Horoscope 11 April 2021: राशी भविष्य ११ एप्रिल २०२१ कसा असेल रविवार?

Horoscope राशी भविष्य, ११ एप्रिल २०२१ : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या १२ राशींसाठी कसा असेल दिवस? जाणून घ्या या राशींचे डेली भविष्य...

Horoscope 11 April 2021
राशी भविष्य ११ एप्रिल २०२१ 

थोडं पण कामाचं

 • Horoscope 11 April 2021: राशी भविष्य ११ एप्रिल २०२१ कसा असेल रविवार?
 • कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस
 • काय आहे आपले भविष्य?

Daily Horoscope 11 April 2021 Rashi Bhavishya, राशी भविष्य ११ एप्रिल २०२१ : कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस आणि कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ रंग काय आहे या सर्वांची सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा. जाणून घ्या मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या 12 राशींसाठी कसा असेल दिवस?

 1. मेष राश‍ी भविष्य / Aries Horoscope Today: मानसिक अस्वस्थता जाणवेल. अधिक मेहनत करुन देखील हवं तसं यश प्राप्त होणार नाही. जोडीदारासोबत वाद होण्याची शक्यता आहे. आरोग्याची काळजी घ्या. शुभ रंग - पांढरा.
 2. वृषभ राश‍ी भविष्य / Tauras Horoscope Today: प्रत्येक कार्य तुम्ही आत्मविश्वासाने कराल आणि त्याचा परिणाम म्हणजे तुम्हाला यश प्राप्त होईल. मोठा आर्थिक लाभ होईल. विद्यार्थी अभ्यास करुन चांगलं प्रदर्शन करतील. वायफळ खर्च होण्याची शक्यता आहे. शुभ रंग - निळा.
 3. मिथुन राश‍ी भविष्य / Gemini Horoscope Today: नव्या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी दिवस चांगला आहे. मेहनतीच्या जोरावर कामात चांगलं यश प्राप्त कराल. मित्रांच्या भेटी होतील. शुभ रंग - हिरवा.
 4. कर्क राश‍ी भविष्य / Cancer Horoscope Today: धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. नकारात्मक व्यवहार तुमच्यासाठी चिंतेचे कारण बनेल. विविध कामांसाठी पैसे खर्च होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना चांगले यश प्राप्त होईल. शुभ रंग - पिवळा.
 5. सिंह राश‍ी भविष्य / Leo Horoscope Today: आत्मविश्वासाच्या जोरावर महत्वाच्या कामासंदर्भात त्वरित निर्णय घ्याल. वडिलधाऱ्यांची चांगली साथ मिळेल. रागावर नियंत्रण ठेवा. वाद-विवाद होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक आयुष्यात आनंदाचे वातावरण असेल. शुभ रंग - निळा.
 6. कन्या राश‍ी भविष्य / Virgo Horoscope Today: तुमच्या स्वार्थामुळे वाद होण्याची शक्यता आहे. दिवस मानसिक चिंतेत जाईल. अतिआत्मविश्वासामुळे नुकसान होण्याची शक्यता आहे. धार्मिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल. शुभ रंग - हिरवा.
 7. तूळ राश‍ी भविष्य /  Libra Horoscope Today: कौटुंबिक आयुष्यात आनंद, सुख प्राप्त होईल. व्यवसाय सुरू करण्यास चांगले वातावरण असेल. कामात बढती मिळण्याची शक्यता आहे. नशीब उजळणार आहे. व्यापाऱ्यांना व्यापारात लाभ होण्याची शक्यता आहे. शुभ रंग - केशरी.
 8. वृश्चिक राश‍ी भविष्य / Scorpio Horoscope Today: तुमचे सर्व कार्य चांगल्याप्रकारे पूर्ण होत आहेत. कौटुंबिक आयुष्यात आनंदाचे वातावरण असेल. वडिलधाऱ्या व्यक्तींचा आशीर्वाद मिळेल. बाहेरील खाद्य-पदार्थ खाणं टाळा. शुभ रंग - निळा. 
 9. धनु राश‍ी भविष्य / Sagittarius Horoscope Today: आरोग्याची काळजी घ्या. थकवा जाणवण्याची शक्यता आहे. प्रवास करणं टाळा. मुलांच्या भविष्या संदर्भात चिंतेचा प्रश्न निर्माण होईल. प्रतिस्पर्ध्यांसोबतचे वाद-विवाद टाळा. शुभ रंग - पांढरा. 
 10. मकर राश‍ी भविष्य / Capricorn Horoscope Today: नकारात्मक विचारांपासून दूर रहा. खाणं-पिण्यावर विशेष काळजी घ्या. व्यापारात भागीदारांसोबत वाद होण्याची शक्यता आहे. रागावर नियंत्रण ठेवा. सामाजिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल. शुभ रंग - निळा. 
 11. कुंभ राश‍ी भविष्य / Aquarius Horoscope Today: प्रवास, मनोरंजनाचा अनुभव तुम्हाला दिवसभर जाणवेल. नवी गाडी खरेदी करण्याचा विचार कराल. आत्मविश्वासाच्या जोरावर कार्यात यश प्राप्त कराल. शुभ रंग - पिवळा.
 12. मीन राश‍ी भविष्य / Pisces Horoscope Today: दैनंदिन कार्य कराल. घरात सुख-शांतीचं वातावरण असेल. वाद-विवाद होण्याची शक्यता आहे, बोलण्यावर ताबा ठेवा. व्यवसायात चांगले यश प्राप्त होईल. शुभ रंग - निळा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी