Daily Horoscope 7 January: या 9 राशींसाठी आजचा दिवस भाग्याचा, वाचा 12 राशींचे राशीभविष्य 

Today's Horoscope 7 January 2023: आजचा दिवस कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल याबाबत सविस्तर माहिती जाणून घ्या. पाहूयात मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या बारा राशींसाठी कसा असेल हा दिवस?

Today's Horoscope
आजचे राशीभविष्य 
थोडं पण कामाचं
 • पाहा आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असणार
 • जाणून घ्या 12 राशींसाठी आजचा दिवस कसा
 • तुमच्या राशीत आज काय लिहिलंय? वाचा

Daily Horoscope in Marathi; 7 January 2023 Rashi Bhavishya: आजचा दिवस कुठल्या राशीसाठी कसा असेल आणि कुठल्या राशीसाठी शुभ रंग काय असेल जाणून घेऊयात. (daily horoscope 7 January rashi bhavishya in marathi aajche rashi bhavishya)

 1. मेष राशी भविष्य / Aries Horoscope Today: आजचा दिवस मित्रांसोबत मजा-मस्तीचा असणार आहे. कामाच्या ठिकाणी नव्या व्यक्तींसोबत ओळख होईल. या ओळखीचा तुम्ही फायदा करुन घ्याल. मित्रांसोबत मजा-मस्ती, पार्टीसाठी पैसे खर्च होतील. करिअर संबंधित निर्णय घेताना व्यवस्थित विचार करा. आजचा शुभ रंग - निळा.
 2. वृषभ राशी भविष्य / Tauras Horoscope Today: जे व्यक्ती दीर्घकाळापासून परदेश दौरा करण्याचा विचार करत आहेत त्यांना लवकरच आनंदाची बातमी मिळू शकते. पद आणि प्रतिष्ठा वाढल्याने प्रसन्न व्हाल. एखाद्या धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. जोडीदारासोबत वेळ घालवाल. आजचा शुभ रंग - पांढरा.
 3. मिथुन राशी भविष्य / Gemini Horoscope Today: आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ असणार आहे. अचानक धनलाभ होण्याचा योग आहे. उधार दिलेले पैसे तुम्हाला परत मिळतील. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या कामाचे कौतुक होईल. रखडलेले काम मार्गी लागेल. आजचा शुभ रंग - नारंगी.
 4. कर्क राशी भविष्य / Cancer Horoscope Today: आजचा दिवस धावपळीचा असेल. राजकीय क्षेत्रात कार्यरत असलेल्यांना चांगली बातमी मिळेल. व्यापारात चांगला नफा होईल. धन प्राप्तीचा योग आहे. वायफळ खर्च टाळा. आजचा शुभ रंग - निळा आणि पांढरा. 
 5. सिंह राशी भविष्य / Leo Horoscope Today: एखाद्या धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. मनात नकारात्मक विचार येतील किंवा समस्येचा सामना करावा लागेल. कुटुंबात मतभेद होऊ शकतात. अविवाहितांसाठी लवकरच चांगली बातमी मिळेल. आजचा शुभ रंग - पिवळा. 
 6. कन्या राशी भविष्य / Virgo Horoscope Today: आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. नव्या योजना बनवाल. व्यापार वाढीसाठी प्रयत्न कराल. एखाद्यावर अवलंबून राहण्यापेक्षा स्वत:ची कामे स्वत: पूर्ण करा. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. आजचा शुभ रंग - राखाडी.
 7. तूळ राशी भविष्य / Libra Horoscope Today: आज दाम्पत्य जीवनात आनंदाचे वातावरण असेल. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेत चांगले यश प्राप्त होईल. आपला व्यवसाय वाढीसाठी प्रयत्न कराल. मित्रांची चांगली साथ लाभेल. आजचा शुभ रंग - हिरवा आणि लाल.
 8. वृश्चिक राशी भविष्य / Scorpio Horoscope Today: नोकरी किंवा व्यापाराच्या संदर्भात महत्त्वाचा निर्णय घेताना व्यवस्थित विचार करा. कुटुंबातील ज्येष्ठ सदस्यासाठी सरप्राईज पार्टीचं आयोजन कराल. लवकरच आनंदाची बातमी मिळेल. कामानिमित्त दूरचा प्रवास होऊ शकतो. आजचा शुभ रंग - राखाडी, पांढरा.
 9. धनु राशी भविष्य / Sagittarius Horoscope Today: मान-सन्मानात वाढ होईल. आजचा दिवस तुमच्यासाठी उत्तम असेल. वाद-विवाद टाळा. तुमच्या चांगल्या स्वभावामुळे व्यवसायात फायदा होईल. धनप्राप्तीचा योग आहे. आजचा शुभ रंग - निळा आणि हिरवा.
 10. मकर राशी भविष्य / Capricorn Horoscope Today: विद्यार्थ्यांची शैक्षणिक क्षेत्रात चांगली प्रगती दिसून येईल. रखडलेले काम मार्गी लागेल. आई-वडिलांच्या आरोग्याची काळजी घ्या. कुटुंबात लवकरच शुभ कार्य होईल. वैवाहिक आयुष्य सुखमय असेल. आजचा शुभ रंग - राखाडी आणि पांढरा.
 11. कुंभ राशी भविष्य / Aquarius Horoscope Today: तुम्हाला भेडसावत असलेल्या समस्यांतून मुक्ती मिळेल. आरोग्याची काळजी घ्या. जोडीदारासोबत लॉन्ग ड्राईव्हला जाण्याचं प्लानिंग करा. मित्र किंवा कुटुंबातील एखाद्या व्यक्तीसोबत वाद होऊ शकतो. खर्चावर नियंत्रण ठेवा. आजचा शुभ रंग - पिवळा.
 12. मीन राशी भविष्य / Pisces Horoscope Today: कामाच्या ठिकाणी तुमचं कौतुक होईल. वरिष्ठांच्या मार्गदर्शनामुळे चांगले काम कराल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. आजचा शुभ रंग - नारंगी आणि पांढरा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी