Daily Horoscope 30 November: आजचा बुधवार तुमच्यासाठी कसा? वाचा 12 राशींचे राशीभविष्य

Today's Horoscope 30 November 2022: आजचा दिवस कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल याबाबत सविस्तर माहिती जाणून घ्या. पाहूयात मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या बारा राशींसाठी कसा असेल हा दिवस?

Today's Horoscope
आजचे राशीभविष्य 
थोडं पण कामाचं
  • पाहा आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असणार
  • जाणून घ्या 12 राशींसाठी आजचा दिवस कसा
  • तुमच्या राशीत आज काय लिहिलंय? वाचा

Daily Horoscope in Marathi; 30 November 2022 Rashi Bhavishya: आजचा दिवस कुठल्या राशीसाठी कसा असेल आणि कुठल्या राशीसाठी शुभ रंग काय असेल जाणून घेऊयात. (daily horoscope 30 November rashi bhavishya in marathi aajche rashi bhavishya)

  1. मेष राशी भविष्य / Aries Horoscope Today: कामाच्या निमित्ताने प्रवास करावा लागू शकतो. आत्मविश्वासात वाढ होईल. नव्या कामाची सुरुवात करण्यासाठी दुपारी 2 ते 3 ही वेळ चांगली आहे. गुंतवणूक करण्याची योजना आखाल. आजचा शुभ रंग - पिवळा.
  2. वृषभ राशी भविष्य / Tauras Horoscope Today: प्रत्येक आव्हानाचा सामना करण्यास तुम्ही तयार असाल. आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ आहे. व्यापारात नफा होईल. हाती घेतलेलं काम वेळेत पूर्ण करा. नवी जबाबदारी स्वीकारण्यास घाबरू नका तर ती जबाबदारी कशा प्रकारे पार पाडता येईल याबाबत विचार करा. आजचा शुभ रंग - निळा आणि लाल.
  3. मिथुन राशी भविष्य / Gemini Horoscope Today: कार्यालयातील कामकाजात इतर सहकारी मदत करतील. व्यापारी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध ऑफर्स किंवा डिस्काऊंटची मदत घेतील. एखाद्या धार्मिकस्थळी भेट द्याल. आरोग्याची काळजी घ्या. आजचा शुभ रंग - नारंगी.
  4. कर्क राशी भविष्य / Cancer Horoscope Today: आपली महत्त्वाची कागदपत्रे सांभाळून ठेवा कारण चोरी होण्याची शक्यता आहे. व्यापाऱ्यांचं चांगलं मॅनेजमेंट ग्राहकांना आवडेल. यामुळे व्यापारात चांगला नफा होईल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. आजचा शुभ रंग - पांढरा.
  5. सिंह राशी भविष्य / Leo Horoscope Today: सरकारी कार्यालयातील तुमचे काम आज पूर्ण होईल. व्यापारी एखादी मोठी डील करतील आणि त्यातून मोठा नफा होईल. नोकरीची नवी संधी चालून येईल. लवकरच आनंदाची बातमी मिळेल. आजचा शुभ रंग - हिरवा आणि निळा.
  6. कन्या राशी भविष्य / Virgo Horoscope Today: काम वेळेवर पूर्ण करण्यासाठी वरिष्ठांचा दबाव असेल. सोने-चांदीचे व्यापारी उधारीवर सामान देणे टाळा. आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. तरुण-तरुणींना नव्या कामाची, व्यापाराची संधी उपलब्ध होईल. आजचा शुभ रंग - केशरी.
  7. तूळ राशी भविष्य / Libra Horoscope Today: यश मिळवण्यासाठी या राशीचे व्यक्ती खूप प्रयत्न करतील. प्रयत्नांमुळे तुम्हाला चांगले यश मिळेल. वाद-विवाद टाळा. आपल्या योग्यतेनुसार कामाची जबाबदारी स्वीकारा. दातदुखीची समस्या जाणवेल. आजचा शुभ रंग - पांढरा.
  8. वृश्चिक राशी भविष्य / Scorpio Horoscope Today: आपल्या आवडत्या ठिकाणी बदली होण्याची शक्यता आहे. व्यापाऱ्यांनी नव्या कामाची सुरुवात करताना व्यवस्थित विचार करा. तुम्हाला ज्या गोष्टीची आवड आहे तेच काम करण्यास प्राधान्य द्या. आजचा शुभ रंग - लाल आणि निळा. 
  9. धनु राशी भविष्य / Sagittarius Horoscope Today: आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ आहे. व्यापाऱ्यांना मोठा नफा होईल. ज्या खेळात तरुणांना आवड आहे त्या खेळाचा सराव करा. आरोग्य सुदृढ राहील. दुचाकी चालवताना हेल्मेट परिधान करा. आजचा शुभ रंग - पिवळा.
  10. मकर राशी भविष्य / Capricorn Horoscope Today: जे झालं त्यामुळे नैराश्येत न जाता काही नवं करण्याचा प्रयत्न करा. मित्रांसोबत मिळून नवा व्यापार सुरू करण्याचा विचार कराल. नव्या नोकरीची संधी उपलब्ध होईल. आजचा शुभ रंग - निळा आणि पिवळा.
  11. कुंभ राशी भविष्य / Aquarius Horoscope Today: कुटुंबात लवकरच शुभ कार्य होईल. वाद-विवाद टाळा. आर्थिक व्यवहार करताना थोडी काळजी घ्यावी लागेल. आरोग्याची काळजी घ्या. आजचा शुभ रंग - पांढरा.
  12. मीन राशी भविष्य / Pisces Horoscope Today: ऑफिसच्या कामानिमित्त प्रवास करावा लागू शकतो. अनावश्यक खर्च टाळा. वाहन चालवताना तसेच काम करताना घाई करू नका. अन्यथा दुखापत होण्याची किंवा नुकसान होण्याची शक्यता आहे. आजचा शुभ रंग - लाल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी