Daily Horoscope 5 December: आठवड्याचा पहिला दिवस तुमच्यासाठी कसा? 'या' राशीच्या व्यक्तींवर होणार लक्ष्मी मातेची कृपा

Today's Horoscope 5 December 2022: आजचा दिवस कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल याबाबत सविस्तर माहिती जाणून घ्या. पाहूयात मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या बारा राशींसाठी कसा असेल हा दिवस?

Today's Horoscope
आजचे राशीभविष्य 
थोडं पण कामाचं
  • पाहा आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असणार
  • जाणून घ्या 12 राशींसाठी आजचा दिवस कसा
  • तुमच्या राशीत आज काय लिहिलंय? वाचा

Daily Horoscope in Marathi; 5 december 2022 Rashi Bhavishya: आजचा दिवस कुठल्या राशीसाठी कसा असेल आणि कुठल्या राशीसाठी शुभ रंग काय असेल जाणून घेऊयात. (daily horoscope 5 december rashi bhavishya in marathi aajche rashi bhavishya)

  1. मेष राशी भविष्य / Aries Horoscope Today: मनात वेगवेगळे विचार येतील. कुटुंबात धार्मिक कार्य होईल. कामाकडे लक्ष द्या. रागावर नियंत्रण ठेवा. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या. आजचा शुभ रंग - पिवळा आणि निळा.
  2. वृषभ राशी भविष्य / Tauras Horoscope Today: आत्मविश्वासात वाढ होईल. रागावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा. कामात कुटुंबीयांचे सहकार्य मिळेल. एखाद्या गोष्टीची चिंता सातत्याने सतावत राहील. उत्पन्नात वाढ होण्यासाठी प्रयत्न कराल. प्रवासाचा योग निर्माण होईल. आजचा शुभ रंग - लाल आणि पांढरा.
  3. मिथुन राशी भविष्य / Gemini Horoscope Today: मन शांत राहील. आत्मविश्वासात वाढ होईल. आरोग्याची काळजी घ्या. कपडे खरेदी करण्यासाठी पैसे खर्च कराल. व्यवसायात वाढ होईल. नोकरीच्या ठिकाणी नवी जबाबदारी तुम्हाला दिली जाईल. परदेश दौरा होऊ शकतो. आजचा शुभ रंग - नारंगी.
  4. कर्क राशी भविष्य / Cancer Horoscope Today: नवी गाडी खरेदी करण्याचा विचार कराल. कुटुंबात लवकरच धार्मिक कार्य होईल. स्वभाव थोडा चिडचिडा होईल. मित्रांच्या मदतीने रखडलेले काम मार्गी लागेल. आजचा शुभ रंग - पांढरा.
  5. सिंह राशी भविष्य / Leo Horoscope Today: व्यवसायात वाढ होईल आणि मोठा नफा सुद्धा होईल. अचानक धनलाभ होण्याचे संकेत आहेत. बऱ्याच दिवसांनी शाळा-कॉलेजमधील मित्रांची भेट होईल. कुटुंबात वाद होऊ शकतात. आजचा शुभ रंग - निळा.
  6. कन्या राशी भविष्य / Virgo Horoscope Today: मन प्रसन्न असेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. नोकरीच्या ठिकाणी नवी जबाबदारी सोपवण्यात येईल. रागावर नियंत्र ठेवा. वरिष्ठांसोबत वाद होऊ शकतात. आजचा शुभ रंग - लाल.
  7. तूळ राशी भविष्य / Libra Horoscope Today: मानसिक समाधान मिळेल मात्र, कुटुंबात थोडा वाद-विवाद होऊ शकतो. नव्या नोकरीची संधी चालून येईल. खर्चात वाढ होऊ शकते. मित्राकडून व्यवसाय करण्याचा प्रस्ताव येऊ शकतो. आजचा शुभ रंग - पिवळा आणि हिरवा.
  8. वृश्चिक राशी भविष्य / Scorpio Horoscope Today: नोकरी करणाऱ्यांना प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. वेळ तुमच्यासाठी अनुकूल आहे त्यामुळे प्रयत्न करायला हवेत. व्यापार करणाऱ्यांना चांगला नफा होईल. गुंतवणूक करण्याची योग्य वेळ आहे. आजचा शुभ रंग - हिरवा. 
  9. धनु राशी भविष्य / Sagittarius Horoscope Today: धनु राशीच्या व्यक्तींनी आपल्या कामावर लक्ष द्यावे. इकडच्या-तिकडच्या गोष्टींकडे लक्ष देऊन तुमचा वेळ वाया घालवू नका. धान्याच्या व्यवसायात नुकसान होण्याची शक्यता आहे. तरुणांना नोकरीची संधी उपलब्ध होईल. आजचा शुभ रंग - पिवळा. 
  10. मकर राशी भविष्य / Capricorn Horoscope Today: ऑफिसमध्ये अतिरिक्त कामामुळे जास्तवेळ बसून काम पूर्ण करावे लागेल. कपड्यांच्या व्यापाऱ्यांना चांगला नफा होईल. विक्रीत वाढ झाल्याने मन प्रसन्न होईल. तरुणांसाठी आजचा दिवस चांगला आहे. नव्या कामाची आज सुरुवात करु शकता. आजचा शुभ रंग - नारंगी.
  11. कुंभ राशी भविष्य / Aquarius Horoscope Today: कुंभ राशीच्या व्यक्तींची आर्थिक स्थिती मजबूत होईल. काहीतरी नवे शिकण्याची तयारी ठेवा. व्यवसाय सुरू करण्याचा विचार कराल. गुंतवणुकीतून चांगला नफा मिळेल. आजचा शुभ रंग - निळा आणि लाल.
  12. मीन राशी भविष्य / Pisces Horoscope Today: नोकरीच्या ठिकाणी बॉसकडून बोलणे ऐकावे लागण्याची शक्यता आहे. मात्र, उलट उत्तरे देऊ नका. रखडलेले काम मार्गी लागेल. तरुणांनी नवा व्यापार करण्यापूर्वी योग्य माहिती घ्या. गुंतवणूक करण्याकडे लक्ष द्याल. आजचा शुभ रंग - हिरवा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी