राशी भविष्य २ मार्च २०२१ : पाहा कसा जाईल तुमचा अंगारकीचा दिवस

Daily Horoscope राशी भविष्य, २ मार्च २०२१ : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या १२ राशींसाठी कसा असेल दिवस? जाणून घ्या या राशींचे डेली भविष्य

Daily Horoscope 2 March 2021 rashifal in marathi aajche rashi bhavishya
राशी भविष्य २ मार्च २०२१  |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

 • सिंह - आज जीभेवर आणि वागण्यावर संयम ठेवा.
 • वृश्चिक - मित्र, नातेवाईकांकडून सहकार्य मिळेल.
 • कुंभ - राजकारणात असलेल्या लोकांना यश मिळेल.

Daily Horoscope 2 March 2021 Rashi Bhavishya, राशी भविष्य २ मार्च २०२१ : कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस आणि कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ रंग काय आहे या सर्वांची सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा. जाणून घ्या मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या 12 राशींसाठी कसा असेल दिवस?

 1. मेष राश‍ी भविष्य / Aries Horoscope Today: बऱ्याच योजना आपल्या  मनावर परिणाम करतील. लव्ह लाइफमध्ये तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचा स्रोत देखील वाढण्याची शक्यता आहे. आजचा शुभ रंगः पिवळा
 2. वृषभ राश‍ी भविष्य / Tauras Horoscope Today: आधीच्या मेहनतीचे फळ आता मिळेल. धनप्राप्ती होण्याचे संकेत आहेत. घरात प्रसन्न वातावरण राहिल, पैसाही खेळता राहील. आजचा शुभ रंगः तपकिरी
 3. मिथुन राश‍ी भविष्य / Gemini Horoscope Today:  उद्योगात नव्या आव्हानांना सामोरं जावं लागेल पण लाभ होईल. आरोग्यासंबंधी काही समस्या उद्भवतील. आजचा शुभ रंगः हिरवा. 
 4. कर्क राश‍ी भविष्य / Cancer Horoscope Today: आयटी, बँकिंग आणि मीडियाशी संबंधित लोक त्यांच्या कठोर परिश्रमांमुळे आपल्या उच्च अधिकाऱ्यांना प्रसन्न करतील. आरोग्य चांगलं राहिल. आजचा शुभ रंगः पांढरा.
 5. सिंह राश‍ी भविष्य / Leo Horoscope Today: आज जीभेवर आणि वागण्यावर संयम ठेवा. हितशत्रूपासून सावध रहा. आरोग्याची काळजी घ्या. परदेशात असलेल्या प्रियजनांकडून शुभ वार्ता मिळतील. आजचा शुभ रंग - राखाडी
 6. कन्या राश‍ी भविष्य / Virgo Horoscope Today:स्थायी संपत्तीद्वारे तुम्हाला मोठा लाभ मिळण्याची शक्यता आहे. प्रॉपर्टी ब्रोकर्ससाठी ही शुभ वेळ आहे. जोडीदाराचे सहकार्य लाभेल. थांबलेली कामे पूर्ण होतील. घाई करू नका. आजचा शुभ रंगः निळा
 7. तूळ राश‍ी भविष्य / Libra Horoscope Today: आज पहिलं काम झाल्याशिवाय दुसरं काम हातात घेऊ नये. पैशाचं आगमन आज निश्चित आहे. वैवाहिक जीवन सुखी असेल. आजचा शुभ रंगः  तांबडा
 8. वृश्चिक राश‍ी भविष्य / Scorpio Horoscope Today: मित्र, नातेवाईकांकडून सहकार्य मिळेल. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. वेळेचा सदुपयोग कराल. जोखीम उचलण्याची तयारी दाखवाल. धन प्राप्ती होऊ शकते. आजचा शुभ रंगः नारंगी.
 9. धनु राश‍ी भविष्य / Sagittarius Horoscope Today: कौटुंबिक जीवनाच्या दृष्टीने आजचा दिवस आनंदी असेल. कुटुंबातील सदस्यांबरोबर आनंदाचे क्षण घालवाल. व्यापारी क्षेत्रातही अनुकूल वातावरण असेल. आजचा शुभ रंग - हिरवा.
 10. मकर राश‍ी भविष्य / Capricorn Horoscope Today: आज तुम्ही बौद्धिक कार्य आणि लेखनात व्यग्र असाल. नवीन काम सुरू करण्यास दिवस उत्तम आहे. व्यवसायात लाभ होईल. आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी. आजचा शुभ रंग - नारंगी
 11. कुंभ राश‍ी भविष्य / Aquarius Horoscope Today:  राजकारणात असलेल्या लोकांना यश मिळेल. धनाचं आगमन होईल. रिलेशनशिपमध्ये असलेल्या लोकांना विवाह करण्याची योग्य वेळ आहे. आजचा शुभ रंगः हिरवा. 
 12. मीन राश‍ी भविष्य / Pisces Horoscope Today:  नेतृत्वगुण चांगले असल्याने त्याचा फायदा होईल. आज तुमच्यामध्ये भरपूर आत्मविश्वास असेल. जुनी देणी वसूल होतील. चांगले कार्य हातून घडेल. आजचा शुभ रंगः राखाडी

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी