राशी भविष्य ४ मे २०२१ : असा असेल मे महिन्यातील पहिला मंगळवार

Daily Horoscope राशी भविष्य, ४ मे २०२१ : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या १२ राशींसाठी कसा असेल दिवस? जाणून घ्या या राशींचे डेली भविष्य...

Daily Horoscope 4 May 2021 Today rashifal in marathi aajche rashi bhavishya
राशी भविष्य ४ मे २०२१   |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

 • कर्क राश‍ी भविष्य / Cancer Horoscope Today: मनातली शंका दूर होईल.
 • वृश्चिक राश‍ी भविष्य / Scorpio Horoscope Today: प्रवासाच्या योजना बनतील.
 • कुंभ राश‍ी भविष्य / Aquarius Horoscope Today: आर्थिक व्यवहार करताना सावधान रहा.
 1. मेष राश‍ी भविष्य / Aries Horoscope Today: आपण नकारात्मक विचारांपासून दूर रहा. वायफळ खर्च करणं टाळा. आरोग्याची काळजी घ्या. कुटुंबातील व्यक्तींशी बोलताना किंवा व्यवहार करताना सावधगिरी बाळगा. शुभ रंग - राखाडी.
 2. वृषभ राश‍ी भविष्य / Tauras Horoscope Today: मनात स्थिरता ठेवावी लागेल. धनप्राप्ती होईल, पण बाहेरील प्रवासामुळे आपला आर्थिक खर्च होऊ शकतो. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. सकारात्मक गोष्टींमुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. शुभ रंग - पोपटी.
 3. मिथुन राश‍ी भविष्य / Gemini Horoscope Today: आर्थिक व्यवहार करताना पैशांच्या बाबतीत विशेष लक्ष ठेवणं गरजेचे आहे. आरोग्याची काळजी घ्या. कुटुंबात मतभेद होण्याची शक्यता आहे. समाजातील व्यक्तींशी वाद होणार नाहीत याची काळजी घ्या.शुभ रंग - पांढरा.
 4. कर्क राश‍ी भविष्य / Cancer Horoscope Today: मनातली शंका दूर होईल. कोणत्याही नवीन कार्याची सुरूवात करू शकता. इतरांशी व्यवहार करताना मतभेद होणार नाहीत, याची काळजी घ्या. आर्थिक लाभ होईल. विद्यार्थ्यांचे अभ्यासात लक्ष केंद्रीत होईल. शुभ रंग - नारंगी.
 5. सिंह राश‍ी भविष्य / Leo Horoscope Today: नोकरी आणि व्यवसायात स्पर्धात्मक वातावरण राहील. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. मनात स्थिरता ठेवा. भाऊ-बहिणींकडून चांगला आशीर्वाद मिळेल. शुभ रंग - आकाशी.
 6. कन्या राश‍ी भविष्य / Virgo Horoscope Today: दिवस तुमच्यासाठी शुभ आहे. दाम्पत्यांमध्ये सुख-शांतीचे वातावरण राहील. धनलाभ होईल. नकारात्मक विचारांपासून दूर रहा. शुभ रंग - जांभळा.
 7. तूळ राश‍ी भविष्य / Libra Horoscope Today: दिवस शुभ आहे. परंतु मनात काही विचार सतावत राहतील. कामा-धंद्यात वाढ होईल. नोकरीत पदोन्नती होईल. बाहेर फिरायला जाऊ शकता. मित्रपरिवारांच्या भेटीमुळे मन आनंदीत राहील. वरिष्ठांकडून चांगले आशीर्वाद मिळतील. शुभ रंग - लाल.
 8. वृश्चिक राश‍ी भविष्य / Scorpio Horoscope Today: प्रवासाच्या योजना बनतील. वैवाहिक जीवनात आनंद कायम राहील. आयटी आणि बॅकिंग क्षेत्रातील लोकांना यशप्राप्ती मिळेल. प्रेम-प्रसंगात वातावरण अनुकूल असेल. आरोग्याच्या समस्या कायम राहतील. शुभ रंग - गुलाबी.
 9. धनु राश‍ी भविष्य / Sagittarius Horoscope Today: आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांसाठी दिवस चांगला आहे. नवीन गोष्टी शिकण्याची संधी प्राप्त होईल. रखडलेल्या कामांना गती मिळेल. वैवाहिक जीवनातील प्रेमपूर्ण वातावरण कायम राहण्याची शक्यता आहे. शुभ रंग - मोरपंखी.
 10. मकर राश‍ी भविष्य / Capricorn Horoscope Today: दिवस तुमच्यासाठी लाभदायक ठरेल. धनलाभाची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळेल. आरोग्याची काळजी घेण्याची गरज आहे. शुभ रंग- नारंगी.
 11. कुंभ राश‍ी भविष्य / Aquarius Horoscope Today: आर्थिक व्यवहार करताना सावधान रहा. तुमची आई तुमच्यावर खूश होईल. भेटवस्तूवर खर्च होण्याची शक्यता आहे. दिवस तुमच्या आवडत्या व्यक्तीसोबत वेळ घालवण्यासाठी चांगला आहे. शुभ रंग - पिवळा.
 12. मीन राश‍ी भविष्य / Pisces Horoscope Today: दिवस चांगला असेल. व्यवसायात यशस्वी व्हाल. सिनेमा आणि प्रसारमाध्यमांच्या लोकांसाठी दिवस हा यशाचा असेल. पैशांचं आगमन निश्चित आहे. शुभ रंग - निळा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी