Daily Horoscope : कर्क राशीसह या 4 राशींसाठी आहेत धन लाभाचे योग, जाणून घ्या तुमचं भविष्य

Rashi bhavishya in Marathi :जाणून घ्या मेष, वृषभ, मिथुन, कर्क यासह कोणत्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस कसा राहील. जाणून घ्या सर्व राशींचे प्रेम भविष्य . (Daily Horoscope, 12 February 2023 Horoscope in Marathi)

Daily Horoscope, 12 February 2023 Horoscope in Marathi
Horoscope : कर्क राशीसह या 4 राशींसाठी आहेत धन लाभाचे योग  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
 • आज रविवारचा दिवस सूर्यदेवाला समर्पित असतो.
 • ाही राशींसाठी आजचा दिवस खूप खास असणार आहे.
 • या राशीच्या लोकांवर सूर्यदेवाची कृपा राहील.

Horoscope Today 12 February 2023: आज रविवारचा दिवस सूर्यदेवाला समर्पित असतो. या दिवशी स्नान वगैरे करून सूर्यदेवाला अर्घ्य दिल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि जीवनात येणारे सर्व संकट दूर होतात असे मानले जाते. अशा परिस्थितीत काही राशींसाठी आजचा दिवस खूप खास असणार आहे. व्यवसाय आणि नोकरी व्यवसायात गुंतलेल्या लोकांना आज  रविवारी मोठा फायदा होईल. (Daily Horoscope, 12 February 2023 Horoscope in Marathi)

अधिक वाचा  :  हे 7 पेय वाढवतील हिमोग्लोबिन

 1. मेष राश‍ी भविष्य / Aries Horoscope Today:    मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप खास असणार आहे. या राशीच्या लोकांवर सूर्यदेवाची कृपा राहील. ज्या कामात तुम्हाला वर्षानुवर्षे अपयश येत आहे त्यात तुम्हाला यश मिळू शकते. व्यवसायाच्या क्षेत्रातही मोठा नफा होणार आहे. शुभ रंग - लाल
 2. वृषभ राश‍ी भविष्य / Tauras Horoscope Today: वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस थोडा चढ उताराचा असेल. आज काही जणांना कामाच्या ठिकाणी आणि कौटुंबिक जीवनात  र्व जबाबदाऱ्या पूर्ण करू शकाल. आज तुम्हाला हळूहळू यश मिळेल. आज तुम्हाला कोणतेही नवीन काम सुरू करायचे असेल तर त्यासाठी सध्याची वेळ योग्य नाही. शुभ रंग - लाल
 3. मिथुन राश‍ी भविष्य / Gemini Horoscope Today:  मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सामान्य राहणार आहे. आज तुम्हाला तुमच्या व्यवसायात यश मिळेल. या राशीच्या लोकांना प्रेमात यश मिळेल. तुम्ही ज्याच्यावर मनापासून प्रेम करता तो तुमचे प्रेम स्वीकारेल.  शुभ रंग - निळा 
 4. कर्क राश‍ी भविष्य / Cancer Horoscope Today: कर्क राशीच्या लोकांना आज शुभ कार्यात रस असेल. आज तुम्ही जो निर्णय घ्याल तो भविष्यात तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. आर्थिक दृष्टीकोनातून या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप खास असणार आहे. व्यवसायात नुकसान सहन करावे लागू शकते. यासोबतच काहींना नोकरीच्या क्षेत्रात अडचणी येऊ शकतात. लकी कलर- क्रीम
 5. सिंह राश‍ी भविष्य / Leo Horoscope Today:  या राशीच्या लोकांना प्रत्येक कामात त्यांच्या नशिबाची साथ मिळेल. आज विरोधक तुमच्या विरोधात षडयंत्र रचू शकतात, पण त्यात ते अपयशी ठरतील. सिंह राशीच्या लोकांनी कोणाच्याही प्रभावाखाली कोणाशीही वाद घालू नये.  भांडण, मारामारी आणि यांपासून दूर रहावे. शुभ रंग - पिवळा
 6. कन्या राश‍ी भविष्य / Virgo Horoscope Today: या राशीच्या लोकांना समाजात मान-सन्मान मिळेल. तुमच्या स्वभावामुळे लोक तुम्हाला पुन्हा एकदा समाजात सर्वोच्च स्थान देतील. तुमच्या दयाळू स्वभावाने तुम्ही सर्वांची मने जिंकू शकाल. शुभ रंग - लाल 
 7. तूळ राश‍ी भविष्य / Libra Horoscope Today:  या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला जाणार आहे. कुटुंबात किंवा नातेवाईकात मुलाच्या जन्माची चांगली बातमी मिळेल. या राशीच्या लोकांनी  आपल्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. शुभ रंग - पांढरा
 8. वृश्चिक राश‍ी भविष्य / Scorpio Horoscope Today:  वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस काही आव्हाने घेऊन येईल. एखादा महत्त्वाचा व्यावसायिक करार तुमच्या बाजूने निश्चित होऊ शकतो. कौटुंबिक दृष्टीनेही आजचा दिवस तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे. तुमच्या प्रत्येक निर्णयात तुमचे कुटुंब तुम्हाला साथ देईल. शुभ रंग - पिवळा
 9. धनु राश‍ी भविष्य / Sagittarius Horoscope Today: धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस तुम्हाला सरकारी कामात यश मिळवून देणारा आहे. आआज तुम्हाला मित्रांकडूनही आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. शुभ रंग - निळा
 10. मकर राश‍ी भविष्य / Capricorn Horoscope Today:  मकर राशीच्या लोकांना कौटुंबिक सुख मिळेल.  तुमच्या जीवनसाथीकडून निराशा येऊ शकते. तुम्ही काही बोलला तर त्यांना त्रास होण्याची शक्यता आहे. ते दुखावू शकतात. यामुळे घरातील भांडणांपासून दूर रहा.  शुभ रंग - पांढरा
 11. कुंभ राश‍ी भविष्य / Aquarius Horoscope Today: कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फलदायी राहील. आज वृद्ध महिलेचा आशीर्वाद मिळाल्यास प्रगतीच्या विशेष संधी मिळतील.  शुभ रंग - गुलाबी
 12. मीन राश‍ी भविष्य / Pisces Horoscope Today: या राशीच्या लोकांना आजचा दिवस आर्थिक लाभ करून देणारा आहे. आज तुमचे विरोधक तुमच्याकडून पराभूत होऊ शकतात. तुमचा भाग्यवान तारा पुन्हा चमकू लागेल. व्यापारी वर्गाच्या लोकांसाठी दिवस खूप चांगला जाण्याची शक्यता आहे आर्थिक लाभ होऊ शकतो. शुभ रंग - निळा

अधिक वाचा  : या घरगुती उपायांमुळे Kidney Stone चं होईल पाणी

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी