Daily Horoscope 16 December: सूर्याचं राशी भ्रमण, 'या' 6 राशीच्या व्यक्तींना लागणार लॉटरी

Today's Horoscope 16 December 2022: आजचा दिवस कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल याबाबत सविस्तर माहिती जाणून घ्या. पाहूयात मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या बारा राशींसाठी कसा असेल हा दिवस?

Today's Horoscope
आजचे राशीभविष्य 
थोडं पण कामाचं
  • पाहा आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असणार
  • जाणून घ्या 12 राशींसाठी आजचा दिवस कसा
  • तुमच्या राशीत आज काय लिहिलंय? वाचा

Daily Horoscope in Marathi; 16 december 2022 Rashi Bhavishya: आजचा दिवस कुठल्या राशीसाठी कसा असेल आणि कुठल्या राशीसाठी शुभ रंग काय असेल जाणून घेऊयात. (daily horoscope 16 december rashi bhavishya in marathi aajche rashi bhavishya)

  1. मेष राशी भविष्य / Aries Horoscope Today: आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ आहे. जोडीदारासोबत वाद होऊ शकतात. वाणीवर नियंत्रण ठेवा अन्यथा समस्या उद्भवू शकतात. लवकरच आनंदाची बातमी मिळेल. व्यापारात नफा होईल. आजचा शुभ रंग - लाल.
  2. वृषभ राशी भविष्य / Tauras Horoscope Today: आजचा दिवस तुमच्यासाठी आनंदवार्ता घेऊन येईल. उत्पन्नात दुप्पट वाढ होईल. राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्यांनी थोडे सावध राहण्याची आवश्यकता आहे. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. धार्मिक कार्यासाठी जाण्यापूर्वी आई-वडिलांचा आशीर्वाद घ्या. आजचा शुभ रंग - पिवळा आणि जांभळा.
  3. मिथुन राशी भविष्य / Gemini Horoscope Today: आजचा दिवस आणखी समस्या निर्माण करु शकतो. आरोग्याच्या समस्यांकडे दुर्लक्ष करु नका. मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष द्या, कामावर लक्ष द्या. उत्पन्नात वाढ होईल मात्र, वायफळ खर्च टाळा. आजचा शुभ रंग - निळा आणि नारंगी.
  4. कर्क राशी भविष्य / Cancer Horoscope Today: कामाच्या ठिकाणी एखाद्यासोबत वाद होऊ शकतो. आपल्या शैक्षणिक संबंधित अडथळे, समस्यांबाबत आई-वडिलांसोबत चर्चा करा. दीर्घकाळापासून रखडलेले काम मार्गी लागेल. घरात प्रसन्न वातावरण असेल. आजचा शुभ रंग - राखाडी.
  5. सिंह राशी भविष्य / Leo Horoscope Today: आजचा दिवस तुमच्यासाठी संपत्ती मिळवण्याचे संकेत देत आहे. व्यवसायात मोठा नफा होईल. नवे नाते जोडाल. मित्रांच्या मदतीने रखडलेले काम मार्गी लागेल. नव्या व्यवसायात पैसे गुंतवणूक करण्याचा विचार कराल. आजचा शुभ रंग - पांढरा.
  6. कन्या राशी भविष्य / Virgo Horoscope Today: राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी आजचा दिवस उत्तम आहे. गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर लवकरच एखाद्या सुरक्षित योजनेत पैशांची गुंतवणूक करा. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचे मार्गदर्शन मिळेल. आजचा शुभ रंग - केशरी. 
  7. तूळ राशी भविष्य / Libra Horoscope Today: दाम्पत्य जीवनात सुरू असलेले वाद आज संपुष्टात येतील. भाऊ-बहिणींचे योग्य मार्गदर्शन मिळेल. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. कामाच्या ठिकाणी तुमच्याकडून एखादी चूक झाली तर तात्काळ माफी मागायल हवी. आजचा शुभ रंग - निळा आणि नारंगी.
  8. वृश्चिक राशी भविष्य / Scorpio Horoscope Today: आज तुमच्यावर जबाबदारी अधिक वाढेल. धार्मिक कार्याच्या आयोजन करण्यावर लक्ष द्याल. मित्रांसोबत पिकनिकचं प्लानिंग कराल. कामाच्या ठिकाणी तुमचे कौतुक होईल. अचानक धनलाभाचा योग आहे. आजचा शुभ रंग - पिवळा आणि लाल.
  9. धनु राशी भविष्य / Sagittarius Horoscope Today: आर्थिकस्थिती मजबूत होईल. देवाण-घेवाण करण्याच्या संदर्भात एखादी समस्या उद्भवत असेल तर त्यापासून सुटका मिळेल. चांगल्या कामासाठी कामाच्या ठिकाणी तुमचं कौतुक होईल. आजचा शुभ रंग - राखाडी आणि हिरवा. 
  10. मकर राशी भविष्य / Capricorn Horoscope Today: आज तुमचा आत्मविश्वास कमालीचा वाढेल. व्यापाराच्या संदर्भात केलेल्या प्रयत्नांना चांगले यश मिळेल. मित्राच्या तब्येतीची काळजी करत असाल तर निश्चिंत व्हा कारण लवकरच तब्येतीत सुधारणा दिसून येईल. नव्या कार्याची सुरुवात करण्यासाठी आजचा दिवस शुभ आहे. आजचा शुभ रंग - निळा आणि लाल.
  11. कुंभ राशी भविष्य / Aquarius Horoscope Today: आजचा दिवस धावपळीचा असू शकतो. मुलांच्या शैक्षणिक गोष्टींच्या संदर्भात त्यांच्या शिक्षकांसोबत चर्चा करु शकता. काम जास्त असल्याने काही कामे उद्यावर ढकलाल. कायदेशीर कामासंदर्भात संबंधित व्यक्तीसोबत चर्चा करुन निर्णय घ्या. आजचा शुभ रंग - पिवळा आणि लाल.
  12. मीन राशी भविष्य / Pisces Horoscope Today: आजचा दिवस सामाजिक प्रतिष्ठा वाढवणारा असेल. सासरच्यांकडून धनलाभ होण्याची पूर्ण शक्यता आहे. तुमच्या चांगल्या कामामुळे तुम्हाला यश लवकर मिळेल. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या. उत्पन्नात वाढ होईल. आजचा शुभ रंग - पांढरा. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी