Daily Horoscope 29 December: या 3 राशींवर ग्रहांची चाल पडणार भारी, इतरांसाठी आजचा दिवस भाग्याचा

Today's Horoscope 29 December 2022: आजचा दिवस कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल याबाबत सविस्तर माहिती जाणून घ्या. पाहूयात मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या बारा राशींसाठी कसा असेल हा दिवस?

Today's Horoscope
आजचे राशीभविष्य  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • पाहा आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असणार
  • जाणून घ्या 12 राशींसाठी आजचा दिवस कसा
  • तुमच्या राशीत आज काय लिहिलंय? वाचा

Daily Horoscope in Marathi; 29 december 2022 Rashi Bhavishya: आजचा दिवस कुठल्या राशीसाठी कसा असेल आणि कुठल्या राशीसाठी शुभ रंग काय असेल जाणून घेऊयात. (daily horoscope 29 december rashi bhavishya in marathi aajche rashi bhavishya)

  1. मेष राशी भविष्य / Aries Horoscope Today: एकत्रित कुटुंबात एखाद्या कारणावरुन वाद होण्याची शक्यता आहे. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. नव्या व्यवसायाची सुरुवात करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. आजचा शुभ रंग - पिवळा आणि पांढरा.
  2. वृषभ राशी भविष्य / Tauras Horoscope Today: धनलाभ होण्याचा योग आहे. आरोग्याची काळजी घ्या. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेत चांगले यश प्राप्त होईल. जोडीदारासोबत वाद होण्याची शक्यता आहे. कुटुंबात लवकरच शुभ कार्य होईल. आजचा शुभ रंग - निळा.
  3. मिथुन राशी भविष्य / Gemini Horoscope Today: नवा व्यवसाय सुरू करण्याचा योग आहे. आरोग्य सुदृढ राहील. भावंडांसाठी रोजगाराची नवी संधी चालून येईल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. एखाद्या नातेवाईकासोबत धार्मिकस्थळी भेट द्याल. आजचा शुभ रंग - पांढरा.
  4. कर्क राशी भविष्य / Cancer Horoscope Today: कर्क राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस शुभ आहे. विद्यार्थी आणि खेळाडूंसाठी चांगला काळ सुरू आहे. नवी गाडी खरेदीचा विचार कराल. कोणताही निर्णय घाई-घाईत घेऊ नका. आजचा शुभ - पिवळा. 
  5. सिंह राशी भविष्य / Leo Horoscope Today: धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. आरोग्याची काळजी घ्या. बाहेरील खाद्यपदार्थ खाणे टाळा. नोकरीत पदोन्नती होण्याचा योग आहे. सूर्यदेवाला जल अर्पण करा. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. आजचा शुभ रंग - निळा आणि नारंगी.
  6. कन्या राशी भविष्य / Virgo Horoscope Today: आरोग्याची काळजी घ्या. आत्मविश्वास वाढ होईल. जोडीदारासोबत वाद होण्याची शक्यता आहे. श्री गणेशाची पूजा करा. कुटुंबात आनंदाचे वतावरण असेल. आई-वडिलांच्या आरोग्याची काळजी घ्या. आजचा शुभ रंग - पांढरा.
  7. तूळ राशी भविष्य / Libra Horoscope Today: संपत्तीत गुंतवणूक करण्याचा योग आहे. रुग्णालयात ये-जा करावी लागू शकते. नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला अधिकची जबाबदारी देण्यात येईल. पत्नीसोबत वाद होण्याची शक्यता आहे. आजचा शुभ रंग - केशरी.
  8. वृश्चिक राशी भविष्य / Scorpio Horoscope Today: व्यापारात वाढ होईल मात्र, खर्चात वाढ होण्याची चिन्ह आहेत. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या. आर्थिक क्षेत्रात गुंतवणुकीतून चांगला नफा होईल. नवी कार खरेदी करण्याचा विचार कराल. आजचा शुभ रंग - जांभळा.
  9. धनु राशी भविष्य / Sagittarius Horoscope Today: नव्या व्यापाराची संधी उपलब्ध होईल. मुलांसोबत बाहेर फिरायला जाण्याचा प्लान कराल. परदेशी नोकरीची संधी चालून येईल. वाहन खरेदी कराल. वायफळ खर्च टाळा. मित्रांसोबत बाहेर पिकनिकला जाण्याचं प्लानिंग कराल. आजचा शुभ रंग - नारंगी आणि लाल.
  10. मकर राशी भविष्य / Capricorn Horoscope Today: रखडलेली कामे मार्गी लागतील. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या चांगल्या कामामुळे प्रशंसा होईल आणि पदोन्नती होण्याची शक्यता आहे. आजचा शुभ रंग - पिवळा.
  11. कुंभ राशी भविष्य / Aquarius Horoscope Today: व्यवसायातून चांगला नफा होईल. आई-वडिलांच्या आरोग्याची काळजी घ्या. अविवाहितांना लवकरच लग्नाची मागणी येईल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. गरीबांना अन्न दान करा. आजचा शुभ रंग - पांढरा.
  12. मीन राशी भविष्य / Pisces Horoscope Today: आर्थिक स्थिती उत्तम असेल. पोटाच्या संबंधित आजाराची समस्या जाणवण्याची शक्यता आहे. नोकरीच्या ठिकाणी संघर्ष करावा लागू शकतो. श्री गणेशाची पूजा करा. गणेश मंत्राचा 108 वेळा जप करा. आजचा शुभ रंग - हिरवा आणि जांभळा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी