Daily Horoscope 21 November: आजपासून या राशीच्या व्यक्तींचे अच्छे दिन, वाचा तुमच्यासाठी कसा असेल आजचा दिवस

Today's Horoscope 21 November 2022: आजचा दिवस कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल याबाबत सविस्तर माहिती जाणून घ्या. पाहूयात मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या बारा राशींसाठी कसा असेल हा दिवस?

Today's Horoscope
आजचे राशीभविष्य  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
 • पाहा आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असणार
 • जाणून घ्या 12 राशींसाठी आजचा दिवस कसा
 • तुमच्या राशीत आज काय लिहिलंय? वाचा

Daily Horoscope in Marathi; 21 November 2022 Rashi Bhavishya: आजचा दिवस कुठल्या राशीसाठी कसा असेल आणि कुठल्या राशीसाठी शुभ रंग काय असेल जाणून घेऊयात. (daily horoscope 21 November rashi bhavishya in marathi aajche rashi bhavishya)

 1. मेष राशी भविष्य / Aries Horoscope Today: आईच्या आरोग्याची काळजी घ्या. नोकरीच्या ठिकाणी अधिकारी वर्गाचे चांगले सहयोग मिळेल. मात्र, कामानिमित्त इतरत्र बदली होण्याची शक्यता आहे. कुटुंबासोबत एखादी धार्मिक यात्रा होऊ शकते. रखडलेले काम मार्गी लागेल. आजचा शुभ रंग - पिवळा आणि लाल.
 2. वृषभ राशी भविष्य / Tauras Horoscope Today: मनात निराशा आणि असंतोष असू शकतो. आत्मविश्वासाची कमी जाणवेल. खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे. नोकरीत प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. संपत्तीत वाढ होईल. आजचा शुभ रंग - पांढरा.
 3. मिथुन राशी भविष्य / Gemini Horoscope Today: खर्चात वाढ होऊ शकते. कुटुंबासोबत धार्मिक यात्रा होऊ शकते. उत्पन्नात वाढ होऊ शकते. नव्या नोकरीची संधी चालून येईल. मित्र परिवाराची साथ मिळेल. आजचा शुभ रंग - नारंगी.
 4. कर्क राशी भविष्य / Cancer Horoscope Today: आत्मविश्वासात कमी जाणवेल. रागाच्या भरात कोणताही टोकाचा निर्णय घेऊ नका. शांत रहा. कुटुंबात धार्मिक कार्य होतील. मित्रासोबत मिळून गुंतवणूक करण्याचा विचार कराल. आजचा शुभ रंग - हिरवा आणि निळा.
 5. सिंह राशी भविष्य / Leo Horoscope Today: एखादी अतिरिक्त जबाबदारी तुमच्यावर सोपवली जाण्याची शक्यता आहे. मनात एखाद्या गोष्टीबाबत चिंता असेल. इच्छे विरुद्ध एखाद्या कामाची जबाबदारी तुमच्यावर सोपवली जाण्याची शक्यता आहे. आजचा शुभ रंग - नारंगी आणि केशरी.
 6. कन्या राशी भविष्य / Virgo Horoscope Today: व्यवसाय वाढीला सुरुवात होईल. व्यवसायात भावंडांकडून चांगले सहकार्य मिळेल मात्र, परिश्रम सुद्धा वाढतील. आयात-निर्यात व्यवसायात लाभ होण्याचे संकेत आहेत. अचानक धनलाभ होईल. वाहन खरेदी कराल. आजचा शुभ रंग - पिवळा.
 7. तूळ राशी भविष्य / Libra Horoscope Today: घरात आनंदाचे वातावरण असेल. जोडीदारासोबत किरकोळ गोष्टीवरुन वाद होतील. कार्यक्षेत्रात बदल होण्याची शक्यता आहे. नोकरीच्या ठिकाणी सहकाऱ्यांचे चांगले सहकार्य मिळेल. लवकरच आनंदाची बातमी मिळेल. आजचा शुभ रंग - लाल आणि नारंगी.
 8. वृश्चिक राशी भविष्य / Scorpio Horoscope Today: आत्मविश्वासात कमी जाणवेल मात्र, कुटुंबातील सदस्यांचे चांगले सहकार्य तुम्हाला मिळेल. कुटुंबासोबत एखाद्या धार्मिकस्थळी जाण्याचा योग निर्माण होईल. आरोग्याची काळजी घ्या. खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे. आजचा शुभ रंग - नारंगी आणि पांढरा.
 9. धनु राशी भविष्य / Sagittarius Horoscope Today: नकारात्मक विचारांपासून दूर रहा. व्यवसायानिमित्त परदेश दौरा होऊ शकतो. आजचा दिवस धावपळीचा असेल. मित्र-परिवारांचे कामात चांगले सहकार्य मिळेल. मित्रांसोबत बाहेर फिरायला जाण्याचं प्लानिंग कराल. आजचा शुभ रंग - पिवळा.
 10. मकर राशी भविष्य / Capricorn Horoscope Today: रागावर नियंत्रण ठेवा. व्यवसायात परिवर्तनाचे संकेत मिळतील. उत्पन्नात वाढ होऊ शकते. मानसिक शांती मिळेल. नोकरीत परिवर्तन होऊ शकते. आरोग्याची काळजी घ्या. जोडीदाराचे चांगले सहकार्य मिळेल. आजचा शुभ रंग - निळा आणि लाल.
 11. कुंभ राशी भविष्य / Aquarius Horoscope Today: व्यवसायात चांगला लाभ होईल. उत्पन्नात वाढ होईल. मात्र, त्याप्रमाणे खर्चातही वाढ होईल. धनलाभ होण्याची शक्यता आहे. आजचा शुभ रंग - पांढरा.
 12. मीन राशी भविष्य / Pisces Horoscope Today: मन प्रसन्न राहील. कुटुंबात सुख-शांतीचे वातावरण असेल. धावपळीचा दिवस असेल. नोकरीच्या ठिकाणी अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. आरोग्य सुदृढ राहील. अचानक धनलाभ होण्याचे संकेत आहेत. आजचा शुभ रंग - हिरवा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी