Daily Horoscope 25 November: 'या' तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार आनंदवार्ता, वाचा शुक्रवारचे राशीभविष्य

Today's Horoscope 25 November 2022: आजचा दिवस कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल याबाबत सविस्तर माहिती जाणून घ्या. पाहूयात मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या बारा राशींसाठी कसा असेल हा दिवस?

Today's Horoscope
आजचे राशीभविष्य 
थोडं पण कामाचं
  • पाहा आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असणार
  • जाणून घ्या 12 राशींसाठी आजचा दिवस कसा
  • तुमच्या राशीत आज काय लिहिलंय? वाचा

Daily Horoscope in Marathi; 25 November 2022 Rashi Bhavishya: आजचा दिवस कुठल्या राशीसाठी कसा असेल आणि कुठल्या राशीसाठी शुभ रंग काय असेल जाणून घेऊयात. (daily horoscope 25 November rashi bhavishya in marathi aajche rashi bhavishya)

  1. मेष राशी भविष्य / Aries Horoscope Today: आजचा दिवस तुमच्यासाठी उत्तम असेल. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. मन प्रसन्न होईल. आत्मविश्वास वाढेल. उत्पन्नाच्या स्त्रोतमध्ये वाढ होईल. एखादे जुन्या कर्जाची परतफेड कराल. कौटुंबिक जीवनात तणावाचे वातावरण असू शकते. आजचा शुभ रंग - पिवळा.
  2. वृषभ राशी भविष्य / Tauras Horoscope Today: धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. आर्थिक देवाण-घेवाण करताना काळजी घ्या. सरकारी कामात कोणताही निष्काळजीपणा करू नका. आजचा शुभ रंग - लाल आणि निळा.
  3. मिथुन राशी भविष्य / Gemini Horoscope Today: दाम्पत्य जीवनात प्रेम आणि विश्वास कायम असेल. ज्यामुळे नाते आणखी घट्ट होईल. संपत्ती खरेदीचा विचार कराल. महत्त्वाची कामे वेळेतच पूर्ण करा. भागिदारीमध्ये व्यवसाय केल्यास फायदा होईल. आजचा शुभ रंग - पांढरा.
  4. कर्क राशी भविष्य / Cancer Horoscope Today: नोकरीच्या ठिकाणी तुमच्या कामाचे कौतुक होईल. वेगवेगळ्या स्कीममधून पैशांचा गंडा घालणाऱ्यांपासून सावध रहा. आर्थिक व्यवहार करताना काळजी घ्या. आजचा शुभ रंग -  नारंगी.
  5. सिंह राशी भविष्य / Leo Horoscope Today: कला आणि कौशल्याच्या जोरावर तुम्ही आपली एक वेगळी ओळख बनवाल. लवकरच तुम्हाला आनंदाची बातमी मिळेल. आपली आवश्यक कामे वेळेत पूर्ण करा अन्यथा समस्या उद्भवू शकते. मित्रांच्या सहकार्याने रखडलेले काम मार्गी लागेल. आजचा शुभ रंग - निळा.
  6. कन्या राशी भविष्य / Virgo Horoscope Today: आजचा दिवस तुम्हाला विविध सुविधांमध्ये लाभ मिळवून देईल. बऱ्याच दिवसांपासून एखादी वस्तू खरेदीचा विचार करत आहात आता ती वस्तू खरेदीची वेळ आली आहे. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. काही बाबतीत गोपनीयता कायम ठेवा. आजचा शुभ रंग - लाल.
  7. तूळ राशी भविष्य / Libra Horoscope Today: आजचा दिवस तुम्हाला नवी संधी उपलब्ध करुन देईल. आज तुम्हाला आपल्यापेक्षा इतरांच्या कामाची अधिक चिंता असेल. जोडीदारासोबत लहान गोष्टीवरुन वाद होऊ शकतो. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. आजचा शुभ रंग - पिवळा आणि पांढरा.
  8. वृश्चिक राशी भविष्य / Scorpio Horoscope Today: नवीन संपत्ती खरेदीचा विचार कराल. एखाद्याला दिलेलं आश्वासन पूर्ण करा अन्यथा ती व्यक्ती नाराज होऊ शकते. अचानक धनलाभ होण्याचे संकेत आहेत. आरोग्याची काळजी घ्या. आजचा शुभ रंग - नारंगी आणि लाल.
  9. धनु राशी भविष्य / Sagittarius Horoscope Today: कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण असेल. सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. कुटुंबातील एखाद्या सदस्याला आरोग्याची समस्या भेडसावू शकते. घरी पाहुण्यांचे आगमन होईल. आजचा शुभ रंग - निळा आणि लाल.
  10. मकर राशी भविष्य / Capricorn Horoscope Today: आज मोठ्या प्रमाणात खर्च होतील. घरातील ज्येष्ठ व्यक्ती तुम्हाला काही गोष्टींबाबत समज देतील. मित्र-परिवारासोबत भेट होईल. देवाण-घेवाण करताना काळजी घ्या. आजचा शुभ रंग - लाल आणि निळा.
  11. कुंभ राशी भविष्य / Aquarius Horoscope Today: गुंतवणुकीतून मोठा लाभ होईल. योग्य ठिकाणी नवी गुंतवणूक करा अन्यथा पैसे बुडण्याची शक्यता आहे. तुमच्या काही योजनांना अपेक्षापेक्षा अधिक यश मिळेल. जोडीदाराचे सहकार्य मिळेल. व्यवसायात चांगला लाभ होईल. आजचा शुभ रंग - पिवळा. 
  12. मीन राशी भविष्य / Pisces Horoscope Today: मित्राकडून एखादी भेटवस्तू मिळू शकते. आरोग्य सुदृढ राहील. व्यवसायात चांगला नफा होईल. कामानिमित्त प्रवास करावा लागू शकतो. आजचा शुभ रंग - लाल आणि नारंगी.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी