आजचे राशी भविष्य 13 एप्रिल : 'या' राशीच्या व्यक्तींना मोठा लाभ होण्याचे संकेत

Daily Horoscope आजचे राशी भविष्य, 13 एप्रिल 2023: मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या 12 राशींसाठी कसा असेल दिवस? जाणून घ्या या राशींचे डेली भविष्य...

Today's Horoscope
आजचे राशीभविष्य 
थोडं पण कामाचं
 • पाहा आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असणार
 • जाणून घ्या 12 राशींसाठी आजचा दिवस कसा
 • तुमच्या राशीत आज काय लिहिलंय? वाचा

Daily Horoscope 13 April Rashi Bhavishya, आजचे राशी भविष्य 13 एप्रिल 2023 : कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस आणि कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ रंग काय आहे या सर्वांची सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा. जाणून घ्या मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या 12 राशींसाठी कसा असेल दिवस?

 1. मेष राशी भविष्य / Aries Horoscope Today: कुटुंबात अनुकूल वातावरण राहील. विद्यार्थ्यांचे अभ्यासात लक्ष केंद्रीत होईल. व्यापारात विघ्न येण्याची शक्यता आहे. कठीण परिश्रम केल्यानंतर तुमच्या कार्यात यश येईल. शुभ रंग - नारंगी.
 2. वृषभ राशी भविष्य / Tauras Horoscope Today: वाद-विवाद टाळा. भावूक होऊन कुठलाही मोठा निर्णय घेऊ नका. तब्येतीची काळजी घ्या. ऑफिसमधील कामात यश प्राप्त होईल. आजचा शुभ रंग - नारंगी.
 3. मिथुन राशी भविष्य / Gemini Horoscope Today: आरोग्याची काळजी घ्या. दिवस शुभ आहे. व्यावसायिक क्षेत्रांत वाद होण्याची शक्यता आहे. तुमच्या कार्यात यश मिळेल. आई-वडिलांकडून चांगला आशीर्वाद मिळेल. शुभ रंग - पिवळा.
 4. कर्क राशी भविष्य / Cancer Horoscope Today: बाहेरील खाद्य-पदार्थ खाणं टाळा. मित्रांसोबत वेळ घालवण्याची संधी चालून येईल. व्यापाऱ्यांना मोठा लाभ होण्याची शक्यता आहे. शुभ रंग - पांढरा.
 5. सिंह राशी भविष्य / Leo Horoscope Today: प्रेमात असाल तर जोडीदाराला लग्नाचा मागणी घालण्यास योग्य वेळ आहे. भगवान विष्णूचं नामस्मरण करा. तुमचं आरोग्य चांगलं राहिल. आजचा शुभ रंग - पांढरा.
 6. कन्या राशी भविष्य / Virgo Horoscope Today:  तुम्हाला विविध क्षेत्रांत यश मिळेल. आरोग्य निरोगी राहील. मित्र-मैत्रीणींच्या भेटी होतील. उच्चवर्गीय पदाधिकाऱ्यांकडून उत्तम प्रतिसाद आणि प्रोत्साहन मिळेल. शुभ रंग - पांढरा.
 7. तूळ राशी भविष्य / Libra Horoscope Today: जोडीदाराची साथ तुम्हाला एक नवी ऊर्जा देईल. आज धार्मिक यात्रा होण्याची शक्यता आहे. वाद-विवाद टाळण्याचा प्रयत्न करा. व्यवसायात यश आणि प्रगतीची शक्यता आहे. वैवाहिक आयुष्य चांगलं राहील. आजचा शुभ रंग - हिरवा.
 8. वृश्चिक राशी भविष्य / Scorpio Horoscope Today: मन स्थिर ठेवा. आरोग्याची काळजी घ्या. कोणत्याही नवीन कार्याची सुरूवात करण्यासाठी दिवस उत्तम आहे. मित्र-मैत्रीणींसोबत अनुकूल वातावरण राहील. प्रत्येक कार्यात यश मिळेल. आर्थिक लाभ होईल. शुभ रंग - लाल.
 9. धनु राशी भविष्य / Sagittarius Horoscope Today: नातेवाईक आणि जोडीदारांची चांगली साथ मिळेल. कार्यालयातून दिलेलं काम पूर्ण कराल. प्रवासाचा किंवा पर्यटनाचा योग महिन्याभरात निर्माण होईल. शुभ रंग - पांढरा.
 10. मकर राशी भविष्य / Capricorn Horoscope Today: आर्थिक खर्च होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांसाठी दिवस खूपच चांगला असेल. मित्र-मैत्रीणींच्या भेटीमुळे मनात आनंद निर्माण होईल. भाऊ-बहिणींकडून चांगले आशीर्वाद मिळतील. प्रलंबित कामं पूर्ण होतील. शुभ रंग - निळा.
 11. कुंभ राशी भविष्य / Aquarius Horoscope Today: आजचा दिवस तुमच्यासाठी आनंदाचे क्षण घेऊन येणारा असेल. व्यापारात लाभ होईल. जुनी थांबलेली कामे पूर्ण होतील. नात्यात सुधारणा होईल. नव्या कामाची सुरूवात करू शकता. आजचा शुभ रंग - पिवळा.
 12. मीन राशी भविष्य / Pisces Horoscope Today: मन प्रसन्न असेल. विद्यार्थी अभ्यासात चांगली प्रगती करतील. साहित्य, कला क्षेत्रातील व्यक्तींसाठी दिवस चांगला असेल. शुभ रंग - पिवळा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी