग - लाल. 
  4. कर्क राशी भविष्य / Cancer Horoscope Today: रागावर नियंत्रण ठेवा. शैक्षणिक बाबतीत विद्यार्थ्यांना चांगले यश मिळेल. मित्रांचे चांगले सहकार्य मिळेल. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. आजचा शुभ रंग - नारंगी.
  5. सिंह राशी भविष्य / Leo Horoscope Today: नवी जबाबदारी तुमच्यावर सोपवली जाईल. संपत्ती खरेदी-विक्रीचा निर्णय घ्याल. अचानक पैशांची आवश्यकता जाणवेल. मित्र-परिवाराकडून चांगली मदत मिळेल. आजचा शुभ रंग - पांढरा.
  6. कन्या राशी भविष्य / Virgo Horoscope Today: कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. लवकरच घरात धार्मिक कार्य होईल. कामानिमित्त शहरातून बाहेर जावे लागेल. आरोग्याची काळजी घ्या. दीर्घकाळापासून अडकलेले पैसे मिळतील. जोडीदाराचे चांगले सहकार्य तुम्हाला मिळेल. आजचा शुभ रंग - नारंगी आणि निळा.
  7. तूळ राशी भविष्य / Libra Horoscope Today: ज्यांना नुकतीच नोकरी लागली आहे त्यांच्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. कामानिमित्त इतरत्र शिफ्ट होण्याची योजना बनवाल. उत्पन्नाचा नवा स्त्रोत उपलब्ध होईल. आजचा शुभ रंग - लाल.
  8. वृश्चिक राशी भविष्य / Scorpio Horoscope Today: संपत्तीचा सुरू असलेला वाद मिटेल. लवकरच तुमच्यासाठी आनंदाची बातमी मिळेल. आर्थिकस्थिती आणखी मजबूत होईल. आरोग्याची काळजी घ्या. आजचा शुभ रंग - हिरवा आणि निळा.
  9. धनु राशी भविष्य / Sagittarius Horoscope Today: बऱ्याच दिवसांनी मित्रांच्या भेटीगाठी होतील. बाहेर जेवणाची योजना कराल. आरोग्य सुदृढ राहील. वायफळ खर्च टाळा. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या कामाचं कौतुक होईल. लवकरच आनंदाची बातमी मिळेल. आजचा शुभ रंग - पिवळा आणि पांढरा. 
  10. मकर राशी भविष्य / Capricorn Horoscope Today: उत्पन्नाचा नवा स्त्रोत मिळेल. उत्पन्नात वाढ झाल्याने घरात आनंदाचे वातावरण असेल. लवकरच धार्मिक यात्रा करण्याचं नियोजन कराल. दागिने किंवा रत्न यांचा व्यवसाय करणाऱ्यांसाठी आजचा दिवस लाभदायक आहे. आजचा शुभ रंग - नारंगी.
  11. कुंभ राशी भविष्य / Aquarius Horoscope Today: कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. वायफळ खर्च टाळा. गुंतवणूक करण्याकडे लक्ष द्या. उत्पन्नात वाढ होईल. आजचा शुभ रंग - पिवळा.
  12. मीन राशी भविष्य / Pisces Horoscope Today: प्रवासाचा योग निर्माण होईल. नवी संपत्ती खरेदी करण्याचं नियोजन कराल. आरोग्याची काळजी घ्या. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. आजचा शुभ रंग - पांढरा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी