Daily Horoscope 18 November: आजचा शुक्रवार तुमच्यासाठी कसा? वाचा 12 राशींचे राशीभविष्य

Today's Horoscope 18 November 2022: आजचा दिवस कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल याबाबत सविस्तर माहिती जाणून घ्या. पाहूयात मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या बारा राशींसाठी कसा असेल हा दिवस?

Today's Horoscope
आजचे राशीभविष्य  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • पाहा आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असणार
  • जाणून घ्या 12 राशींसाठी आजचा दिवस कसा
  • तुमच्या राशीत आज काय लिहिलंय? वाचा

Daily Horoscope in Marathi; 18 November 2022 Rashi Bhavishya: आजचा दिवस कुठल्या राशीसाठी कसा असेल आणि कुठल्या राशीसाठी शुभ रंग काय असेल जाणून घेऊयात. (daily horoscope 18 November rashi bhavishya in marathi aajche rashi bhavishya)

  1. मेष राशी भविष्य / Aries Horoscope Today: व्यवसायात नफा होईल. आरोग्याची काळजी घ्या. श्री गणेशाची पूजा करा. प्रवासाचा योग आहे. नवी प्रॉपर्टी खरेदी करण्याचा विचार कराल. नोकरी करणाऱ्यांना चांगली बातमी मिळेल. आजचा शुभ रंग - पिवळा आणि लाल.
  2. वृषभ राशी भविष्य / Tauras Horoscope Today: गुंतवणूक करण्याचा विचार कराल. संपत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे. गुंतवणुकीतून तुम्हाला मोठा लाभ होण्याची शक्यता आहे. आजचा शुभ रंग - पांढरा.
  3. मिथुन राशी भविष्य / Gemini Horoscope Today: तब्येतीची काळजी घ्या. व्यवसायात निर्णय घेताना गोंधळात पडाल. अशावेळी वरिष्ठांचा सल्ला घेऊन मगच निर्णय घ्या. नवीन कराराने व्यवसायात प्रगती होण्याची चिन्हे आहेत. गरिबांना अन्न दान करा. आजचा शुभ रंग - हिरवा.
  4. कर्क राशी भविष्य / Cancer Horoscope Today: नोकरी आणि व्यवसायाच्या संदर्भात चांगली बातमी येईल. मित्र आणि नातेवाईकांची साथ तुम्हाला मिळेल. आजचा शुभ रंग - हिरवा आणि आकाशी.
  5. सिंह राशी भविष्य / Leo Horoscope Today: सातवा गुरू शुभ आहे. नोकरीत यश मिळाल्याने आनंदी राहाल. व्यवसायात चांगला नफा होईल. गरिबांना अन्न दान करा. आजचा शुभ रंग - हिरवा आणि जांभळा. 
  6. कन्या राशी भविष्य / Virgo Horoscope Today: शुक्र आणि चंद्र शुभ आहेत. व्यवसायात मोठा लाभ होण्याची शक्यता आहे. मित्रांचे सहकार्य मिळेल. घराच्या आवारात तुळशीचे रोप लावा. रखडलेले काम मार्गी लागण्यास सुरुवात होईल. आजचा शुभ रंग - पांढरा आणि जांभळा.
  7. तूळ राशी भविष्य / Libra Horoscope Today: घरात एखादी आनंदाची बातमी येईल. धार्मिक विधींसाठी आजचा दिवस उत्तम आहे. मित्रांची आज मदत होईल. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. आजचा शुभ रंग - पिवळा आणि हिरवा.
  8. वृश्चिक राशी भविष्य / Scorpio Horoscope Today: नोकरीच्या ठिकाणी तुमच्या कामाचे कौतुक होईल.  नोकरीतील बदलाशी संबंधित कोणताही निर्णय काळजीपूर्वक घ्या. नवीन व्यवसायाकडे वाटचाल करू शकाल. आजचा शुभ रंग - पिवळा.
  9. धनु राशी भविष्य / Sagittarius Horoscope Today: कामानिमित्त प्रवास होण्याची शक्यता आहे. घरी पाहुणे येतील. जुने-मित्रमंडळी भेटतील. प्रवासाची शक्यता आहे. नोकरीत बढतीची शक्यता आहे. बेल आणि तुळशीचे रोप लावा. आजचा शुभ रंग - निळा आणि पिवळा.
  10. मकर राशी भविष्य / Capricorn Horoscope Today: व्यवसायात नवीन प्रोजेक्ट सुरू करण्यासाठी आजचा दिवस अनुकूल आहे. हातात घेतलेले काम पूर्ण करा आणि मगच दुसरे काम हाती घ्या. कोणताही व्यवसाय किंवा योजना पुढे ढकलण्याचा निर्णय घेऊ नका. आजचा शुभ रंग - केशरी आणि पिवळा.
  11. कुंभ राशी भविष्य / Aquarius Horoscope Today: नोकरीत प्रगती होईल. व्यवसायात लाभ होईल. श्री गणेशाची पूजा करा. गरिबांना अन्न दान करा. घरबांधणी संदर्भात निर्णय घ्याल आणि त्याच कामात आज व्यस्त राहाल. आजचा शुभ रंग - लाल आणि पिवळा.
  12. मीन राशी भविष्य / Pisces Horoscope Today: नोकरीत प्रगती होईल. रखडलेले काम मार्गी लागण्यास सुरुवात होईल.  बेल आणि तुळशीचे रोप लावा. आजचा शुभ रंग - लाल आणि पिवळा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी