Daily Horoscope 28 November: 'या' सहा राशींच्या व्यक्तींचं भाग्य उजळणार

Today's Horoscope 28 November 2022: आजचा दिवस कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल याबाबत सविस्तर माहिती जाणून घ्या. पाहूयात मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या बारा राशींसाठी कसा असेल हा दिवस?

Today's Horoscope
आजचे राशीभविष्य 
थोडं पण कामाचं
  • पाहा आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असणार
  • जाणून घ्या 12 राशींसाठी आजचा दिवस कसा
  • तुमच्या राशीत आज काय लिहिलंय? वाचा

Daily Horoscope in Marathi; 28 November 2022 Rashi Bhavishya: आजचा दिवस कुठल्या राशीसाठी कसा असेल आणि कुठल्या राशीसाठी शुभ रंग काय असेल जाणून घेऊयात. (daily horoscope 28 November rashi bhavishya in marathi aajche rashi bhavishya)

  1. मेष राशी भविष्य / Aries Horoscope Today: या राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस आनंदाचा असणार आहे. जोडीदार आणि नातेवाईकांच्या सहकार्याने रखडलेले काम मार्गी लागेल. लवकरच आनंदाची बातमी मिळेल. जमीन किंवा घर खरेदीचा विचार कराल. आजचा शुभ रंग - निळा.
  2. वृषभ राशी भविष्य / Tauras Horoscope Today: करिअरच्या संदर्भात चांगली बातमी मिळेल. नोकरीची नवी संधी चालून येईल. आरोग्याची काळजी घ्या. आयात-निर्यात संबंधीत व्यवहारात चांगले यश मिळेल. आपल्या खासगी गोष्टी इतरांसोबत शेअर करताना काळजी घ्या. अचानक धनलाभ मिळण्याचे संकेत आहेत. आजचा शुभ रंग - पांढरा.
  3. मिथुन राशी भविष्य / Gemini Horoscope Today: आज श्रीगणरायाच्या आशीर्वादाने तुम्हाला चांगली बातमी मिळेल. हाती घेतलेले काम पूर्ण होईल. घरात आनंदाचे वातावरण असेल. नातेवाईकांच्या मदतीने व्यापारात नफा होईल. आजचा शुभ रंग - हिरवा.
  4. कर्क राशी भविष्य / Cancer Horoscope Today: प्रेम संबंधांत आनंदाचे वातावरण असेल. वाद-विवाद टाळा. मित्रांसोबत बाहेर फिरायला जाण्याचं नियोजन कराल. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या कामामुळे कौतुक होईल. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. आजचा शुभ रंग - पिवळा. 
  5. सिंह राशी भविष्य / Leo Horoscope Today: श्री गणेशाची पूजा करा. महिलांना माहेरहून आनंदाची बातमी मिळेल. घरात नव्या वस्तू खरेदी करण्याचा विचार कराल. लवकरच वाहन खरेदी कराल. घरात काही बांधकाम सुरू करणार असाल तर वास्तूनुसार निर्णय घ्या. आजचा शुभ रंग - नारंगी.
  6. कन्या राशी भविष्य / Virgo Horoscope Today: आजचा संपूर्ण दिवस मार्केटिंगसंबंधीत कार्यात व्यस्त असाल. नवे कपडे, दागिने खरेदी करण्याची योजना आखाल. रखडलेले काम आज पूर्ण होईल आणि त्यामुळे आनंदी व्हाल. कोणतेही काम करण्यापूर्वी विचार करा. आजचा शुभ रंग - लाल.
  7. तूळ राशी भविष्य / Libra Horoscope Today: घरातील काम पूर्ण करण्यात आजचा संपूर्ण दिवस जाईल. एखादी वाईट बातमी मिळू शकते, ज्यामुळे नाराज व्हाल. गुंतवणूक करण्याचा विचार कराल. कुटुंबातील ज्येष्ठांच्या तब्येतीमुळे थोडे तणावाखाली असाल. आजचा शुभ रंग - पिवळा आणि निळा.
  8. वृश्चिक राशी भविष्य / Scorpio Horoscope Today: वडिलधाऱ्या व्यक्तींची सेवा करा. आपल्या हट्टी स्वभावामुळे समस्या उद्भवण्याची शक्यता आहे. सासरवाडीतून आनंदाची बातमी मिळेल. गुंतवणूक करण्याचा विचार कराल. अचानक धनलाभ होईल. आजचा शुभ रंग - पांढरा.
  9. धनु राशी भविष्य / Sagittarius Horoscope Today: जास्त विचार आणि योजनांची गुंतागुंत यामुळे होणाऱ्या कामात अडथळा येऊ शकतो. शिस्तीमुळे इतरांना काहीसा त्रास जाणवू शकतो. नव्या व्यापाराची सुरुवात कराल. धनलाभ होण्याचे संकेत आहेत. मित्रांच्या भेटीगाठी होतील. आजचा शुभ रंग - हिरवा.
  10. मकर राशी भविष्य / Capricorn Horoscope Today: एखाद्या महत्त्वपूर्ण कामाची सुरुवात कराल. भावांडांमध्ये चांगले संबंध असतील. कुटुंबात लवकरच एखादे शुभकार्य होईल. आर्थिक व्यवहार करताना काळजी घ्या. जोडीदाराचा तुम्हाला चांगला पाठिंबा मिळेल. आजचा शुभ रंग - निळा.
  11. कुंभ राशी भविष्य / Aquarius Horoscope Today: घरात प्रेमळ वातावरण असतील. दीर्घकाळापासून करिअर आणि नोकरीसाठी संघर्ष करत असलेल्यांना आनंदाची बातमी मिळणार. कोणत्याही प्रकारचा व्यवहार करताना जोडीदारासोबत पारदर्शक व्यवहार ठेवा. आजचा शुभ रंग - नारंगी.
  12. मीन राशी भविष्य / Pisces Horoscope Today: आर्थिक व्यवहार करताना काळजी घ्या. खर्चावर नियंत्रण ठेवा. एखादा नातेवाईक तुमच्या पाठीमागे टीका करेल. दाम्पत्य जीवनात आनंदाचे वातावरण असेल. आजचा दिवस थोडा तणावाचा असेल. आजचा शुभ रंग - पांढरा आणि पिवळा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी