Daily Horoscope 14 December: 'या' राशीच्या व्यक्तींचा होणार भाग्योदय, संकटे होणार दूर

Today's Horoscope 14 December 2022: आजचा दिवस कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल याबाबत सविस्तर माहिती जाणून घ्या. पाहूयात मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या बारा राशींसाठी कसा असेल हा दिवस?

Today's Horoscope
आजचे राशीभविष्य  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • पाहा आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असणार
  • जाणून घ्या 12 राशींसाठी आजचा दिवस कसा
  • तुमच्या राशीत आज काय लिहिलंय? वाचा

Daily Horoscope in Marathi; 14 december 2022 Rashi Bhavishya: आजचा दिवस कुठल्या राशीसाठी कसा असेल आणि कुठल्या राशीसाठी शुभ रंग काय असेल जाणून घेऊयात. (daily horoscope 14 december rashi bhavishya in marathi aajche rashi bhavishya)

  1. मेष राशी भविष्य / Aries Horoscope Today: या राशीच्या व्यक्तींना शेअर बाजार, लॉटरीतून लाभ होण्याची शक्यता आहे. नोकरीच्या ठिकाणी पदोन्नती होण्याची शक्यता आहे. अविवाहितांना लवकरच चांगली बातमी मिळेल, लग्नासाठी स्थळ चालून येईल. आजचा शुभ रंग - पिवळा.
  2. वृषभ राशी भविष्य / Tauras Horoscope Today: व्यापाराच्या संबंधित व्यक्तींना मोठा लाभ होईल. नोकरीत पदोन्नतीसाठी अधिक मेहनत कराल. प्रेमी जोडीदाराकडून लग्नाचा प्रस्ताव येईल. अविवाहित व्यक्तींना लग्नाचे स्थळ मिळेल. वृषभ राशीच्या व्यक्तींनी सकाळी सूर्यदेवाला जल अर्पण करावे. आजचा शुभ रंग - निळा. 
  3. मिथुन राशी भविष्य / Gemini Horoscope Today: बऱ्याच दिवसांनी मित्र-मैत्रिणीची भेट होईल. पोटाची समस्या उद्भवण्याची शक्यता आहे. नोकरीत यश मिळवण्यासाठी अधिक मेहनत कराल. प्रेमी जोडप्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. गरीबांना अन्न, वस्त्र दान करा. आजचा शुभ रंग - नारंगी.
  4. कर्क राशी भविष्य / Cancer Horoscope Today: व्यापाऱ्यांनी कोणताही व्यवहार करताना काळजी घ्या. आरोग्य सुदृढ राहील. उत्पन्नापेक्षा खर्च अधिक होईल. कार्यालयात नवी जबाबदारी तुमच्यावर सोपवली जाईल. वैवाहिक आयुष्यात प्रेम वाढेल आणि नाराजी दूर होईल. आजचा शुभ रंग - लाल. 
  5. सिंह राशी भविष्य / Leo Horoscope Today: व्यापारात मित्रांचे चांगले सहकार्य मिळेल. नव्या नोकरीची संधी चालून येईल. जोडीदारासोबत वाद होण्याची शक्यता आहे. गरीबांना अन्न दान करा. वाद-विवाद टाळा. गुंतवणूक करण्याकडे लक्ष द्याल. आजचा शुभ रंग - केशरी.
  6. कन्या राशी भविष्य / Virgo Horoscope Today: आरोग्याची काळजी घ्या. व्यापारात वाढ होण्यासाठी प्रयत्न कराल. प्रेमळ जोडीदार जवळ असतानाही काही प्रमाणात प्रेमाची कमी जाणवेल. कुटुंबाची जबाबदारी तुमच्यावर येईल. वाहन खरेदीचं नियोजन कराल. आजचा शुभ रंग - राखाडी.
  7. तूळ राशी भविष्य / Libra Horoscope Today: आर्थिक स्थिती मजबूत होईल. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. प्रॉपर्टीत गुंतवणूक करण्याचा विचार कराल. घरात प्रेमळ वातावरण असेल. सासुरवाडीतून आनंदाची बातमी मिळेल. आजचा शुभ रंग - पिवळा.
  8. वृश्चिक राशी भविष्य / Scorpio Horoscope Today: आर्थिक स्थिती चांगली राहील. वाहन चालवताना काळजी घ्या. मुलांच्या आरोग्याची काळजी घ्या. ब्रेकअप किंवा घटस्फोट याच्या संबंधित गोष्टींच्या आठवणी ताज्या होतील. आज एखाद्या व्यक्तीकडून सरप्राईज मिळण्याची शक्यता आहे. आजचा शुभ रंग - पिवळा आणि निळा.
  9. धनु राशी भविष्य / Sagittarius Horoscope Today: व्यापारात मोठी वाढ होईल आणि धनलाभ होईल. बेरोजगारांना रोजगाराची संधी मिळेल.  आई-वडिलांसोबत वाद होऊ शकतात. श्री गणेशाची पूजा करा. गरीबांना अन्न, कपडे दान करा. आजचा शुभ रंग - केशरी.
  10. मकर राशी भविष्य / Capricorn Horoscope Today: कंत्राटदारांना चांगला लाभ होण्याची शक्यता आहे. व्यापारात वाढ होईल. आर्थिक स्थिती मजबूत होईल. कार्यालयात सहकाऱ्यांकडून चांगली मदत मिळेल. अविवाहितांच्या लग्न जुळण्यास काहीसा उशीर होईल. स्वभावात चिडचिड वाढेल. आजचा शुभ रंग - लाल. 
  11. कुंभ राशी भविष्य / Aquarius Horoscope Today: उत्पन्नाचे नवे स्त्रोत तयार होतील. आजारी पडण्याची शक्यता आहे, आरोग्याची काळजी घ्या. तरुणांना नोकरीची संधी मिळेल. धार्मिक कार्यात सहभागी होईल. सामाजिक कार्यात सहभाग घ्याल. आजचा शुभ रंग - जांभळा.
  12. मीन राशी भविष्य / Pisces Horoscope Today: व्यापारात वाढ होईल, व्यापाराच्या संबंधित परदेश दौरा होण्याची शक्यता आहे. ऑफिस तसेच कामाच्या ठिकाणी तुमच्यावर नवी जबाबदारी सोपवली जाईल. लवकरच प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. श्री गणेशाची पूजा करा. आजचा शुभ रंग - पिवळा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी