Daily Horoscope 17 November: वृश्चिक, सिंह, वृषभसह या 5 राशीच्या व्यक्तींचं नशीब फळफळणार

Today's Horoscope 17 November 2022: आजचा दिवस कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल याबाबत सविस्तर माहिती जाणून घ्या. पाहूयात मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या बारा राशींसाठी कसा असेल हा दिवस?

Today's Horoscope
आजचे राशीभविष्य 
थोडं पण कामाचं
  • पाहा आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असणार
  • जाणून घ्या 12 राशींसाठी आजचा दिवस कसा
  • तुमच्या राशीत आज काय लिहिलंय? वाचा

Daily Horoscope in Marathi; 17 November 2022 Rashi Bhavishya: आजचा दिवस कुठल्या राशीसाठी कसा असेल आणि कुठल्या राशीसाठी शुभ रंग काय असेल जाणून घेऊयात. (daily horoscope 17 November rashi bhavishya in marathi aajche rashi bhavishya)

  1. मेष राशी भविष्य / Aries Horoscope Today: आजच्या दिवसाची सुरुवात तुम्हाला प्रेरणा देणारी ठरेल. घरात लवकरच शुभकार्य होईल. आरोग सुदृढ राहील. ज्योतिषांच्या मते, दुपारी 2 ते 4 हा काळ महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी शुभ आहे. घरात सकारात्मक वातावरण असेल. आजचा शुभ रंग - पिवळा.
  2. वृषभ राशी भविष्य / Tauras Horoscope Today: तुमचा व्यवहार आणि इतर गोष्टी यामुळे नव्या संधी चालून येतील. कामाच्या ठिकाणी तुमचं कौतुक होईल. परदेश दौऱ्यावर जाण्याचा योग निर्माण होईल. आरोग्याची काळजी घ्या. ज्योतिषांच्या मते, रात्री 8 ते 10 हा काळ तुमच्यासाठी शुभ काळ आहे. आजचा शुभ रंग - लाल.
  3. मिथुन राशी भविष्य / Gemini Horoscope Today: आजचा दिवस तुमच्यासाठी रोमँटिक असेल. घरात लवकरच धार्मिक कार्य होईल. अचानक धनलाभ होईल. घरात आनंदाचे वातावरण असेल. आजचा शुभ रंग - हिरवा.
  4. कर्क राशी भविष्य / Cancer Horoscope Today: आजच्या दिवसाची सुरुवात तुमच्यासाठी चांगली असेल. तुमचा आत्मविश्वास वाढेल. नोकरीच्या ठिकाणी नवी जबाबदारी तुमच्यावर सोपवण्यात येईल. व्यापारात वाढ होईल. आजचा शुभ रंग - पांढरा आणि निळा.
  5. सिंह राशी भविष्य / Leo Horoscope Today: कुटुंबात छोट्या गोष्टीवरुन वाद होण्याची शक्यता आहे. आरोग्याची काळजी घ्या. मित्रांच्या सहकार्याने रखडलेले काम मार्गी लागेल. सासरवाडीतून चांगली बातमी मिळेल. आजचा शुभ रंग - पांढरा आणि नारंगी.
  6. कन्या राशी भविष्य / Virgo Horoscope Today: विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस उत्तम आहे. नोकरीत नवी जबाबदारी तुम्हाला मिळेल. उत्तम काम केल्याने तुमचे कौतुक होईल आणि बॉस खूश होतील. आरोग्याबाबत काही समस्या जाणवण्याची शक्यता आहे. आजचा शुभ रंग - लाल आणि केशरी.
  7. तूळ राशी भविष्य / Libra Horoscope Today: नोकरीत मन प्रसन्न राहील. व्यवसायात नवीन काम सुरू होईल. गुरू आणि मंगळ तुमच्यासाठी शुभ आहेत. आत्मविश्वास वाढेल. भगवान विष्णूची पूजा करा. आजचा शुभ रंग - हिरवा आणि आकाशी. 
  8. वृश्चिक राशी भविष्य / Scorpio Horoscope Today: आज गुंतवणूक करण्याचा विचार तुमच्या मनात येईल. व्यायवसायिकांना मोठा नफा होण्याची शक्यता आहे. कामानिमित्त दौरा होईल. आजचा दिवस तुमच्यासाठी खूपच लाभदायक असेल. आजचा शुभ रंग - केशरी आणि पांढरा. 
  9. धनु राशी भविष्य / Sagittarius Horoscope Today: नोकरीत बढतीबाबत चांगली बातमी मिळेल. नवीन करारामुळे व्यवसायात प्रगती होण्याची चिन्ह आहेत. घरी पाहुण्यांचे आगमन होईल. जुने मित्र-मैत्रिण बऱ्याच वर्षांनी भेटतील. आजचा शुभ रंग - केशरी आणि पांढरा.
  10. मकर राशी भविष्य / Capricorn Horoscope Today: नोकरीत बढती मिळण्याची दाट शक्यता आहे. कन्या राशीच्या मित्रांकडून तुम्हाल सहकार्य मिळेल. व्यवसायात चांगले मार्गदर्शन मिळाल्याने नफा होईल. अनावधानाने होणाऱ्या पैशाच्या खर्चावर नियंत्रण ठेवा. आजचा शुभ रंग - हिरवा आणि जांभळा.  
  11. कुंभ राशी भविष्य / Aquarius Horoscope Today:  विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस उत्तम आहे. चांगले यश मिळेल. मेष आणि कन्या राशीचे मित्र आज तुमच्या मदतीसाठी धावून येतील. आजचा शुभ रंग - लाल आणि पांढरा. 
  12. मीन राशी भविष्य / Pisces Horoscope Today: नवीन जबाबदारी तुम्हाला मिळू शकेल. प्रवासाची योजना पुढे ढकलणं योग्य नाही. मित्र-मैत्रिणींची भेट होण्याची शक्यता आहे. कामानिमित्त दौरा होण्याची शक्यता आहे. आजचा शुभ रंग - पिवळा आणि केशरी. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी