Daily Horoscope 21 February 2023: मंगळवारी या राशींना मिळेल यश; जाणून घ्या आज कसं असेल तुमचं राशीभविष्य

Daily Horoscope 21 February 2023: ग्रह नक्षत्राच्या बदलात कोणकोणत्या राशीच्या लोकांना लाभ होईल आणि कोणकोणत्या राशीच्या लोकांना नुकसान होईल, कोणत्या राशीच्या लोकांना​ नफा आणि कोणत्या राशीच्या लोकांना​ तोटा होईल हे जाणून घेऊ.

 Daily Horoscope 21 February 2023; rashi bhavishya in marathi
आठवड्याचा दुसरा दिवस कसा असेल तुमच्यासाठी, जाणून घ्या   |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • तूळ राशीच्या लोकांच्या जोडीदाराची साथ तुम्हाला अनेक समस्यांपासून मुक्ती होईल.
  • कोणकोणत्या राशीच्या लोकांना लाभ होईल आणि कोणकोणत्या राशीच्या लोकांना नुकसान होईल
  • मिथुन राशीच्या लोकांच्या कौटुंबिक आनंदात वाढ होईल

Daily Horoscope 21 February 2023: मिथुन राशीच्या लोकांच्या कौटुंबिक आनंदात वाढ होईल आणि नवीन मित्र लाभतील. तर तूळ राशीच्या लोकांच्या जोडीदाराची साथ तुम्हाला अनेक समस्यांपासून मुक्ती होईल. अजून इतर राशींचं कसं असेल भविष्य आपण जाणून घेऊ.. (Daily Horoscope 21 February 2023; rashi bhavishya in marathi)

अधिक वाचा  : रुपाली भोसलेचं 'रेड हॉट' रुप पाहून चाहते घायाळ

मेष  

मेष राशीच्या लोकांसाठी दिवस शुभ राहील आणि तुमची अनेक प्रलंबित कामे आज पूर्ण होतील.  आज तुम्हाला मन शांत ठेवावे लागेल. तुमचे शांत मन तुम्हाला अनेक संकटांपासून वाचवेल.  शुभ रंग - जांभळा


वृषभ 

जर तुमचे काही मालमत्तेशी संबंधित काही वाद असतील तर आज नुकसान होण्याची शक्यता आहे. भौतिक सुखाच्या साधनांमध्ये वाढ होईल. तुम्ही तुमचा मुद्दा योग्य पद्धतीने लोकांसमोर मांडू शकाल. जे लोक मेहनत घेत आहेत त्यांना त्यांच्या मेहनतीचं फळ मिळणार आहे.  शुभ रंग - राखाडी 

अधिक वाचा  : चंद्राची पाहून अदा अनेक सर्जेराव फिदा

मिथुन 

मिथुन राशीच्या लोकांसाठी दिवस शुभ परिणाम देणारा आहे. नवीन व्यवसायासाठी चांगली योजना कराल. तुम्ही कर्जाची परतफेड करण्यात मोठ्या प्रमाणात यशस्वी व्हाल.  तर तुमच्या कुटु्ंबात आज आनंद राहील. तसेच तुम्हाला नवीन मित्र मिळतील. शुभ रंग - निळा

कर्क  

या राशीतील प्रेमींसाठी आजचा दिवस खूप भारी आहे. त्यांना त्यांच्या प्रिय व्यक्तीकडून गिफ्ट मिळण्याची शक्यता आहे.  तर जे लोक वाहन चालवणार असतील त्यांनी सावधपणे  वाहन चालवावीत. आजचा शुभ रंग - पिवळा 

अधिक वाचा  :  February 2023 Marathi Calendar : फेब्रुवारी 2023 मधील व्रत, सण, जयंती, पुण्यतिथी, महत्त्वाचे दिवस

सिंह 

सिंह राशीच्या लोकांना भाग्य अनुकूल करेल आणि तुम्हाला जुन्या मित्रांच्या मदतीने कार्यक्षेत्रात अनुकूलता मिळेल. तुमची मेहनत आणि आत्मविश्वास वाढेल.  मेहनतीचे फळ आज मिळण्याची शक्यता आहे. आई-वडिलांची सेवा करा तुम्हाला पुण्य मिळेल. 

कन्या  

या राशीतील लोकांसाठी आजजचा दिवस फार चांगला नाही. नवीन कामामुळे तुम्ही व्यस्त असाल.  मित्रांसोबत आज वाद होण्याची शक्यता आहे.  तुमच्या कामाच्या ठिकाणी प्रत्येक निर्णय खूप विचार करूनच घ्या. नफा-तोटा या सर्व बाबींचा विचार करा. आजचा शुभ रंग - आकाशी 

अधिक वाचा  : शाहरुख खानच्या मॅनेजरची कमाई पाहून व्हाल थक्क

तूळ 

तूळ राशीच्या लोकांचे नशीब आज धनाच्या बाबतीत साथ देत आहे. या राशीतील काही लोक संध्याकाळपासून रात्रीपर्यंतचा वेळ काही शुभ कार्यक्रमात घालवतील. दरम्यान तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून मदत मिळेल.  शुभ रंग - केसरी 

वृश्चिक 

वृश्चिक राशीच्या लोकांचे नशीब साथ देत आहे आणि आज नियोजित केलेली सर्व कामे सहज पूर्ण होतील. वैयक्तिक आणि व्यावसायिक बाबींमध्ये अडचणी दूर होतील. शुभ रंग-  लाल

अधिक वाचा  :  दीपक चहरचे पत्नीसोबत Romantic फोटो; कोणाची नजर न लागो या जोडप्याला

धनु 

आजचा दिवस या राशीसाठी खुप लाभ देणारा आहे. या राशीतील काही लोकांच्या संपत्ती वाढ होण्याची शक्यता आहे.   परंतु काहींसाठी आजचा दिवस तणावपूर्ण असेल.  शुभ रांग - पांढरा

मकर 

मकर राशीच्या लोकांसाठी दिवस यशस्वी असणार आहे.  तुमचे बोलण्याचे कौशल्य आणि स्पष्टता तुम्हाला यश मिळवून देऊ शकते. व्यवहारात सावधगिरी बाळगा.  शुभ रंग - नारंगी 

कुंभ  

विवाहित लोकांसाठी आजचा दिवस जरा चिंतेचा असेल. त्यांना  आज तणावाचा सामना करावा लागेल.  तुमची कोणतीही जुनी रखडलेली कामे काही अडचणी आणि खर्चानंतर पूर्ण होतील. संध्याकाळी धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी  शकते शुभ रंग -  तपकिरी

मीन 

मुलाकडून आनंदाची बातमी मिळेल आणि नशीब तुम्हाला साथ देईल. आजचा दिवस कमी खर्चाचा असेल. परंतु प्रेमी जोडप्यांसाठी आज सबुरी घ्यावी लागेल, आज तुमच्या दोघांमध्ये भांडण होऊ शकते. शुभ रंग - पिवळा 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी