Daily Horoscope 27 September: आजचे राशीभविष्य; नवरात्रोत्सवाचा दुसरा दिवस या राशींसाठी लाभदायक

Today's Horoscope 27 September 2022: आजचा दिवस कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल याबाबत सविस्तर माहिती जाणून घ्या. पाहूयात मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या बारा राशींसाठी कसा असेल हा दिवस?

Today's Horoscope
आजचे राशीभविष्य 
थोडं पण कामाचं
  • पाहा आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असणार
  • जाणून घ्या 12 राशींसाठी आजचा दिवस कसा
  • तुमच्या राशीत आज काय लिहिलंय? वाचा

Daily Horoscope in Marathi; 27 September 2022 Rashi Bhavishya: आजचा दिवस कुठल्या राशीसाठी कसा असेल आणि कुठल्या राशीसाठी शुभ रंग काय असेल जाणून घेऊयात. (daily horoscope 27 September rashi bhavishya in marathi aajche rashi bhavishya)

  1. मेष राशी भविष्य / Aries Horoscope Today: व्यापार करणाऱ्यांसाठी आजचा दिवस उत्तम आहे. एखाद्या लहान गोष्टीचा विचार करण्याऐवजी मोठ्या गोष्टीचा विचार करा. जर गुंतवणूक करायची असेल तर मोठी संधी शोधा नक्कीच लाभ मिळेल. नोकरी करणाऱ्यांनी वरिष्ठांच्या सूचनांकडे काळजीपूर्वक लक्ष द्या. सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. आजचा शुभ रंग - पिवळा आणि लाल.
  2. वृषभ राशी भविष्य / Tauras Horoscope Today: कोणालाही विनाकारण सल्ला देऊ नका. तुमच्या कार्यक्षेत्रात जर एखादी संधी मिळाली तर त्या संधीचं सोनं करा. संपत्तीच्या संदर्भातील सर्व वादांवर तोडगा निघेल. आरोग्याची काळजी घ्या. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. आजचा शुभ रंग - निळा आणि हिरवा.
  3. मिथुन राशी भविष्य / Gemini Horoscope Today: आजचा दिवस तुमच्यासाठी निश्चितपणे लाभदायक असणार आहे. कुटुंबात लवकरच शुभकार्य होईल. यामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. तुमच्या शांत स्वभावामुळे विरोधक तुमचा गैरफायदा घेऊ शकतात. आजचा शुभ रंग - पांढरा.
  4. कर्क राशी भविष्य / Cancer Horoscope Today: आजचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल असणार आहे. सरकारी नोकरीच्या संबंधित कामे मार्गी लागतील. व्यापारात चांगला नफा होईल. अपेक्षेपेक्षा अधिक धनलाभ होईल आणि त्यामुळे तुम्ही प्रसन्न असाल. धार्मिक स्थळी भेट द्याल. आजचा शुभ रंग - लाल आणि नारंगी.
  5. सिंह राशी भविष्य / Leo Horoscope Today: आजचा दिवस तुमच्यासाठी लाभदायक असेल. कामानिमित्त एखादा दौरा होऊ शकतो. कार्यक्षेत्रात बदल करण्याचा विचार करत असाल तर त्या दिशेने काम सुरू होईल. मित्रांच्या मदतीने रखडलेले काम मार्गी लागेल. मित्रांच्या भेटीगाठी होतील. आजचा शुभ रंग - पिवळा आणि नारंगी.
  6. कन्या राशी भविष्य / Virgo Horoscope Today: आजचा दिवस तुमच्यासाठी चिंतेचा ठरू शकतो. शत्रू तुमच्या कामात अडथळा निर्माण करु शकतात. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. मात्र, गुंतवणुकीच्या संदर्भात निर्णय घेताना काही अडचण येऊ शकते. आरोग्य चांगले राहील. आजचा शुभ रंग - निळा.
  7. तूळ राशी भविष्य / Libra Horoscope Today: आजचा दिवस तुमच्यासाठी धावपळीचा असेल. स्वभाव थोडा चिडचिडा होईल. याचा परिणाम तुमच्या कामावर होण्याची शक्यता आहे. कायदेशीर प्रक्रियेच्या संदर्भात विचार करुन निर्णय घ्या. रखडलेले काम, प्रकल्प लवकरच मार्गी लागेल. आजचा शुभ रंग - पिवळा आणि पांढरा. 
  8. वृश्चिक राशी भविष्य / Scorpio Horoscope Today: आरोग्याची काळजी घ्या. अचानक धनलाभ होईल. सासुरवाडीतून आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे. मित्रांच्या सहकार्यामुळे व्यापारात नफा होईल. तरुणांसाठी आजचा दिवस उत्तम आहे. जोडीदाराकडून तुम्हाला प्रोत्साहन मिळेल. आजचा शुभ रंग - लाल.
  9. धनु राशी भविष्य / Sagittarius Horoscope Today: आजचा दिवस तुम्हाला यश मिळवून देईल. सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. विरोधक तुमच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करतील. गरीबांना अन्न किंवा कपडे दान करा. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. नोकरीच्या शोधात असलेल्यांना चांगली संधी मिळेल. आजचा शुभ रंग - नारंगी आणि हिरवा. 
  10. मकर राशी भविष्य / Capricorn Horoscope Today: काही योजना पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न कराल. व्यापारी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नव्या ऑफर्स देऊ शकतात. सामाजिक आणि धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. आजचा शुभ रंग - लाल आणि निळा.
  11. कुंभ राशी भविष्य / Aquarius Horoscope Today: आजचा दिवस तुमच्यासाठी उत्तम असेल. धनलाभ होण्याची शक्यता आहे. सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. मित्रांच्या मदतीने नव्या योजना सुरू करण्याचा प्रयत्न कराल. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. आजचा शुभ रंग - पिवळा.
  12. मीन राशी भविष्य / Pisces Horoscope Today: आजचा दिवस तुम्हाला नव्या संधी घेऊन येईल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांकडून तुमच्या कामाचे कौतुक होईल. व्यापारात चांगला नफा होईल. आजचा शुभ रंग - पांढरा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी