Daily Horoscope 22 December: 'या' राशीच्या व्यक्तींना आनंदाची बातमी मिळेल, व्यापारात होईल मोठा लाभ

Today's Horoscope 22 December 2022: आजचा दिवस कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल याबाबत सविस्तर माहिती जाणून घ्या. पाहूयात मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या बारा राशींसाठी कसा असेल हा दिवस?

Today's Horoscope
आजचे राशीभविष्य 
थोडं पण कामाचं
  • पाहा आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असणार
  • जाणून घ्या 12 राशींसाठी आजचा दिवस कसा
  • तुमच्या राशीत आज काय लिहिलंय? वाचा

Daily Horoscope in Marathi; 22 december 2022 Rashi Bhavishya: आजचा दिवस कुठल्या राशीसाठी कसा असेल आणि कुठल्या राशीसाठी शुभ रंग काय असेल जाणून घेऊयात. (daily horoscope 22 december rashi bhavishya in marathi aajche rashi bhavishya)

  1. मेष राशी भविष्य / Aries Horoscope Today: आज तुमची खास इच्छा पूर्ण होऊ शकते. तुमचे रखडलेले काम पूर्ण झाल्याने आनंदात असाल. मित्राच्या घरी जाण्याची शक्यता आहे. विरोधकांपासून सावध रहा. आजचा शुभ रंग - नारंगी.
  2. वृषभ राशी भविष्य / Tauras Horoscope Today: विनाकारण चिंता करू नका. वायफळ खर्च टाळा. वाद-विवाद टाळा. अतिरिक्त धन सुरक्षित ठिकाणी गुंतवणूक करा. लवकरच आनंदाची बातमी मिळेल. आजचा शुभ रंग - केशरी.
  3. मिथुन राशी भविष्य / Gemini Horoscope Today: विद्यार्थी अभ्यासात प्रगती करतील. तुमच्यातील लिडरशिप क्वॉलिटी करिअर चांगले बनवण्यासाठी फायदेशीर होईल. संपत्तीत गुंतवणूक कराल. आजचा शुभ रंग - पिवळा.
  4. कर्क राशी भविष्य / Cancer Horoscope Today: अचानक प्रवासाचं नियोजन केल्यास थकवा जाणवण्याची शक्यता आहे. आज गुंतवणूक करणं टाळा. संपत्तीमुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. शक्य असल्यास थंड डोक्याने वाद सोडवण्याचा प्रयत्न करा. आजचा शुभ रंग - लाल.
  5. सिंह राशी भविष्य / Leo Horoscope Today: हाती घेतलेले काम पूर्ण होण्यास थोडा वेळ लागेल. आरोग्याची काळजी घ्या. आजचा दिवस धावपळीचा असू शकतो. व्यापाऱ्यांना कामानिमित्त वेगवेगळ्या ठिकाणी भेट द्यावी लागेल. व्यापारात मोठा नफा होईल. आजचा शुभ रंग - निळा.
  6. कन्या राशी भविष्य / Virgo Horoscope Today: धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. योग आणि अध्यात्मिक क्षेत्रातील व्यक्तींसाठी आजचा दिवस उत्तम आहे. परदेश दौरा होण्याची शक्यता आहे. नव्या योजना बनवाल. आजचा शुभ रंग - हिरवा आणि लाल.
  7. तूळ राशी भविष्य / Libra Horoscope Today: इच्छाशक्ती कमी असल्याने भावनात्मक आणि मानसिक समस्या उद्भवण्याची शक्यता आहे. खर्चात वाढ होईल मात्र, त्यासोबतच उत्पन्नातही वाढ होईल. नातेवाईकांकडे येणं-जाणं होऊ शकतं. आजचा शुभ रंग - केशरी आणि लाल.
  8. वृश्चिक राशी भविष्य / Scorpio Horoscope Today: आज धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. आई-वडिलांसोबत मंदिरात देव दर्शनाला जाल. आरोग्याची काळजी घ्या. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस चांगला आहे. आजचा शुभ रंग - पिवळा आणि लाल.
  9. धनु राशी भविष्य / Sagittarius Horoscope Today: आर्थिक लाभ होईल. गुंतवणूक करण्याच्या संदर्भात इतरांचा सल्ला घेण्याऐवजी स्वत: थोडा अभ्यास करुन मगच निर्णय घ्या. लवकरच आनंदाची बातमी मिळेल. आरोग्य चांगले राहील. आजचा शुभ रंग - पिवळा आणि नारंगी.
  10. मकर राशी भविष्य / Capricorn Horoscope Today: कामात आणि व्यापारात प्रगती दिसून येईल. कामाच्या ठिकाणी पदोन्नती होण्याची संकेत आहेत. व्यापारात वृद्धी होईल आणि धनलाभ सुद्धा होईल. रखडलेले काम मार्गी लागेल. आजचा शुभ रंग - नारंगी आणि पिवळा. 
  11. कुंभ राशी भविष्य / Aquarius Horoscope Today: नव्या नोकरीची संधी चालून येईल. तुम्हाला भेडसावत असलेल्या समस्यांवर लवकरच तोडगा निघेल. भावनांवर नियंत्रण ठेवा. आजचा शुभ रंग - लाल आणि निळा.
  12. मीन राशी भविष्य / Pisces Horoscope Today: सामाजिक क्षेत्रात तुमच्या कामाचे कौतुक होईल. आर्थिक स्थिती उत्तम असेल. मेहनतीच्या जोरावर तुम्हाला चांगले यश प्राप्त होईल. आजचा शुभ रंग - पिवळा आणि पांढरा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी