Daily Horoscope : या राशींसाठी प्रॉमिस डे राहील उत्तम; तर काहींसाठी असेल आर्थिक लाभाचा दिवस, जाणून आजचे राशीभविष्य

Rashibhavishya in Marathi :जाणून घ्या मेष, वृषभ, मिथुन, कर्क यासह कोणत्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस कसा राहील. जाणून घ्या सर्व राशींचे प्रेम भविष्य . (Daily Horoscope, 11 saturday 2023 Horoscope in Marathi)

Daily Horoscope, 11 February 2023 Horoscope in Marathi
Daily Horoscope : या राशींसाठी प्रॉमिस डे राहील उत्तम; तर काहींसाठी असेल आर्थिक लाभाचा दिवस  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
 • अनेकांच्या प्रेम जीवनात नवीन गोष्टी घडतील ज्यामुळे तुमचे मन प्रसन्न होईल.
 • काही राशींच्या वैवाहिक जीवनातही आनंद राहील.
 • जाणून घ्या कसा असेल शनिवार प्रेमी लोकांसाठी

Rashibhavishya in Marathi :जाणून घ्या मेष, वृषभ, मिथुन, कर्क यासह कोणत्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस कसा राहील. जाणून घ्या सर्व राशींचे प्रेम भविष्य . (Daily Horoscope, 11 saturday 2023 Horoscope in Marathi)

अधिक वाचा  :  लग्नासाठी पती-पत्नीच्या वयात किती अंतर असावे?

 1. मेष राश‍ी भविष्य / Aries Horoscope Today:   तुमच्या लव्ह लाईफसाठी आजचा दिवस खूप चांगला असणार आहे. कुठेतरी प्रवासाची योजना आखू शकता. आज, स्वत: ला रोखू नका आणि आपल्या प्रिय व्यक्तीसमोर आपल्या भावना उघडपणे व्यक्त करा. मित्रमैत्रिण, नातेवाईकांसोबत सलोख्याने वागा.  शुभ रंग : लाल
 2. वृषभ राश‍ी भविष्य / Tauras Horoscope Today: वाहन खरेदीचा विचार करत असाल तर आजचा दिवस आनंददायी आहे. तुमचे सुंदर प्रेम संबंध एक पाऊल पुढे टाकू शकतात. प्रेम जीवनात नवीन गोष्टी घडतील ज्यामुळे तुमचे मन प्रसन्न होईल. अविवाहित लोकांना त्यांचा जोडीदार मिळेल. शुभ रंग : हिरवा
 3. मिथुन राश‍ी भविष्य / Gemini Horoscope Today:  आज तुमचा जोडीदार त्यांच्या जुन्या आठवणी ताज्या करतील, ज्यामुळे मन प्रसन्न राहील. सहलीला गेलात तर बरे होईल. मैत्रीचे रुपांतर प्रेमात होऊ शकते. आरोग्यही उत्तम राहील. शुभ दिनमान असेल. प्रेमप्रकरणात स्नेह वाढेल. विवाह बद्दल इच्छित असणाऱ्याचे विवाह खात्रीशीर जुळतील. शुभ रंग : पांढरा
 4. कर्क राश‍ी भविष्य / Cancer Horoscope Today: मन प्रसन्न राहील. नवनवीन कल्पना सुचतील. दाम्पत्य जीवन सुखी राहील. विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणाची संधी मिळू शकते. आज प्रेम जोडपे एकमेकांकडे आकर्षित होतील. वैवाहिक जीवनातही आनंद राहील. खूप दिवसांनी तुम्ही एकमेकांसोबत चांगला वेळ घालवाल. शुभ रंग : लाल
 5.  सिंह राश‍ी भविष्य / Leo Horoscope Today:  या राशीसाठी आजचा दिवस हा रोमांटिक असेल.  लव्ह पार्टनर तुम्हाला काही चांगली बातमी देऊ शकतात.  मित्रमैत्रीणींसोबत आर्थिक व्यवहार काळजीपूर्वक करा.  शुभ रंग : हिरवा
 6. कन्या राश‍ी भविष्य / Virgo Horoscope Today: आजचा दिवस या राशींसाठी खूप महत्त्वाचा आहे. या राशीच्या लोकांनी  मनावरचा संयम कमी होऊ शकतो.  आज या राशीच्या लोकांचे जोडीदाराशी भांडण होऊ शकते. जर तुम्हाला तुमचं प्रेम वाढवायचे असेल नाते घट्ट करायचे असेल तर छोट्या-छोट्या भांडणांकडे लक्ष देऊ नका. शुभ रंग : जांभळा
 7. तूळ राश‍ी भविष्य / Libra Horoscope Today:  तूळ राशीचे लोक आज आपल्या जोडीदारासोबत चांगला वेळ घालवतील. नातं घट्ट करण्यासाठी मोकळेपणाने बोलाल. नोकरीत वरिष्ठांची मर्जी प्राप्त कराल. कार्यालयात नवीन कल्पना नक्की मांडा.  शुभ रंग : निळा
 8. वृश्चिक राश‍ी भविष्य / Scorpio Horoscope Today:  प्रेम जीवनात आनंदाचा वर्षाव होईल. तुमच्या प्रेमात आकर्षण वाढेल. आज या राशीचे लोक खूप रोमँटिक होऊ शकतात.  तसेच या राशीतील लोक हे व्यापारातील विस्ताराच्या दृष्टीने केलेल्या योजनात यशस्वी होतील.  कला क्षेत्रातील व्यक्तींना नवीन संधी व मानधनात वाढ होईल. शुभ रंग : निळा 
  अधिक वाचा  : मुलं मुलीला भेटल्यानंतर सर्वात आधी बघतात या गोष्टी
 9. धनु राश‍ी भविष्य / Sagittarius Horoscope Today: आज या राशीच्या लोकांना सावध राहावे लागेल. या राशीतील लोकांच्या प्रेम संबंधांबाबत बिघाडी होण्याची शक्यता आहे. जोडीदाराच्या किरकोळ चुकांकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करा. कुंटुंबातील वरिष्ठमंडळीच्या प्रकृतीकडे लक्ष द्या.  निर्धारित वेळेत काम पूर्ण होण्याची काळजी घ्या. रागावर नियंत्रण ठेवून वाटचाल करा.
 10. मकर राश‍ी भविष्य / Capricorn Horoscope Today: या राशीच्या लोकांना आजचा दिवस मस्त जाणार आहे. मित्रमैत्रिणी नातेवाईकाकडून मदत मिळेल. नोकरीत अतिरिक्त कामाची जबाबदारी मिळेल. प्रेमप्रकरणात यश लाभेल. संततीविषयी चिंता मिटेल. काहीच्या प्रेमाला कुटुंबियांकडून मान्यता मिळेल.  शुभ रंग : लाल
 11. कुंभ राश‍ी भविष्य / Aquarius Horoscope Today: विवाहितांसाठी आजचा दिवस चांगला आहे. नव्याने निर्माण झालेल्या प्रेमसंबंधात अडथळ्यांना सामोरे जावे लागेल.जोडीदारावर रागावणे टाळा, अन्यथा नाते बिघडू शकते. शत्रुपक्षाच्या कारवाया वाढण्याची शक्यता राहिल.कौटुंबिक पातळीवर काही समस्या उद्भभवतील. शुभ रंग : राखाडी
 12. मीन राश‍ी भविष्य / Pisces Horoscope Today:  या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा संमिश्र असेल. दिवसाची सुरुवात चांगली होईल, पण रात्री उशिरापर्यंत तुमच्या प्रेमप्रकरणात कटुता येऊ लागेल.  तर काहीच्या प्रेमसंबंधामध्ये त्यांच्या जोडीदाराबद्दल प्रेमभावना वाढेल.

अधिक वाचा  : जया किशोरीची Top 5 भजन, ज्यांना मिळालेत कोट्यवधीमध्ये व्ह्यूज

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी