राशी भविष्य २१ एप्रिल २०२१ : जाणून घ्या रामनवमीचे तुमचे भविष्य

Horoscope राशी भविष्य, २१ एप्रिल २०२१ : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या १२ राशींसाठी कसा असेल दिवस? जाणून घ्या या राशींचे डेली भविष्य...

Horoscope 21 April 2021 rashifal in marathi rashi bhavishya
राशी भविष्य २१ एप्रिल २०२१ :  |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • रामनवमी उत्सव
  • रामदास जयंती
  • नवरात्री समाप्ती, स्वामी नारायण जयंती

Horoscope 20 April 2021 Rashi Bhavishya, आजचे राशी भविष्य २० एप्रिल २०२१: कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस आणि कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ रंग काय आहे या सर्वांची सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा. जाणून घ्या मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या 12 राशींसाठी कसा असेल दिवस?

  1. मेष राश‍ी भविष्य / Aries Horoscope Today: कोणत्याही कार्यात यशप्राप्तीसाठी थोडा विलंब होईल. व्यवसायात अनुकूल परिस्थिती राहील. नोकरीत पदोन्नती होईल. आई-वडिलांचा आशीर्वाद घ्या. तुमच्या कार्यपद्धतीमुळे उच्चवर्गीय अधिकाऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळेल. शुभ रंग - पोपटी.
  2. वृषभ राश‍ी भविष्य / Tauras Horoscope Today: भावुक होऊन कोणताही निर्णय घेऊ नका. मित्रपरिवारांची उत्तम साथ मिळेल. त्यामुळे, जीवनात आनंदप्राप्त होईल. आपल्या आरोग्याची विशेष काळजी घ्या. शुभ रंग - नारंगी.
  3. मिथुन राश‍ी भविष्य / Gemini Horoscope Today: मानसिक आणि शारीरिक आरोग्य चांगल राहील. दिवस आनंदात जाईल. दिवसातील सर्व कामे योजनेनुसार पुर्ण होतील. धन लाभ होण्याची शक्यता आहे. आरोग्य उत्तम असेल. आजारी नागरिकांचे आरोग्य सुधारेल. गुंतागुंतीची कार्यालयीन कामे पुर्ण होतील. शुभ रंग - पिवळा.
  4. कर्क राश‍ी भविष्य / Cancer Horoscope Today: तुम्ही बौद्धिक कार्य आणि लेखनात व्यग्र असाल. नवीन काम सुरू करण्यास दिवस उत्तम आहे. मित्रांचे चांगले सहकार्य मिळेल. व्यवसायात लाभ होईल. आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी. शुभ रंग - राखाडी.
  5. सिंह राश‍ी भविष्य / Leo Horoscope Today: धार्मिक कार्यांची आवड निर्माण होईल. आध्यात्मिक ज्ञानात वाढ होण्याची शक्यता आहे. आयटी आणि मार्केटिंग क्षेत्रातील व्यक्ती यशस्वी राहतील. मुलांचे यश तुम्हाला आनंद देऊन जाईल. आरोग्य चांगले राहील. शुभ रंग - निळा.
  6. कन्या राश‍ी भविष्य / Virgo Horoscope Today: दिवस संमिश्र स्वरूपाचा असेल. जीभेवर आणि वागण्यावर संयम ठेवा. रागावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. शत्रूपासून सावध रहा. शुभ रंग - हिरवा.
  7. तूळ राश‍ी भविष्य / Libra Horoscope Today: या राशीच्या विद्यार्थ्यांना मिळत असलेल्या यशामुळे ते आनंदी राहतील. व्यवसायात नफा झाल्याने मन प्रसन्न होईल. पैसे मिळण्याची शक्यता आहे. वाहन चावताना काळजी घ्या. शुभ रंग - लाल. 
  8. वृश्चिक राश‍ी भविष्य / Scorpio Horoscope Today: घरात सुख शांतीचे वातावरण राहील. थांबलेले पैसे अथवा धन प्राप्त होईल. नव्या कामाची सुरूवात करू शकता. आरोग्याची काळजी घ्या. शुभ रंग - आकाशी.
  9. धनु राश‍ी भविष्य / Sagittarius Horoscope Today: दिवस संमिश्र स्वरूपाचा असेल. व्यापारी त्यांच्या व्यवसायात पैसा गुंतवून नवीन व्यवसाय करू शकतात. भविष्यासाठी योजना तयार कराल. आरोग्याची काळजी घ्या. शुभ रंग - निळा.
  10. मकर राश‍ी भविष्य / Capricorn Horoscope Today: दिवस चिंतेनं आणि काळजीनं भरलेला असेल. आरोग्य बिघडू शकते. विद्यार्थ्यांच्या अभ्यासामध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो. अचानक धन लाभ होईल. शुभ रंग - मोरपंखी.
  11. कुंभ राश‍ी भविष्य / Aquarius Horoscope Today: परमेश्वराचं नामस्मरण केल्याने मन प्रसन्न होईल. घरातील वातावरण आनंददायी असेल. मित्र आणि प्रियजनांकडून भेटवस्तू मिळू शकते. व्यवसायिक क्षेत्रात प्रभाव निर्माण करू शकता. शुभ रंग - निळा.
  12. मीन राश‍ी भविष्य / Pisces Horoscope Today: हा दिवस तुमच्यासाठी शुभ आहे. आपल्या गोड बोलण्याने आपण कोणाचेही मन जिंकू शकता. आपण हाती घेतलेलं काम पुर्ण होईल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. शुभ रंग - पोपटी.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी