Daily Horoscope 28 October: आजचे राशीभविष्य; या 2 राशींच्या व्यक्तींचा खर्च वाढणार, पाहा कशी असेल तुमची आर्थिक स्थिती

Today's Horoscope 28 October 2022: आजचा दिवस कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल याबाबत सविस्तर माहिती जाणून घ्या. पाहूयात मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या बारा राशींसाठी कसा असेल हा दिवस?

Today's Horoscope
आजचे राशीभविष्य 
थोडं पण कामाचं
  • पाहा आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असणार
  • जाणून घ्या 12 राशींसाठी आजचा दिवस कसा
  • तुमच्या राशीत आज काय लिहिलंय? वाचा

Daily Horoscope in Marathi; 28 October 2022 Rashi Bhavishya: आजचा दिवस कुठल्या राशीसाठी कसा असेल आणि कुठल्या राशीसाठी शुभ रंग काय असेल जाणून घेऊयात. (daily horoscope 28 October rashi bhavishya in marathi aajche rashi bhavishya)

  1. मेष राशी भविष्य / Aries Horoscope Today: मेष राशीच्या व्यक्तींच्या कामकाजात काही सकारात्मक बदल होऊ शकतात. इतरांच्या मदतीसाठी तुम्ही धावून जाल आणि आर्थिक मदत कराल. आरोग्य सुदृढ राहील. आजचा शुभ रंग - पिवळा आणि निळा.
  2. वृषभ राशी भविष्य / Tauras Horoscope Today: आज दुपारनंतर एखादी आनंदाची बातमी मिळू शकते. आरोग्याबाबत जागरूक राहण्याची गरज आहे. घरी पाहुण्यांचे आगमन होईल. घरातील एखाद्या शुभ कार्यात उत्साहाने सहभागी व्हाल आणि तुमच्या कामाचे कौतुक होईल. आजचा शुभ रंग - पांढरा.
  3. मिथुन राशी भविष्य / Gemini Horoscope Today: या राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस खूप चांगला असेल. तुमच्या इच्छा पूर्ण होतील. कामात व्यस्त राहाल. अनावश्यक खर्च टाळण्याचा सल्ला. वाहन चालवताना काळजी घ्या. आजचा शुभ रंग - लाल. 
  4. कर्क राशी भविष्य / Cancer Horoscope Today: कर्क राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस उत्तम आहे. अचानक मोठा धनलाभ होण्याची शक्यता आहे. यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. भावनेतून घेतलेल्या निर्णयामुळे पश्चाताप होऊ शकतो. आजचा शुभ रंग - नारंगी. 
  5. सिंह राशी भविष्य / Leo Horoscope Today: या राशीच्या व्यक्तींना राजकीय क्षेत्रात चांगले यश मिळेल. रखडलेले काम पूर्ण होईल. आर्थिक स्थिती चांगली राहील. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. आजचा शुभ रंग - हिरवा आणि लाल.
  6. कन्या राशी भविष्य / Virgo Horoscope Today: या राशीच्या व्यक्तींना कामात चांगला लाभ होईल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. रागावर नियंत्रण ठेवा. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून मदत मिळेल. सूर्यास्ताच्या वेळी अचानक चांगला धनलाभ होईल. आजचा शुभ रंग - पिवळा. 
  7. तूळ राशी भविष्य / Libra Horoscope Today: शैक्षणिक आणि स्पर्धेच्या क्षेत्रात चांगले यश मिळण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचे विविध स्त्रोत उपलब्ध होतील. धावपळीत आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. कौटुंबिक जीवनात जोडीदाराची चांगली साथ मिळेल. आजचा शुभ रंग - पांढरा.
  8. वृश्चिक राशी भविष्य / Scorpio Horoscope Today: या राशीच्या व्यक्तींची आर्थिक स्थिती मजबूत असेल. तुमची संपत्ती, मान-सन्मान वाढेल. रागावर नियंत्रण ठेवा. रखडलेले काम मार्गी लागेल. आजचा शुभ रंग - नारंगी आणि लाल.
  9. धनु राशी भविष्य / Sagittarius Horoscope Today: घरात एखादी नवी वस्तू खरेदी करण्यासाठी पैसे खर्च होऊ शकतात. आर्थिक व्यवहार करताना थोडी काळजी घ्या. अन्यथा पैसे अडकण्याची शक्यता आहे. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. आजचा शुभ रंग - पांढरा.
  10. मकर राशी भविष्य / Capricorn Horoscope Today: व्यापारात चांगला नफा होईल आणि त्यामुळे आनंदाचे वातावरण असेल. व्यवसायात बदल करण्यासाठी नियोजन केले जात आहे. स्पर्धा परीक्षेत चांगले यश प्राप्त होईल. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. आजचा शुभ रंग - लाल आणि पिवळा.
  11. कुंभ राशी भविष्य / Aquarius Horoscope Today: या राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस थोडा धावपळीचा असेल. मालमत्ता खरेदी-विक्री करण्याचा विचार कराल. मालमत्ता खरेदी-विक्री करण्यापूर्वी कायदेशीर बाबींची योग्य पडताळणी करा. आजचा शुभ रंग - नारंगी आणि पांढरा.
  12. मीन राशी भविष्य / Pisces Horoscope Today: प्रवासाचा योग आहे. आरोग्याची काळजी घ्या. नातेवाईक, मित्रांची भेट होतील. आर्थिक स्थिती सुधारण्यास सुरुवात होईल. दिवसभरात एखादी चांगली बातमी मिळेल. आजचा शुभ रंग -  लाल आणि नारंगी.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी