Daily Horoscope 7 November: आजचे राशीभविष्य; 'या' 5 राशींचं नशीब फळफळणार

Today's Horoscope 7 November 2022: आजचा दिवस कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल याबाबत सविस्तर माहिती जाणून घ्या. पाहूयात मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या बारा राशींसाठी कसा असेल हा दिवस?

Today's Horoscope
आजचे राशीभविष्य 
थोडं पण कामाचं
  • पाहा आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असणार
  • जाणून घ्या 12 राशींसाठी आजचा दिवस कसा
  • तुमच्या राशीत आज काय लिहिलंय? वाचा

Daily Horoscope in Marathi; 7 November 2022 Rashi Bhavishya: आजचा दिवस कुठल्या राशीसाठी कसा असेल आणि कुठल्या राशीसाठी शुभ रंग काय असेल जाणून घेऊयात. (daily horoscope 7 November rashi bhavishya in marathi aajche rashi bhavishya)

  1. मेष राशी भविष्य / Aries Horoscope Today: या राशीचे व्यक्ती काही प्रमाणात नाराज असतील. धनलाभाचा योग आहे. कुटुंबात किरकोळ वाद होऊ शकतात. खर्चात वाढ होऊ शकते. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांचे मार्गदर्शन मिळेल. आजचा शुभ रंग - पिवळा.
  2. वृषभ राशी भविष्य / Tauras Horoscope Today: आत्मविश्वासात प्रचंड वाढ होईल. धनलाभाचा योग आहे. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. मित्रांकडून रोजगार किंवा व्यापार करण्याच्या संबंधित नवी संधी उपलब्ध होईल. उत्पन्नात वाढ होईल. खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे. आजचा शुभ रंग - नारंगी.
  3. मिथुन राशी भविष्य / Gemini Horoscope Today: मनात नैराश्याची भावना निर्माण होऊ शकते. नवीन नोकरीची संधी उपलब्ध होईल. आरोग्याची काळजी घ्या. बऱ्याच दिवसांनी शाळा किंवा कॉलेजमधील मित्राची भेट होईल. कुटुंबासोबत प्रवासाचा योग आहे. आजचा शुभ रंग - पांढरा.
  4. कर्क राशी भविष्य / Cancer Horoscope Today: आत्मविश्वासात वाढ होईल. कुटुंबात धार्मिक कार्य होतील. प्रवासाची शक्यता आहे. नोकरीची नवी संधी उपलब्ध होईल. जोडीदाराची साथ मिळेल. भावासोबत वैचारिक मतभेद होण्याची शक्यता आहे. नोकरी बदलाचे संकेत मिळतील. आजचा शुभ रंग - निळा आणि पांढरा. 
  5. सिंह राशी भविष्य / Leo Horoscope Today: आई-वडिलांचे सहकार्य मिळेल. नोकरीत प्रगती होईल. व्यापारात मोठा नफा होण्याची शक्यता आहे. खर्चात अचानक वाढ होण्याची शक्यता आहे. नवी गाडी खरेदी करण्याचा विचार कराल. आजचा शुभ रंग - लाल आणि निळा.
  6. कन्या राशी भविष्य / Virgo Horoscope Today: नोकरी किंवा व्यापाराच्या ठिकाणी कार्यात विस्तार होण्याची शक्यता आहे. वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. आरोग्याची काळजी घ्या. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. आजचा शुभ रंग - हिरवा.
  7. तूळ राशी भविष्य / Libra Horoscope Today: मन प्रसन्न असेल. नोकरीच्या ठिकाणी ज्येष्ठांकडून चांगले सहकार्य मिळेल. मोठी जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता आहे. वाद-विवाद टाळा. आजचा शुभ रंग - पांढरा. 
  8. वृश्चिक राशी भविष्य / Scorpio Horoscope Today: व्यवसायात आजचा दिवस थोडा संघर्षाचा राहील. विद्यार्थी त्यांच्या करिअरबद्दल उत्साही आणि आनंदी राहतील. श्री गणेशाची पूजा करा. कोणतेही प्रलंबित असलेले काम पूर्ण होईल. धार्मिक पुस्तके दान करा. आजचा शुभ रंग - पिवळा आणि निळा.
  9. धनु राशी भविष्य / Sagittarius Horoscope Today: रखडलेली कामे मार्गी लागतील. पैसा मिळण्याची दाट शक्यता आहे. आजचा दिवस तुमच्यासाठी लाभदायक ठरेल. आजचा शुभ रंग - पिवळा आणि पांढरा.
  10. मकर राशी भविष्य / Capricorn Horoscope Today: नोकरीत प्रगतीबद्दल आनंद असेल. विद्यार्थी त्यांच्या शैक्षणिक कामगिरीवर समाधानी राहतील. आर्थिक सुखासाठी श्री सूक्ताचे पाठ करा. मित्रांचा पाठिंबा मिळाल्याने रखडलेले काम मार्गी लागेल. पिवळ्या फळांचे दान करा. आजचा शुभ रंग - आकाशी आणि हिरवा.
  11. कुंभ राशी भविष्य / Aquarius Horoscope Today: नोकरीतील बदलाबद्दल तुम्हाला आनंदाची बातमी मिळेल. व्यापारात संघर्षाची चिन्हे आहेत. आर्थिक प्रगती होईल. गुळाचे दान करा. आजचा शुभ रंग - जांभळा आणि नारंगी.
  12. मीन राशी भविष्य / Pisces Horoscope Today: राजकीय क्षेत्रात यश मिळेल. कामात आणि व्यवसायात यश मिळेल. नोकरी बदलण्याच्या संदर्भात कोणताही निर्णय घाईने घेऊ नका. आजचा शुभ रंग - निळा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी