राशी भविष्य २२ फेब्रुवारी २०२१ : पाहा कशी असेल आठवड्याची सुरुवात

Daily Horoscope राशी भविष्य, २२ फेब्रुवारी २०२१ : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या १२ राशींसाठी कसा असेल दिवस? जाणून घ्या या राशींचे डेली भविष्य

Horoscope
राशी भविष्य 

थोडं पण कामाचं

  • कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ आहे
  • वृश्चिक राशीच्या व्यक्तींना गुंतवणुकीतून फायदा मिळेल
  • मीन राशीच्या व्यक्तींना आज नशिबाची साथ मिळेल

Daily Horoscope 22 February 2021 Rashi Bhavishya, राशी भविष्य २२ फेब्रुवारी २०२१ : कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस आणि कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ रंग काय आहे या सर्वांची सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा. जाणून घ्या मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या 12 राशींसाठी कसा असेल दिवस?

  1. मेष राश‍ी भविष्य / Aries Horoscope Today: आरोग्याची काळजी घ्या. प्रलंबित कामं पूर्ण होतील. आयटी आणि मीडिया क्षेत्रातील लोकांच्या कार्यात प्रगती होईल. विद्यार्थ्यांच्या शिक्षणात प्रगती होईल. आजचा शुभ रंग - पिवळा.
  2. वृषभ राश‍ी भविष्य / Tauras Horoscope Today: नवीन कार्याचा शुभारंभ आज करू शकता. कामा-धंद्यात कठिण परिश्रम करावं लागेल. वैचारिकदृष्ट्या गोष्टींमुळे मनात चिंता सतावत राहील. प्रेमळ व्यक्तीच्या भेटीमुळे, मन प्रफुल्लित राहील. कुटुंबात आनंदीत वातावरण असेल. आजचा शुभ रंग - निळा.
  3. मिथुन राश‍ी भविष्य / Gemini Horoscope Today: व्यापार आणि नोकरीतील प्रलंबित कामं पूर्ण होतील. धनलाभ होण्याची शक्यता आहे. मित्र-मैत्रिणींची भेट होईल. दाम्पत्यांमध्ये अनुकूल वातावरण राहील. मन स्थिर राहील. आजचा शुभ रंग - पांढरा.
  4. कर्क राश‍ी भविष्य / Cancer Horoscope Today: व्यापार आणि नोकरीत उन्नती होईल. उच्चवर्गीय पदाधिकाऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळेल. भगवान श्री गणेशाची पूजा करा. अनपेक्षित खर्च करणं टाळा. बाहेर फिरायला जाऊ शकता. समाजात मान-सन्मान मिळेल. आजचा शुभ रंग - लाल. 
  5. सिंह राश‍ी भविष्य / Leo Horoscope Today: नवीन कार्याचा शुभारंभ आज करू शकता. आरोग्याची काळजी घ्या. प्रतिस्पर्धींवर विजय मिळवू शकता. भगवान श्री गणेशाची पूजा करा. कुटुंबात अनुकूल वातावरण राहील. आजचा शुभ रंग - पिवळा.
  6. कन्या राश‍ी भविष्य / Virgo Horoscope Today: आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणात नवनवीन संधी उपलब्ध होतील. प्रतिस्पर्धींशी स्पर्धा करू नका. कठिण परिश्रमानंतर तुमच्या कामात यश येईल. आरोग्य निरोगी राहील. आजचा शुभ रंग - हिरवा.
  7. तूळ राश‍ी भविष्य / Libra Horoscope Today: कुटुंबात मतभेद होण्याची शक्यता आहे. नकारात्मक गोष्टी मनातून दूर करा. वायफळ खर्च करणं टाळा. मित्र-मैत्रिणींकडून तुम्हाला चांगलं सहकार्य मिळेल. आजचा शुभ रंग - पांढरा.
  8. वृश्चिक राश‍ी भविष्य / Scorpio Horoscope Today: गुंतवणुकीतून फायदा मिळेल. व्यापाऱ्याच्या दृष्टीने केलेल्या प्रवासाचे फायदे होतील. अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे. रखडलेली कामे मार्गी लागतील. आजचा शुभ रंग - जांभळा.
  9. धनु राश‍ी भविष्य / Sagittarius Horoscope Today: वाद-विवाद टाळण्याचा प्रयत्न करा. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस शुभ राहील. रखडलेली कामं पूर्ण होतील. वैवाहिक आयुष्यात तुम्हाला प्रसन्नता मिळेल. आजचा शुभ रंग - लाल.
  10. मकर राश‍ी भविष्य / Capricorn Horoscope Today: व्यवसायात होणाऱ्या प्रगतीमुळे प्रसन्न राहाल. राजकारणात यश मिळाल्याने आनंदी रहाल. धन लाभ होण्याची शक्यता आहे. प्रेम प्रकरणात तणाव निर्माण होऊ शकतो. आजचा शुभ रंग - निळा.
  11. कुंभ राश‍ी भविष्य / Aquarius Horoscope Today: पैसा मिळण्याची शक्यता आहे. दाम्पत्याच्या जीवनात आनंदी वातावरण निर्माण होईल. आरोग्य सुद्धा चांगले राहील. आजचा शुभ रंग - पिवळा.
  12. मीन राश‍ी भविष्य / Pisces Horoscope Today: आज तुम्हाला नशिबाची साथ मिळेल. व्यापारात लाभ होण्याची शक्यता आहे. काम करण्याच्या पद्धतीने तुम्हाला फायदा होईल. प्रत्येक गोष्टीबाबत बारकाईने विचार करा. दुसऱ्यांची मदत घ्यावी लागेल. शुभ रंग - पांढरा. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी