Daily Horoscope 23 November: या राशीच्या व्यक्तींना आनंदाची बातमी मिळणार

Today's Horoscope 23 November 2022: आजचा दिवस कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल याबाबत सविस्तर माहिती जाणून घ्या. पाहूयात मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या बारा राशींसाठी कसा असेल हा दिवस?

Today's Horoscope
आजचे राशीभविष्य 
थोडं पण कामाचं
  • पाहा आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असणार
  • जाणून घ्या 12 राशींसाठी आजचा दिवस कसा
  • तुमच्या राशीत आज काय लिहिलंय? वाचा

Daily Horoscope in Marathi; 23 November 2022 Rashi Bhavishya: आजचा दिवस कुठल्या राशीसाठी कसा असेल आणि कुठल्या राशीसाठी शुभ रंग काय असेल जाणून घेऊयात. (daily horoscope 23 November rashi bhavishya in marathi aajche rashi bhavishya)

  1. मेष राशी भविष्य / Aries Horoscope Today: मन प्रसन्न राहील. धनलाभ होईल. नवीन गाडी खरेदी करण्याबाबत विचार कराल. संपत्तीत गुंतवणूक करण्याची योजना आखाल. जोडीदारासोबत वैचारिक मतभेद होऊ शकतात. धार्मिक कार्यात रुची वाढेल. आजचा शुभ रंग - हिरवा आणि जांभळा. 
  2. वृषभ राशी भविष्य / Tauras Horoscope Today: प्रगतीच्या संधी उपलब्ध होतील. उत्पन्नात वाढ होईल. नोकरी किंवा कामानिमित्त दूरचा प्रवास होईल. आरोग्याची काळजी घ्या. गुंतवणूक करण्यावर भर द्याल. आजचा शुभ रंग - लाल आणि जांभळा.
  3. मिथुन राशी भविष्य / Gemini Horoscope Today: वाणीत गोडवा राहील मात्र, संयम कमी होऊ शकतो. धनलाभ होईल. संपत्ती संदर्भातील कोर्ट-कचेरीतील प्रकरणात तुमच्या बाजूने निकाल लागेल. संपत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे. गोड पदार्थ खाण्यात रस वाढेल. स्वभावात हट्टीपणा राहील. आजचा शुभ रंग - पांढरा.
  4. कर्क राशी भविष्य / Cancer Horoscope Today: हाती घेतलेल्या कामात तुम्हाला यश मिळेल. धनलाभ होण्याची शक्यता आहे. कुटुंबात धार्मिक कार्ये होतील. संपत्तीतून पैसे मिळतील. जोडीदारासोबत वैचारिक मतभेद होऊ शकतात. संयम ठेवण्याचा प्रयत्न करा. आजचा शुभ रंग - पिवळा.
  5. सिंह राशी भविष्य / Leo Horoscope Today: या राशीत शनी व्यवसायासाठी शुभ आहे. शिक्षण क्षेत्रातील व्यक्तींसाठी आजचा दिवस शुभ आहे. आनंदाची बातमी मिळेल. आजचा शुभ रंग - लाल आणि पिवळा.
  6. कन्या राशी भविष्य / Virgo Horoscope Today: घरातील वडिलधाऱ्यांच्या तब्येतीची काळजी घ्या. कुटुंबीयांसोबत धार्मिक स्थळी जाण्याची योजना आखाल. मित्रांच्या मदतीने रखडलेले पैसे मिळू शकतात. नोकरी-व्यवसायात अडचणींचा सामना करावा लागू शकतो. स्वभावात चिडचिडेपणा राहील. आजचा शुभ रंग - लाल आणि निळा.
  7. तूळ राशी भविष्य / Libra Horoscope Today: नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेत अपेक्षित यश मिळेल. मालमत्तेच्या व्यवसायात चांगला लाभ मिळेल. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. आजचा शुभ रंग - पांढरा. 
  8. वृश्चिक राशी भविष्य / Scorpio Horoscope Today: नवं घर खरेदी करण्याच्या किंवा बांधण्याच्या संदर्भात निर्णय घेऊ शकता. शुक्र आणि बुधाचे संक्रमण अनुकूल आहे. रखडलेली कामे मार्गी लागतील. तिळाचे दान करा. आजचा शुभ रंग - पिवळा आणि लाल.
  9. धनु राशी भविष्य / Sagittarius Horoscope Today: विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस शुभ आहे. घरात एखादे शुभ कार्य होईल. धार्मिक कार्यत सहभागी व्हाल. लवकरच आनंदाची बातमी येईल. आजचा शुभ रंग - जांभळा आणि हिरवा. 
  10. मकर राशी भविष्य / Capricorn Horoscope Today: व्यवसायात प्रगती होईल. धनलाभ होईल. आज पिंपळाचे झाड लावा. आरोग्याची काळजी घ्या. प्रवासाचा योग निर्माण होईल. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. आनंदाची बातमी मिळेल. आजचा शुभ रंग - लाल आणि आकाशी. 
  11. कुंभ राशी भविष्य / Aquarius Horoscope Today: बँकिंग आणि माध्यमातील व्यक्तींसाठी आजचा दिवस उत्तम आहे. प्रलंबित कामे पूर्ण होतील. मित्रांचे सहकार्य मिळेल. अचानक धनलाभ होण्याचे संकेत आहेत. नोकरीत, व्यवसायात चांगला लाभ होईल. आजचा शुभ रंग - हिरवा आणि लाल.
  12. मीन राशी भविष्य / Pisces Horoscope Today: विद्यार्थी करिअरमध्ये यश मिळवतील. व्यवसायात नवीन प्रकल्पांसाठी प्रेरणा मिळेल. वाहन खरेदीचे नियोजन करु शकता. आरोग्याची काळजी घ्या. आजचा शुभ रंग - पिवळा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी