Daily Horoscope 4 December: सूर्याप्रमाणे चमकेल 'या' राशींचं भाग्य

Today's Horoscope 4 December 2022: आजचा दिवस कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल याबाबत सविस्तर माहिती जाणून घ्या. पाहूयात मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या बारा राशींसाठी कसा असेल हा दिवस?

Today's Horoscope
आजचे राशीभविष्य 
थोडं पण कामाचं
  • पाहा आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असणार
  • जाणून घ्या 12 राशींसाठी आजचा दिवस कसा
  • तुमच्या राशीत आज काय लिहिलंय? वाचा

Daily Horoscope in Marathi; 4 december 2022 Rashi Bhavishya: आजचा दिवस कुठल्या राशीसाठी कसा असेल आणि कुठल्या राशीसाठी शुभ रंग काय असेल जाणून घेऊयात. (daily horoscope 4 december rashi bhavishya in marathi aajche rashi bhavishya)

  1. मेष राशी भविष्य / Aries Horoscope Today: मन प्रसन्न राहील. आरोग्याची काळजी घ्या. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांचे चांगले सहकार्य मिळेल. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. धनलाभाचा योग आहे. वैद्यकीय खर्च वाढू शकतो. व्यापारात वाढ होईल. आजचा शुभ रंग - पिवळा आणि पांढरा.
  2. वृषभ राशी भविष्य / Tauras Horoscope Today: वाद-विवाद टाळा. मन प्रसन्न असेल. नोकरीच्या ठिकाणी प्रमोशनची संधी उपलब्ध होईल. कामाच्या ठिकाणी मित्रांचे सहकार्य मिळेल. उत्पन्नात वाढ होईल. गुंतवणूक करण्याचा विचार कराल. आजचा शुभ रंग - निळा.
  3. मिथुन राशी भविष्य / Gemini Horoscope Today: आत्मविश्वास वाढेल. मात्र, नोकरीच्या ठिकाणी काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. आरोग्याची काळजी घ्या. रागावर नियंत्रण ठेवा. एखाद्या धार्मिकस्थळी जाण्याचं नियोजन कराल. मित्र-परिवाराचे चांगले सहकार्य मिळेल. आजचा शुभ रंग - नारंगी.
  4. कर्क राशी भविष्य / Cancer Horoscope Today: आजचा दिवस थोडा तणावाचा ठरू शकतो. मित्राच्या मदतीने उत्पन्नाचा नवा स्त्रोत निर्माण कराल. लवकरच आनंदाची बातमी मिळेल. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. व्यवसायातून चांगला नफा मिळेल. लवकरच परदेश यात्रा होऊ शकते. आजचा शुभ रंग - हिरवा.
  5. सिंह राशी भविष्य / Leo Horoscope Today: जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या. आई-वडिलांच्या आशीर्वादाने नव्या कार्याची सुरुवात कराल. आत्मविश्वास वाढेल. खर्च वाढण्याची शक्यता आहे. कुटुंबातील समस्यांकडे लक्ष द्या. आजचा शुभ रंग - पिवळा.
  6. कन्या राशी भविष्य / Virgo Horoscope Today: आजचा दिवस थोडा धावपळीचा असू शकतो. आरोग्याची काळजी घ्या. रागावर नियंत्रण ठेवा. वायफळ खर्च टाळा. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांसोबत वाद होण्याची शक्यता आहे. आजचा शुभ रंग - निळा आणि लाल.
  7. तूळ राशी भविष्य / Libra Horoscope Today: मन प्रसन्न राहील. व्यवसायात मोठा नफा होईल. अचानक धनलाभ होईल. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या. वाहन खरेदीचा विचार कराल. व्यवसायात वाढ होईल. आजचा शुभ रंग - हिरवा आणि लाल. 
  8. वृश्चिक राशी भविष्य / Scorpio Horoscope Today: आत्मविश्वास वाढेल. नकारात्मक विचारांपासून दूर रहा. भावनांवर नियंत्रण ठेवा. कामात, व्यवसायात मित्रांचे उत्तम सहकार्य मिळेल. खर्च वाढण्याची शक्यता आहे. उत्पन्नात वाढ होईल. आजचा शुभ रंग - नारंगी.
  9. धनु राशी भविष्य / Sagittarius Horoscope Today: मुलांच्या आरोग्याची काळजी घ्या. उत्पन्नात घसरण होईल आणि खर्चात वाढ होण्याची स्थिती निर्माण होईल. घरात लवकरच धार्मिक कार्य होऊ शकते. वडिलांकडून चांगले अर्थ सहाय्य मिळू शकते. आजचा शुभ रंग - निळा आणि पांढरा.
  10. मकर राशी भविष्य / Capricorn Horoscope Today: रागावर नियंत्रण ठेवा. घर-कुटुंबात धार्मिक कार्य होतील. वडिलांकडून धनलाभ होईल. मन प्रसन्न राहील. कौटुंबिक जीवन सुखमय असेल. संपत्तीत गुंतवणूक करण्याचा योग निर्माण होईल. आरोग्याची काळजी घ्या. मित्र-परिवारासोबत वेळ घालवाल. आजचा शुभ रंग - पिवळा.
  11. कुंभ राशी भविष्य / Aquarius Horoscope Today: नोकरीच्या ठिकाणी प्रमोशन मिळण्याचे संकेत मिळतील. तुमच्या कामामुळे मान-सन्मान मिळेल. बऱ्याच दिवसांनी मित्रांसोबत भेटीगाठी होतील. व्यवसायात मोठा नफा होईल आणि धनलाभ सुद्धा होईल. आजचा शुभ रंग - हिरवा आणि लाल.
  12. मीन राशी भविष्य / Pisces Horoscope Today: धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. उत्पन्नात वाढ होईल. आत्मविश्वासात वाढ होईल. भाऊ-बहिणीचे चांगले सहकार्य मिळेल. लवकरच आनंदाची बातमी मिळेल. आरोग्य सुदृढ राहील. आजचा शुभ रंग - पिवळा आणि पांढरा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी