Daily Horoscope 12 December: मेष, कर्क, वृश्चिक आणि मीन होणार मालामाल, जाणून घ्या तुमच्यासाठी आजचा दिवस कसा

Today's Horoscope 12 December 2022: आजचा दिवस कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल याबाबत सविस्तर माहिती जाणून घ्या. पाहूयात मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या बारा राशींसाठी कसा असेल हा दिवस?

Today's Horoscope
आजचे राशीभविष्य 
थोडं पण कामाचं
  • पाहा आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असणार
  • जाणून घ्या 12 राशींसाठी आजचा दिवस कसा
  • तुमच्या राशीत आज काय लिहिलंय? वाचा

Daily Horoscope in Marathi; 12 december 2022 Rashi Bhavishya: आजचा दिवस कुठल्या राशीसाठी कसा असेल आणि कुठल्या राशीसाठी शुभ रंग काय असेल जाणून घेऊयात. (daily horoscope 12 december rashi bhavishya in marathi aajche rashi bhavishya)

  1. मेष राशी भविष्य / Aries Horoscope Today: नोकरीच्या ठिकाणी प्रमोशन होण्याची शक्यता आहे. सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करण्यात येईल. आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ आहे. कुटुंबात लवकरच धार्मिक कार्य होईल. आजचा शुभ रंग - लाल.
  2. वृषभ राशी भविष्य / Tauras Horoscope Today: आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ आहे. सुख-समृद्धीत वाढ होईल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. गुंतवणूक करण्याकडे लक्ष द्याल. मनातील इच्छा पूर्ण होईल. कामाच्या ठिकाणी तोडा तणाव असण्याची शक्यता आहे. आजचा शुभ रंग - हिरवा.
  3. मिथुन राशी भविष्य / Gemini Horoscope Today: आजचा दिवस तुमच्यासाठी उत्तम आहे. नव्या वस्तूची खरेदी करण्याची योजना आखाल. आरोग्य सुदृढ राहील. नोकरीच्या ठिकाणी नवी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. आजचा शुभ रंग - पांढरा.
  4. कर्क राशी भविष्य / Cancer Horoscope Today: परदेशातून नोकरीची संधी मिळण्याची शक्यता आहे. सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. व्यवसायात चांगला नफा होईल. नोकरीत, व्यवसायात मित्रांची मदत होईल. अचानक धनलाभ होण्याचा योग आहे. आजचा शुभ रंग - राखाडी.
  5. सिंह राशी भविष्य / Leo Horoscope Today: आर्थिक स्थिती मजबूत होईल. घरातील ज्येष्ठांच्या तब्येतीची काळजी घ्या. धावपळीमुळे थकवा, डोकेदुखी, ताप या समस्या उद्भवण्याची शक्यता आहे. कुटुंबात लवकरच धार्मिक कार्य होईल. उत्पन्नाचा नवा स्त्रोत निर्माण करण्यासाठी प्रयत्न कराल. आजचा शुभ रंग - निळा आणि लाल.
  6. कन्या राशी भविष्य / Virgo Horoscope Today: आजचा दिवस तुमच्यासाठी सामान्य असेल. आरोग्याची काळजी घ्या. वाद-विवाद टाळा. वायफळ खर्च करू नका. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेत चांगले यश प्राप्त होईल. आजचा शुभ रंग - नारंगी.
  7. तूळ राशी भविष्य / Libra Horoscope Today: आज दिवसभरात एखादा मोठा खर्च होण्याची शक्यता आहे. कुटुंबात किरकोळ कारणावरुन वाद होण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती मजबूत होईल. एखाद्याकडून उधार घेतलेले पैसे पुन्हा परत कराल. आजचा शुभ रंग - पिवळा. 
  8. वृश्चिक राशी भविष्य / Scorpio Horoscope Today: मुलांना चांगल्या शाळेत, कॉलेजमध्ये किंवा कोर्ससाठी प्रवेश घेण्याची तुमची इच्छा पूर्ण होईल. नव्या कार्याची सुरुवात कराल. उत्पन्नात वाढ होईल. अचानक धनलाभ होण्याचा योग आहे. आजचा शुभ रंग - नारंगी आणि पांढरा.
  9. धनु राशी भविष्य / Sagittarius Horoscope Today: धार्मिकस्थळी भेट द्याल. आरोग्याची काळजी घ्या. बाहेरील खाद्यपदार्थ खाणे टाळा. कोणताही मोठा निर्णय घेताना व्यवस्थित विचार करा. रखडलेले काम मार्गी लागेल. आजचा शुभ रंग - नारंगी.  
  10. मकर राशी भविष्य / Capricorn Horoscope Today: सासुरवाडीतून आनंदाची बातमी मिळेल. तुमची आर्थिक स्थिती मजबूत होण्यास मदत होईल. दीर्घकाळापासून तुम्हाला सतावत असलेली आर्थिक समस्या दूर होईल. कुटुंबात सुरू असलेले कलह, वाद संपुष्टात येतील. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. आजचा शुभ रंग - लाल आणि पांढरा.
  11. कुंभ राशी भविष्य / Aquarius Horoscope Today: आजचा दिवस तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. जबाबदारीत वाढ होईल. जोडीदारासोबत वाद-विवाद होऊ शकतात. मुलांना वेळ द्या. रखडलेले काम मार्गी लागेल. आजचा शुभ रंग - पिवळा आणि हिरवा.
  12. मीन राशी भविष्य / Pisces Horoscope Today: आजचा दिवस तुमच्यासाठी लाभदायक असणार आहे. घरी मित्र किंवा नातेवाईकांचे आगमन होईल ज्यामुळे कुटुंबातील सर्व सदस्य आनंदी होतील. लवकरच आनंदाची बातमी मिळेल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. आजचा शुभ रंग - निळा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी