Daily Horoscope 16 November: कोणत्या राशीच्या व्यक्तीला होणार फायदा अन् कोणाला नुकसान? वाचा

Today's Horoscope 16 November 2022: आजचा दिवस कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल याबाबत सविस्तर माहिती जाणून घ्या. पाहूयात मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या बारा राशींसाठी कसा असेल हा दिवस?

Today's Horoscope
आजचे राशीभविष्य 
थोडं पण कामाचं
  • पाहा आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असणार
  • जाणून घ्या 12 राशींसाठी आजचा दिवस कसा
  • तुमच्या राशीत आज काय लिहिलंय? वाचा

Daily Horoscope in Marathi; 16 November 2022 Rashi Bhavishya: आजचा दिवस कुठल्या राशीसाठी कसा असेल आणि कुठल्या राशीसाठी शुभ रंग काय असेल जाणून घेऊयात. (Daily horoscope 16 November rashi bhavishya in marathi aajche rashi bhavishya)

  1. मेष राशी भविष्य / Aries Horoscope Today: या राशीच्या व्यक्तींनी आपल्या कामाकडे लक्ष द्यायला हवे. वैद्यकीय क्षेत्रात तसेच व्यापाऱ्यांनाआज धनलाभ होण्याची शक्यता आहे. काही नकारात्मक गोष्टींमुळे तरुणांच्या मनात वाईट गोष्टी येऊ शकतात. आपल्या बिझी शेड्युल्डमधून वेळ काढून कुटुंबाला वेळ देण्याचा प्रयत्न करा. आजचा शुभ रंग - पिवळा
  2. वृषभ राशी भविष्य / Tauras Horoscope Today: कार्यालयात देण्यात आलेले काम वेळेवर पूर्ण करण्यासाठी टीमची मदत घेण्याची आवश्यकता आहे. शुभ ग्रहांच्या प्रभावामुळे अनेक सकारात्मक बदल होऊ होतील. लवकरच आनंदाची बातमी मिळेल आणि त्यामुळे घरातील वातावरण सुखमय होईल. आजचा शुभ रंग - निळा आणि पांढरा. 
  3. मिथुन राशी भविष्य / Gemini Horoscope Today: व्यापाऱ्यांना मोठा लाभ होण्याची शक्यता आहे. येत्या काळात अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. परदेशात शिक्षण किंवा प्लेसमेंटसाठी इच्छुक असलेल्या तरुणांना आनंदाची बातमी मिळेल. मित्रांच्या मदतीने नव्या कामाची सुरुवात कराल. आजचा शुभ रंग - नारंगी.
  4. कर्क राशी भविष्य / Cancer Horoscope Today: या राशीचे व्यक्ती आपल्या ऑफिसमधील काम पूर्ण करतील आणि त्यामुळे वरिष्ठ खूश होतील. व्यवसायात चांगला नफा होईल. मेहनत केल्याचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. आरोग्याची काळजी घ्या. आजचा शुभ रंग - लाल आणि निळा.
  5. सिंह राशी भविष्य / Leo Horoscope Today: या राशीच्या व्यक्तींना आपल्या क्षेत्रात चांगले यश मिळेल. व्यापाऱ्यांसाठी आजचा दिवस उत्तम आहे. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेत चांगले यश प्राप्त होईल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. आजचा शुभ रंग - लाल.
  6. कन्या राशी भविष्य / Virgo Horoscope Today: कन्या राशीच्या व्यक्तींचं आपल्या कार्यालयात कौतुक होईल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस उत्तम आहे. आरोग्याची काळजी घ्या. तुमच्याकडे कोणीही बोट दाखवून आरोप करेल असे कोणतेही काम करू नका. आजचा शुभ रंग - निळा आणि पांढरा.
  7. तूळ राशी भविष्य / Libra Horoscope Today: बँकिंग क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना लवकरच प्रमोशन मिळेल. व्यापाऱ्यांना उत्पन्नात काहीसा तोटा होण्याची शक्यता आहे. तरुणांनी आपल्या भविष्याचा विचार करुन योग्य तो निर्णय घ्यावा. आजचा शुभ रंग - लाल आणि नारंगी.
  8. वृश्चिक राशी भविष्य / Scorpio Horoscope Today: या राशीच्या व्यक्तींना आपल्या कार्यक्षेत्रात चांगला फायदा होईल. काही प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. कुटुंबात भाऊ-बहिणीसोबत काही वेळ घालवा. गरोदर महिलांनी आरोग्याची काळजी घ्यावी. आजचा शुभ रंग - पिवळा.  
  9. धनु राशी भविष्य / Sagittarius Horoscope Today: या राशीच्या व्यक्तींना व्यापारात चांगला नफा होईल. काही कार्यात अडचणी येऊ शकतात. तरुणांनी कोणताही निर्णय घेताना काळजीपूर्वक विचार करा. दीर्घकाळानंतर एखाद्या ट्रिपवर जाण्याचा योग निर्माण होईल. आजचा शुभ रंग - लाल. 
  10. मकर राशी भविष्य / Capricorn Horoscope Today: तुमच्या स्वभावामुळे रखडलेले काम मार्गी लागेल. व्यापाऱ्यांना नुकसान होण्याची शक्यता आहे. आरोग्याची काळजी घ्या. आजचा शुभ रंग - नारंगी आणि पांढरा.
  11. कुंभ राशी भविष्य / Aquarius Horoscope Today: व्यापाऱ्यांना परदेशी कंपनीकडून एखादी मोठी ऑफर मिळण्याची शक्यता आहे. यामुळे व्यापारात मोठा नफा होण्याची शक्यता आहे. नव्याने गुंतवणूक करण्याचा विचार कराल. आजचा शुभ रंग - पिवळा.
  12. मीन राशी भविष्य / Pisces Horoscope Today: कार्यालयातील कामामुळे दबाव असेल. व्यापाऱ्यांनी एखादी डील करण्यापूर्वी काळजी घ्यावी. एकत्रित कुटुंबात राहणाऱ्यांनी वाद-विवाद टाळा. आरोग्य सुदृढ राहील. वाहन चालवताना काळजी घ्या. आजचा शुभ रंग - लाल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी