Daily Horoscope 26th July: आजचे राशीभविष्य; जाणून घ्या आजचा मंगळवार तुमच्यासाठी कसा

Daily Horoscope in Marathi; 26th July 2022 Rashi Bhavishya: आजचा दिवस कुठल्या राशीसाठी कसा असेल आणि कुठल्या राशीसाठी शुभ रंग काय असेल जाणून घेऊयात. 

Today's Horoscope
आजचे राशीभविष्य 
थोडं पण कामाचं
  • पाहा आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असणार
  • जाणून घ्या १२ राशींसाठी आजचा दिवस कसा
  • तुमच्या राशीत आज काय लिहिलंय? वाचा

Today's Horoscope 26th July 2022: आजचा दिवस कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल याबाबत सविस्तर माहिती जाणून घ्या. पाहूयात मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या बारा राशींसाठी कसा असेल हा दिवस?

मेष राशी भविष्य / Aries Horoscope Today: आरोग्य चांगले राहिल. प्रवासाची शक्यता आहे. एखादी आनंदाची बातमी मिळेल. आजचा शुभ रंग - लाल आणि पांढरा

वृषभ राशी भविष्य / Tauras Horoscope Today: राजकारण्यांसाठी आजचा दिवस यशाचा आहे. व्यवसायात चांगला नफा होईल आणि पैसा मिळू शकतो. नोकरीत पदोन्नतीकडे वाटचाल कराल. आजचा शुभ रंग - निळा आणि हिरवा.

मिथुन राशी भविष्य / Gemini Horoscope Today: आजच्या दिवशी सूर्य, कर्क आणि चंद्राचे संक्रमण तुमच्यासाठी अनुकूल आहे. नोकरीतील बदलाशी संबंधित कोणताही निर्णय काळजीपूर्वक घ्या. नवा व्यवसाय सुरू करण्याच्या दिशेने वाटचाल करू शकाल. आजचा शुभ रंग - निळा आणि पांढरा.  

अधिक वाचा : Night Dream: रात्री तुम्हालाही 'तसे' स्वप्न पडतात... या स्वप्नांचा अर्थ आणि लक्षणे काय?

कर्क राशी भविष्य / Cancer Horoscope Today: या राशीत सूर्य आहे. धार्मिक कार्यात व्यस्त राहाल. भगवान श्री गणेशाची आणि विष्णूची पूजा करुन अन्नदान करा. आजचा शुभ रंग - लाल आणि पिवळा. 

सिंह राशी भविष्य / Leo Horoscope Today: नवीन जबाबदारी तुम्हाला मिळू शकेल. प्रवासाची योजना पुढे ढकलणं योक्य नाही. मित्र-मैत्रिणींची भेट होण्याची शक्यता आहे. कामानिमित्त दौरा होण्याची शक्यता आहे. आजचा शुभ रंग - पिवळा आणि केशरी. 

कन्या राशी भविष्य / Virgo Horoscope Today: राजकीय क्षेत्रातील व्यक्तींसाठी आजचा दिवस शुभ आहे. मनाप्रमाणे गोष्टी झाल्याने आनंदी राहाल. गरिबांना अन्नधान्य दान करा. अचानक प्रवासाचा योग निर्माण होण्याची शक्यता आहे. आजचा शुभ रंग - निळा आणि जांभळा.

अधिक वाचा : Sant Namdev Punyatithi Images HD in Marathi : संत नामदेव महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त शेअर अभिवादनपर संदेश

तूळ राशी भविष्य / Libra Horoscope Today: नोकरीत बढती मिळण्याची दाट शक्यता आहे. कन्या राशीच्या मित्रांकडून तुम्हाल सहकार्य मिळेल. व्यवसायात चांगले मार्गदर्शन मिळाल्याने नफा होईल. अनावधानाने होणाऱ्या पैशाच्या खर्चावर नियंत्रण ठेवा. आजचा शुभ रंग - हिरवा आणि जांभळा.  

वृश्चिक राशी भविष्य / Scorpio Horoscope Today: विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस उत्तम आहे. चांगले यश मिळेल. मेष आणि कन्या राशीचे मित्र आज तुमच्या मदतीसाठी धावून येतील. आजचा शुभ रंग - लाल आणि पांढरा. 

धनु राशी भविष्य / Sagittarius Horoscope Today: नोकरीत बढतीबाबत चांगली बातमी मिळेल. नवीन करारामुळे व्यवसायात प्रगती होण्याची चिन्ह आहेत. घरी पाहुण्यांचे आगमन होईल. जुने मित्र-मैत्रिण बऱ्याच वर्षांनी भेटतील. आजचा शुभ रंग - केशरी आणि पांढरा.

अधिक वाचा : Astro tips: य़ावेळेस तुम्ही झोपलात तर लक्ष्मी माता होऊ शकते नाराज, वाढते नकारात्मकता

मकर राशी भविष्य / Capricorn Horoscope Today: आज गुंतवणूक करण्याचा विचार तुमच्या मनात येईल. व्यायवसायिकांना मोठा नफा होण्याची शक्यता आहे. कामानिमित्त दौरा होईल. आजचा दिवस तुमच्यासाठी खूपच लाभदायक असेल. आजचा शुभ रंग - केशरी आणि पांढरा. 

कुंभ राशी भविष्य / Aquarius Horoscope Today: नोकरीत मन प्रसन्न राहील. व्यवसायात नवीन काम सुरू होईल. गुरू आणि मंगळ तुमच्यासाठी शुभ आहेत. आत्मविश्वास वाढेल. भगवान विष्णूची पूजा करा. आजचा शुभ रंग - हिरवा आणि आकाशी.

मीन राशी भविष्य / Pisces Horoscope Today: विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस उत्तम आहे. नोकरीत नवी जबाबदारी तुम्हाला मिळेल. उत्तम काम केल्याने तुमचे कौतुक होईल आणि बॉस खूश होतील. आरोग्याबाबत काही समस्या जाणवण्याची शक्यता आहे. आजचा शुभ रंग - लाल आणि केशरी.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी