Horoscope 15 April 2021: राशी भविष्य १५ एप्रिल २०२१ असा असेल गुरुवार?

Daily Horoscope राशी भविष्य, १५ एप्रिल २०२१ : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या १२ राशींसाठी कसा असेल दिवस? जाणून घ्या या राशींचे डेली भविष्य...

Horoscope 15 April 2021
राशी भविष्य १५ एप्रिल २०२१ 

थोडं पण कामाचं

 • Horoscope 15 April 2021: राशी भविष्य १५ एप्रिल २०२१ असा असेल गुरुवार?
 • कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस?
 • काय आहे आपले भविष्य?

राशी भविष्य 15 April 2021: कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस आणि कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ रंग काय आहे या सर्वांची सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा. जाणून घ्या मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या 12 राशींसाठी कसा असेल दिवस?

 1. मेष राश‍ी भविष्य / Aries Horoscope Today: राजकारणात यश प्राप्त होईल. गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. गरीबांना अन्न दान करा. शुभ रंग - पिवळा.
 2. वृषभ राश‍ी भविष्य / Tauras Horoscope Today: बेरोजगारांना नोकरी मिळण्याच्या संधी आहे. व्यापारात लाभ होतील. आपल्या बोलण्यावर संयम ठेवा. मित्रांसोबत वेळ घालवाल. नव्या संपर्कातून लाभ होतील. शुभ रंग - निळा.
 3. मिथुन राश‍ी भविष्य / Gemini Horoscope Today: विद्यार्थ्यांचे अभ्यासात मन रमेल. नवे वाहन खरेदी करू शकता. मनोरंजनाच्या साधनांवर खर्च होईल. एकटेपणा वाटू शकतो. गुंतवणुकीतून लाभ मिळेल. शुभ रंग - जांभळा.
 4. कर्क राश‍ी भविष्य / Cancer Horoscope Today: प्रयत्न यशस्वी ठरतील. जोडीदाराबाबत चिंता राहील. मित्रांकडून सहकार्य मिळेल. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. मोठे काम करण्याची इच्छा जागृत होईल. व्यापार-व्यवसाय चांगला राहील. नोकरीत नवे काम हाती घ्याल. शुभ रंग - पिवळा.
 5. सिंह राश‍ी भविष्य / Leo Horoscope Today: आवडत्या खाद्यपदार्थांचा आनंद लुटाल. बौद्धिक कार्यात सफल व्हाल. व्यापारात चांगले यश मिळेल. रखडलेले काम पूर्ण होईल. मकर राशीच्या व्यक्तींकडून कामात सहकार्य मिळेल. शुभ रंग - पांढरा.
 6. कन्या राश‍ी भविष्य / Virgo Horoscope Today: प्रगतीचे मार्ग खुले होतील. स्थायी संपत्तीची कामे मोठे लाभ मिळवून देऊ शकतात. व्यवसायात वृद्धी होईल. वेळेचा फायदा करून घ्या. शुभ रंग - लाल.
 7. तूळ राश‍ी भविष्य / Libra Horoscope Today: जोडीदाराकडून अपेक्षित सहकार्य मिळेल. व्यापार तसेच व्यवसायात लाभ होतील. नोकरीमध्ये अधिकारी वर्ग तुमच्यावर खूश असेल. कोणत्याही प्रकारच्या वादात पडू नका. शुभ रंग - हिरवा.
 8. वृश्चिक राश‍ी भविष्य / Scorpio Horoscope Today: वाहन चालवताना काळजी घ्या. घाईघाईने घेतलेल्या निर्णयामुळे तुम्हाला पश्चाताप करण्याची वेळ येऊ शकते. देण्या-घेण्याच्या व्यवहारात काळजी घ्या. शुभ रंग - निळा.
 9. धनु राश‍ी भविष्य / Sagittarius Horoscope Today: व्यवसायात चांगला लाभ होईल. राजकीय व्यक्तींचा सहवास लाभेल. व्यापार तसेच व्यवसायात प्रगती होईल. घरात लवकरच धार्मिक कार्य होईल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. शुभ रंग - पिवळा.
 10. मकर राश‍ी भविष्य / Capricorn Horoscope Today: बनवलेल्या योजनेचे फळ तुमच्या हाती लागेल. कामामध्ये सुधारणा होईल. दुसऱ्यांची मदत करू शकाल. भाग्याची साथ राहील. काम पूर्ण झाल्याने प्रसन्न रहाल. नवी कामे मिळतील. शुभ रंग - पांढरा.
 11. कुंभ राश‍ी भविष्य / Aquarius Horoscope Today: अपेक्षित कार्यामध्ये विलंब होईल. चिंता तसेच तणाव राहील. घाईघाईने कोणताही निर्णय घेऊ नका. नोकरीमध्ये अधिकारी अधिक कामाची अपेक्षा करतील. बोलताना जपून शब्द वापरा. शुभ रंग - पिवळा.
 12. मीन राश‍ी भविष्य / Pisces Horoscope Today: व्यवसायात प्रगतीसाठी अधिक परिश्रमाची अपेक्षा आहे. सरकारी कामात यश मिळेल. रखडलेले काम पूर्ण होईल. वरिष्ठांच्या सहकार्याने मोठा लाभ होईल. शुभ रंग - पांढरा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी