Daily Horoscope 15 November: कोणाला प्रेमात धक्का तर कोणाला राजकीय क्षेत्रात लाभ... वाचा आजचा दिवस तुमच्यासाठी कसा

Today's Horoscope 15 November 2022: आजचा दिवस कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल याबाबत सविस्तर माहिती जाणून घ्या. पाहूयात मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या बारा राशींसाठी कसा असेल हा दिवस?

Today's Horoscope
आजचे राशीभविष्य  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • पाहा आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असणार
  • जाणून घ्या 12 राशींसाठी आजचा दिवस कसा
  • तुमच्या राशीत आज काय लिहिलंय? वाचा

Daily Horoscope in Marathi; 15 November 2022 Rashi Bhavishya: आजचा दिवस कुठल्या राशीसाठी कसा असेल आणि कुठल्या राशीसाठी शुभ रंग काय असेल जाणून घेऊयात. (daily horoscope 15 November rashi bhavishya in marathi aajche rashi bhavishya)

  1. मेष राशी भविष्य / Aries Horoscope Today: मेष राशीच्या व्यक्तींना व्यवसायात चांगला लाभ होईल. विरोधक शांत राहतील. आरोग्याची काळजी घ्या. नोकरीसाठी परिस्थिती अनुकूल आहे. प्रेम संबंधांत वाद होण्याची शक्यता आहे. कुटुंबात काही वाईट गोष्ट घडण्याची शक्यता आहे. अचानक धनलाभ होईल. आजचा शुभ रंग - पांढरा आणि निळा.
  2. वृषभ राशी भविष्य / Tauras Horoscope Today: या राशीच्या व्यक्तींना व्यापारात फायदा होईल. मात्र, मेहनतीशिवाय काही शक्य नाहीये. आरोग्याची काळजी घ्या. प्रेम संबंधांत तणावाची शक्यता आहे. व्यापारात, नोकरीच्या ठिकाणी चढ-उतार होण्याची शक्यता आहे. आजचा शुभ रंग - पिवळा.
  3. मिथुन राशी भविष्य / Gemini Horoscope Today: धनलाभ होण्याची शक्यता आहे. उत्पन्नात वाढ होण्याचा योग आहे. आरोग्याची काळजी घ्या. नव्या नोकरीची संधी मिळण्याची शक्यता आहे. अविवाहितांचे लग्न जुळेल. सासरच्यांकडून चांगली बातमी मिळेल. आजचा शुभ रंग - नारंगी.
  4. कर्क राशी भविष्य / Cancer Horoscope Today: व्यापाराच्या संबंधित व्यक्तींसाठी अनुकूल वेळ आहे. धार्मिक कार्याशी संबंधित गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका. कुटुंबात वाद - विवाद होण्याची शक्यता आहे. गरिबांना अन्न दान करा. आजचा शुभ रंग - हिरवा आणि निळा.
  5. सिंह राशी भविष्य / Leo Horoscope Today: कृषी क्षेत्रातील कामात लाभ मिळेल. वाहन चालवताना काळजी घ्या. नोकरीत वरिष्ठांकडून चांगले सहकार्य मिळेल. जोडीदाराकडून चांगले सहकार्य मिळेल. वाद-विवाद टाळा. दुर्गा देवीची पूजा करा. आजचा शुभ रंग - पांढरा.
  6. कन्या राशी भविष्य / Virgo Horoscope Today: आरोग्याची काळजी घ्या. व्यवसायात चांगला लाभ होईल. दाम्पत्य जीवनात आनंदाचे वातावरण असेल. राम रक्षास्त्रोतचं पठण करा. नोकरीच्या ठिकाणी वाद टाळा. आजचा शुभ रंग - पिवळा.
  7. तूळ राशी भविष्य / Libra Horoscope Today: व्यवसायात चांगली बातमी मिळेल. एखाद्या अनपेक्षित घटनेमुळे मन दुखावण्याची शक्यता आहे. शैक्षणिक क्षेत्रातून चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. प्रेम संबंध आणि वैवाहिक आयुष्यात मदभेद होण्याची शक्यता आहे. आजचा शुभ रंग - निळा.
  8. वृश्चिक राशी भविष्य / Scorpio Horoscope Today: व्यवसायात हळूहळू काम होईल. सरकारी नोकरीच्या ठिकाणी परिस्थिती अनुकूल असेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. परदेश दौऱ्याचा योग निर्माण होण्याची शक्यता आहे. आजचा शुभ रंग - पिवळा.
  9. धनु राशी भविष्य / Sagittarius Horoscope Today: व्यवसायात नुकसान होण्याची शक्यता आहे. नोकरीच्या ठिकाणी दिलेली जबाबदारी वेळेवर पार पाडा. हातातील काम पुढे ढकलू नका. अडचणीत मित्रांकडून सहकार्य मिळेल. शिवसहस्त्रनामाचा जप करा. जमीन खरेदीची योजना आखाल. आजचा शुभ रंग - निळा. 
  10. मकर राशी भविष्य / Capricorn Horoscope Today: तुमच्या कामामुळे समाजात कौतुक होईल. आरोग्य सुदृढ राहील. नोकरीच्या ठिकाणी कामकाज सुरळीत असेल. कुटुंबात प्रेमळ, आनंदाचे वातावरण असेल. आजचा शुभ रंग -  पिवळा आणि पांढरा.
  11. कुंभ राशी भविष्य / Aquarius Horoscope Today: व्यवसायाच्या निमित्ताने प्रवासाचा योग निर्माण होईल. धनलाभ होण्याची शक्यता आहे. वडिलांच्या कामात हातभार लावाल. ऑफिसमध्ये प्रेमसंबंध निर्माण होण्याची शक्यता आहे. आजचा शुभ रंग - हिरवा.
  12. मीन राशी भविष्य / Pisces Horoscope Today: राजकीय क्षेत्रातील व्यक्तींसाठी आजचा दिवस उत्तम आहे. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या. दिवसभर प्रेमाची चर्चा असेल. मित्र परिवाराकडून मदतीने रखडलेले काम मार्गी लागेल. आजचा शुभ रंग - पांढरा आणि पिवळा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी