Daily Horoscope 15 December: 'या' 4 राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात होणार विशेष बदल, अचानक धनलाभाचा योग

Today's Horoscope 15 December 2022: आजचा दिवस कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल याबाबत सविस्तर माहिती जाणून घ्या. पाहूयात मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या बारा राशींसाठी कसा असेल हा दिवस?

Today's Horoscope
आजचे राशीभविष्य 
थोडं पण कामाचं
  • पाहा आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असणार
  • जाणून घ्या 12 राशींसाठी आजचा दिवस कसा
  • तुमच्या राशीत आज काय लिहिलंय? वाचा

Daily Horoscope in Marathi; 15 december 2022 Rashi Bhavishya: आजचा दिवस कुठल्या राशीसाठी कसा असेल आणि कुठल्या राशीसाठी शुभ रंग काय असेल जाणून घेऊयात. (daily horoscope 15 december rashi bhavishya in marathi aajche rashi bhavishya)

  1. मेष राशी भविष्य / Aries Horoscope Today: आज तुमच्या सर्व समस्या विसरून कामात लक्ष द्यायला हवे. यामुळे तुमचं मन प्रसन्न राहील. आर्थिक स्थिती चांगली राहील. वायफळ खर्च टाळा. नव्या कार्याची सुरुवात करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. आजचा शुभ रंग - लाल.
  2. वृषभ राशी भविष्य / Tauras Horoscope Today: आज असे काही तरी घडेल की ज्यामुळे तुमच्या जीवनात एक मोठा बदल होऊ शकतो. व्यवहार करताना काळजी घ्या. गुंतवणूक करण्याकडे लक्ष द्या. दूरचा प्रवास लवकरच होईल. धार्मिकस्थळी भेट द्याल. आजचा शुभ रंग - पांढरा.
  3. मिथुन राशी भविष्य / Gemini Horoscope Today: आजचा दिवस तुमच्यासाठी खूप रोमांचक असा असेल. लवकरच आनंदाची बातमी मिळेल. नव्या कार्याची सुरुवात आज करु शकता. नवी गाडी खरेदी करण्याचं प्लानिंग कराल. आजचा शुभ रंग - हिरवा.
  4. कर्क राशी भविष्य / Cancer Horoscope Today: आज तुमचा आत्मविश्वास खूप वाढेल. आज कोणताही महत्त्वाचा निर्णय घेताना व्यवस्थित विचार करा. मित्रांसोबत वेळ घालवाल. उत्पन्नाचे नवे स्त्रोत तयार कराल. आजचा शुभ रंग - निळा. 
  5. सिंह राशी भविष्य / Leo Horoscope Today: कुटुंबात छोट्या-छोट्या कारणांवरुन वाद होऊ शकतात. कामाच्या ठिकाणी जबाबदारी वाढेल. उत्पन्नात वाढ होईल. अचानक धनलाभाचा योग आहे. दुपारी 3 ते सायंकाळी 5 हा काळ तुमच्यासाठी शुभ आहे. आजचा शुभ रंग - पांढरा. 
  6. कन्या राशी भविष्य / Virgo Horoscope Today: आज अनेक अशा गोष्टी घडतील ज्यामुळे तुमच्या जीवनात मोठा बदल होऊ शकतो. वाद विवाद टाळा. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या. आजचा शुभ रंग - सोनेरी.
  7. तूळ राशी भविष्य / Libra Horoscope Today: गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या धावपळीमुळे थोडा थकवा जाणवेल. त्यामुळे आज तुम्ही आराम कराल. अचानक मित्रांसोबत एखाद्या ट्रिपवर जाण्याचं नियोजन कराल. आजचा शुभ रंग - लाल.
  8. वृश्चिक राशी भविष्य / Scorpio Horoscope Today: कामात किंवा व्यवसायात आज तुम्हाला काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो. नकारात्मक गोष्टींपासून दूर रहा. रागावर नियंत्रण ठेवा. आजचा शुभ रंग - जांभळा.
  9. धनु राशी भविष्य / Sagittarius Horoscope Today: कुटुंबात वाद-विवाद होऊ शकतात. आई-वडिलांच्या आरोग्याची काळजी घ्या. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. उत्पन्नात वाढ होईल. सायंकाळी 4.15 ते 5.15 हा काळ तुमच्यासाठी शुभ आहे. आजचा शुभ रंग - जांभळा आणि केशरी.
  10. मकर राशी भविष्य / Capricorn Horoscope Today: नव्या कार्याची सुरुवात करण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. श्री गणेशाची पूजा करा. गरीबांना अन्न, कपडे दान करा. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. नोकरीच्या ठिकाणी पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. आजचा शुभ रंग - पिवळा.
  11. कुंभ राशी भविष्य / Aquarius Horoscope Today: हाती घेतलेले काम वेळेवर पूर्ण करा. काम पूर्ण न झाल्यास बॉस नाराज होऊ शकतो. दूरच्या नातेवाईकांचे घरी आगमन होऊ शकते. कुटुंबात लवकरच धार्मिक कार्य होईल. आजचा शुभ रंग - लाल आणि हिरवा.
  12. मीन राशी भविष्य / Pisces Horoscope Today: कामाच्या ठिकाणी वरिष्ठांसोबत बैठक होईल. यामुळे तुम्हाला चांगले काम करण्याचं मार्गदर्शन मिळेल. व्यापारात चांगली प्रगती होईल. कर्ज घेतले असल्यास ते लवकर परतफेड करण्याचा प्रयत्न करा. आजचा शुभ रंग - नारंगी.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी