Daily Horoscope 15 September: आजचे राशीभविष्य; वाचा आजचा गुरुवार तुमच्यासाठी कसा

Daily Horoscope in Marathi; 15 September 2022 Rashi Bhavishya: आजचा दिवस कुठल्या राशीसाठी कसा असेल आणि कुठल्या राशीसाठी शुभ रंग काय असेल जाणून घेऊयात. 

Today's Horoscope
आजचे राशीभविष्य 
थोडं पण कामाचं
  • पाहा आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असणार
  • जाणून घ्या 12 राशींसाठी आजचा दिवस कसा
  • तुमच्या राशीत आज काय लिहिलंय? वाचा

Today's Horoscope 15 September 2022: आजचा दिवस कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल याबाबत सविस्तर माहिती जाणून घ्या. पाहूयात मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या बारा राशींसाठी कसा असेल हा दिवस? (daily horoscope 15 September rashi bhavishya in marathi aajche rashi bhavishya)

  1. मेष राशी भविष्य / Aries Horoscope Today: व्यवसायात प्रगती होईल. नोकरीच्या ठिकाणी तणावाचे वातावरण असेल. नातेसंबंधातही किरकोळ कारणावरुन वाद होण्याची शक्यता आहे. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. आजचा शुभ रंग - पांढरा आणि पिवळा.
  2. वृषभ राशी भविष्य / Tauras Horoscope Today: आजचा दिवस व्यवसायात थोडा संघर्ष निर्माण करणारा असेल. धनलाभ होण्याची शक्यता आहे. नोकरीत प्रगती होण्याची शक्यता आहे. आजचा शुभ रंग - निळा आणि हिरवा.
  3. मिथुन राशी भविष्य / Gemini Horoscope Today: आज व्यवसाय परिवर्तनाच्या संदर्भात कोणताही निर्णय घेताना काळजीपूर्वक विचार करुन घ्या. नव्या योजना सुरू करण्याचा प्रयत्न कराल. आरोग्याची काळजी घ्या. आजचा शुभ रंग - निळा आणि आकाशी.
  4. कर्क राशी भविष्य / Cancer Horoscope Today: धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. जुने मित्र-मैत्रिणींची भेट होईल. दुर्गा मातेची उपासना करा. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. आजचा शुभ रंग - पांढरा आणि लाल. 
  5. सिंह राशी भविष्य / Leo Horoscope Today: तुम्ही आपल्या कामाच्या जोरावर प्रगती कराल. नवे प्रोजेक्ट हाती येतील. कामाच्या ठिकाणी तुमचं कौतुक होईल. स्वभावाने तुम्ही चतुर आहात आणि त्याचा फायदा कामात होईल. आजचा शुभ रंग - जांभळा. 
  6. कन्या राशी भविष्य / Virgo Horoscope Today: नोकरीत यश प्राप्त होईल. तुमच्या कामामुळे वरिष्ठ खूश होतील आणि आणखी नवी जबाबदारी तुमच्यावर सोपवतील. आरोग्याची काळजी घ्या. बाहेरील खाद्यपदार्थ खाणे टाळा. आजचा शुभ रंग - निळा आणि जांभळा.
  7. तूळ राशी भविष्य / Libra Horoscope Today: कामाच्या ठिकाणी थोडे तणावाचे वातावरण असेल. श्रीगणेशाची पूजा करा. गरिबांना अन्न दान करा. वाद-विवाद करणे टाळा. आजचा शुभ रंग - निळा आणि पांढरा.
  8. वृश्चिक राशी भविष्य / Scorpio Horoscope Today: आजचा दिवस मॅनेजमेंट आणि बँकिंग क्षेत्रातील व्यक्तींसाठी चांगला असेल. मेष आणि मकर राशीच्या मित्रांच्या मदतीमुळे रखडलेले काम मार्गी लागेल. धनलाभ होईल. सासरच्या व्यक्तींकडून आनंदाची बातमी मिळेल. आजचा शुभ रंग - लाल आणि केशरी.
  9. धनु राशी भविष्य / Sagittarius Horoscope Today: कामाच्या ठिकाणी किंवा व्यवसायात चांगली बातमी मिळेल. व्यवसायात नव्या करारामुळे प्रगतीकडे वाटचाल कराल आणि धनलाभ होईल. विरोधकांपासून थोडे सांभाळून रहा. आजचा शुभ रंग - पांढरा.  
  10. मकर राशी भविष्य / Capricorn Horoscope Today: आरोग्याची काळजी घ्या. विद्यार्थ्यांची अभ्यासात प्रगती दिसून येईल. व्यवसायात चांगले यश प्राप्त होईल. कोणताही निर्णय घेताना गोंधळून जाऊ नका तर व्यवस्थित विचार करुन निर्णय घ्या. आजचा शुभ रंग - जांभळा आणि लाल.
  11. कुंभ राशी भविष्य / Aquarius Horoscope Today: आजचा दिवस कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी शुभ आहे. नव्या नोकरीची संधी चालून येईल. मित्र आणि नातेवाईकांच्या मदतीने नव्या योजना सुरू करण्याबाबत विचार कराल. आजचा शुभ रंग - हिरवा आणि लाल.
  12. मीन राशी भविष्य / Pisces Horoscope Today: स्थायी संपत्तीद्वारे मोठा लाभ होण्याची शक्यता आहे. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. जोखीम उचलण्याची तयारी दाखवाल. धन प्राप्तीची शक्यता आहे. आजचा शुभ रंग - नारंगी आणि पिवळा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी