Daily Horoscope 29 November: 'या' राशींच्या व्यक्तींना अचानक होणार धनलाभ, संपत्तीत होईल वाढ

Today's Horoscope 29 November 2022: आजचा दिवस कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल याबाबत सविस्तर माहिती जाणून घ्या. पाहूयात मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या बारा राशींसाठी कसा असेल हा दिवस?

Today's Horoscope
आजचे राशीभविष्य 
थोडं पण कामाचं
  • पाहा आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असणार
  • जाणून घ्या 12 राशींसाठी आजचा दिवस कसा
  • तुमच्या राशीत आज काय लिहिलंय? वाचा

Daily Horoscope in Marathi; 29 November 2022 Rashi Bhavishya: आजचा दिवस कुठल्या राशीसाठी कसा असेल आणि कुठल्या राशीसाठी शुभ रंग काय असेल जाणून घेऊयात. (daily horoscope 29 November rashi bhavishya in marathi aajche rashi bhavishya)

  1. मेष राशी भविष्य / Aries Horoscope Today: आरोग्याची काळजी घ्या. कामात अडथळे येऊ शकतात. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला चांगले यश प्राप्त होईल आणि त्याचे चांगले परिणाम सुद्धा दिसून येतील. मान-सन्मानात वाढ होईल. खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे. आजचा शुभ रंग - पांढरा.
  2. वृषभ राशी भविष्य / Tauras Horoscope Today: आत्मविश्वास वाढेल मात्र, मनात काहीतरी चिंता सतावत राहील. अति उत्साह अंगाशी येऊ शकतो. उत्पन्नात वाढ होईल. मानसिक समाधानासाठी प्रयत्न करा. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या. वरिष्ठांचे मार्गदर्शन मिळेल. आजचा शुभ रंग - निळा आणि नारंगी.
  3. मिथुन राशी भविष्य / Gemini Horoscope Today: मन अशांत राहील. व्यापारात अडचणी यऊ शकतात. उत्पन्नात वाढ होईल. अचानक धनलाभ होईल. मित्राच्या मदतीने नोकरी किंवा इतर व्यापाराची संधी चालून येईल. आजचा शुभ रंग - लाल.
  4. कर्क राशी भविष्य / Cancer Horoscope Today: कौटुंबिक जीवन सुखमय असेल. शैक्षणिक क्षेत्रात विद्यार्थ्यांना यश मिळेल. मित्राच्या मदतीने केलेल्या कामातून धनलाभ होईल. व्यापारात वाढ होईल. व्यापारातून अचानक धनलाभ होण्याचे संकेत आहेत. आजचा शुभ रंग - हिरवा आणि लाल.
  5. सिंह राशी भविष्य / Leo Horoscope Today: आत्मविश्वास भरपूर असेल मात्र, मनात विविध शंका येतील. शिक्षणासाठी परदेश दौरा होण्याची शक्यता आहे. उत्पन्नात वाढ होईल. नोकरीच्या ठिकाणी मोठी जबाबदारी तुम्हाला मिळेल. उत्पन्नाचे नवे मार्ग उपलब्ध होतील. आजचा शुभ रंग - पिवळा.
  6. कन्या राशी भविष्य / Virgo Horoscope Today: मित्राच्या मदतीने नोकरीची नवी संधी चालून येईल. उत्पन्नात वाढ होईल. आजचा दिवस धावपळीचा असेल. वाहन खरेदीचा विचार कराल. जोडीदाराचे सहकार्य नेहमीच मिळेल. आजचा शुभ रंग - नारंगी.
  7. तूळ राशी भविष्य / Libra Horoscope Today: बोलताना वाणीवर नियंत्रण ठेवा. व्यवसायात चांगला नफा होईल. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या कामाचे कौतुक होईल. गुंतवणूक करण्याकडे जास्त भर द्याल. घरात धार्मिक कार्ये होऊ शकतात. आई-वडिलांचे आशीर्वाद घेऊन नव्या कामाची सुरुवात करा. आजचा शुभ रंग - पांढरा.
  8. वृश्चिक राशी भविष्य / Scorpio Horoscope Today: व्यवसायात चांगली वाढ होईल. व्यवसायातून अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. श्रीगणेशाची पूजा करा. आत्मविश्वासात वाढ होईल. आजचा शुभ रंग - पांढरा आणि नारंगी.
  9. धनु राशी भविष्य / Sagittarius Horoscope Today: मनात विविध विचार येतील. उत्पन्नात वाढ होणार नाही मात्र, खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक आयुष्य सुखात असेल. जोडीदारासोबत काही गोष्टींवरुन मतभेदाची शक्यता आहे. आजचा शुभ रंग - निळा.
  10. मकर राशी भविष्य / Capricorn Horoscope Today: आत्मविश्वास वाढेल मात्र, कोणतेही कार्य करण्यापूर्वी विचार करा. मित्र-परिवारांच्या सहयोगाने व्यापारात वाढ होईल. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. परिश्रम अधिक असतील. आजचा शुभ रंग - पिवळा. 
  11. कुंभ राशी भविष्य / Aquarius Horoscope Today: मनात काही शंका आल्याने थोडे तणावात असाल. उत्पन्नात वाढ होईल आणि त्यासोबतच खर्चातही वाढ होईल. परदेशात जाण्याचा योग निर्माण होईल. आजचा शुभ रंग - लाल आणि निळा.
  12. मीन राशी भविष्य / Pisces Horoscope Today: तुमच्या कामामुळे वरिष्ठांकडून कौतुक होईल. नोकरीच्या ठिकाणी मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. नव्या नोकरीची संधी चालून येईल. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या. आजचा शुभ रंग - हिरवा आणि नारंगी.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी