Daily Horoscope 24 November: मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार 'या' दोन राशींसाठी लकी, मनातील इच्छा होतील पूर्ण

Today's Horoscope 24 November 2022: आजचा दिवस कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल याबाबत सविस्तर माहिती जाणून घ्या. पाहूयात मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या बारा राशींसाठी कसा असेल हा दिवस?

Representative Image
आजचे राशीभविष्य 
थोडं पण कामाचं
 • पाहा आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असणार
 • जाणून घ्या 12 राशींसाठी आजचा दिवस कसा
 • तुमच्या राशीत आज काय लिहिलंय? वाचा

Daily Horoscope in Marathi; 24 November 2022 Rashi Bhavishya: आजचा दिवस कुठल्या राशीसाठी कसा असेल आणि कुठल्या राशीसाठी शुभ रंग काय असेल जाणून घेऊयात. (daily horoscope 24 November rashi bhavishya in marathi aajche rashi bhavishya)

 1. मेष राशी भविष्य / Aries Horoscope Today: या राशीच्या व्यक्तींना धनलाभ आणि आनंदाची बातमी मिळू शकते. आरोग्याची काळजी घ्या. वाद-विवाद टाळा. नवी नोकरी शोधण्याचा प्रयत्न कराल. घरी पाहुण्यांचे आगमन होईल. आज घरात कापूर जाळा. आजचा शुभ रंग - पांढरा.
 2. वृषभ राशी भविष्य / Tauras Horoscope Today: नव्या योजना सुरू करण्याचा विचार कराल. व्यवसायात वाढ होईल. खाण्या-पिण्याच्या गोष्टींकडे लक्ष द्या. सकारात्मक विचार आणि संपर्क यामुळे तुमचे रखडलेले काम मार्गी लागेल. कुटुंबासोबत पिकनिकला जाण्याचा विचार कराल. लहान मुलांसाठी आवश्यक सामान खरेदी कराल. आजचा शुभ रंग - पिवळा आणि लाल.
 3. मिथुन राशी भविष्य / Gemini Horoscope Today: रिअल इस्टेट आणि हॉटेल व्यवसाय याच्याशी संबंधित लोकांना धनलाभ होईल. आरोग्याची काळजी घ्या. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. वायफळ खर्च टाळा. आजचा शुभ रंग - निळा आणि हिरवा.
 4. कर्क राशी भविष्य / Cancer Horoscope Today: आजचा दिवस धावपळीचा असेल त्यामुळे थोडा थकवा जाणवेल. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. वैवाहिक जीवन सुखी असेल. गरिबांना अन्न, कपडे दान करा. एखाद्याला उधार दिलेले पैसे आज परत मिळतील. आजचा शुभ रंग - लाल आणि पिवळा.
 5. सिंह राशी भविष्य / Leo Horoscope Today: व्यवसायानिमित्त दूरचा प्रवास होईल. आरोग्या सुदृढ राहील. नोकरी करणाऱ्यांना कामानिमित्त इतरत्र जावे लागेल. घरात प्रेमळ आणि आनंदाचे वातावरण असेल. सूर्य मंत्राचा जप करा आणि पूजा करा. आजचा शुभ रंग - नारंगी.
 6. कन्या राशी भविष्य / Virgo Horoscope Today: ताण-तणावामुळे आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. व्यवसाय उत्तम सुरू राहील. उत्पन्नात वाढ होईल. कार्यालयातील राजकारणापासून दोन हात दूर रहा. घरातील साफ-सफाईकडे लक्ष द्या. आजचा शुभ रंग - पांढरा. 
 7. तूळ राशी भविष्य / Libra Horoscope Today: व्यवसायात चांगली वाढ होईल. आरोग्याची काळजी घ्या. कामाचं थोडं प्रेशर असेल. तुमच्या कामामुळे समाजात प्रतिष्ठा मिळेल. गोड पदार्थ दान करा. आजचा शुभ रंग - हिरवा.
 8. वृश्चिक राशी भविष्य / Scorpio Horoscope Today: व्यवसायात उत्तम निर्णय घेतल्याने चांगला धनलाभ होईल. मेडिटेशन करु आरोग्याची काळजी घ्या. नोकरीची नवी संधी चालून येईल. चांगल्या ऑफरसह नवी नोकरी मिळेल. आजचा शुभ रंग - लाल आणि निळा. 
 9. धनु राशी भविष्य / Sagittarius Horoscope Today: खर्च वाढण्याची शक्यता आहे. सरकारी कार्यालयातील एखादे काम रखडण्याची शक्यता आहे. जोडीदारासोबत वाद होऊ शकतो. अचानक धनलाभ होण्याचा योग आहे. आजचा शुभ रंग - जांभळा.
 10. मकर राशी भविष्य / Capricorn Horoscope Today: व्यवसायात वाद होऊ शकतो. धैर्याने काम करा. नोकरी करणाऱ्यांना कामानिमित्त इतरत्र स्थायिक व्हावे लागण्याची शक्यता आहे. सूर्य मंत्राचा 108 वेळा जप करा. आजचा शुभ रंग - हिरवा.
 11. कुंभ राशी भविष्य / Aquarius Horoscope Today: व्यवसायात चांगला लाभ होण्याचे संकेत मिळत आहेत. डोळे आणि डोकेदुखीची समस्या जाणवण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्यांना चांगली बातमी मिळेल. कुटुंबासोबत वेळ घालवाल. आजचा शुभ रंग - पिवळा.
 12. मीन राशी भविष्य / Pisces Horoscope Today: दीर्घकाळापासून केलेल्या गुंतवणुकीतून चांगला लाभ होईल. आरोग्य सुदृढ राहील. कार्यालयात कामाचा दबाव असेल. कुटुंबात चांगले वातावरण असेल. हनुमान चालिसा पठण करा. आजचा शुभ रंग - लाल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी