Daily Horoscope, 8 January 2022 : राशीभविष्य ८ जानेवारी २०२२, कसा जाईल नववर्षाचा दुसरा शनिवार

Daily Horoscope राशी भविष्य, ८ जानेवारी २०२२ : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या बारा राशींसाठी कसा असेल दिवस? जाणून घ्या या राशींचे डेली भविष्य...

daily horoscope 8 january 2022 daily rashi bhavishaya
राशीभविष्य ८ जानेवारी २०२२, कसा जाईल नववर्षाचा दुसरा शनिवार 
थोडं पण कामाचं
  • राशीभविष्य ८ जानेवारी २०२२, कसा जाईल नववर्षाचा दुसरा शनिवार
  • कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस?
  • काय आहे आपले भविष्य?

Daily rashi bhavishaya saturday 8 january 2022 daily horoscope आजचे राशी भविष्य शनिवार ८ जानेवारी २०२२ : कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस आणि कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ रंग काय आहे या सर्वांची सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा. जाणून घ्या मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या बारा राशींसाठी कसा असेल दिवस?

Astrology : शनिदेवाच्या प्रभावामुळे या दोन राशीच्या लोकांच्या आयुष्यात पैशाची असते भरभराट; पैसे कमवण्यात असतात सर्वात पुढे

  1. मेष राश‍ी भविष्य / Aries Horoscope Today: विद्यार्थी त्यांच्या कामात यशस्वी ठरतील. राजकीय व्यक्ती यशस्वी ठरतील. लव्ह लाईफमध्ये विवाहाचा प्रस्ताव ठेवाल. श्वसनाचे विकार उद्भवू शकतात. धन आगमन होईल. आरोग्याच्या तक्रारी संभवू शकतात. शुभ रंग - निळा
  2. वृषभ राश‍ी भविष्य / Tauras Horoscope Today: एखादा प्रश्न चर्चेने सोडवाल. व्यवसायात उत्पन्नाचे नवे स्त्रोत निर्माण होतील. तुमचा मूड सतत बदलत राहील. अवाजवी खर्च टाळा. तुमच्या कामाने वरिष्ठ प्रसन्न होतील. शुभ रंग - लाल.
  3. मिथुन राश‍ी भविष्य / Gemini Horoscope Today: व्यवसायाशी संबंधित लोक आपले ध्येय पूर्ण करू शकतील. जोडीदारसंबंधित तणावाचे वातावरण निर्माण होऊ शकते. आरोग्य चांगले राहील. शुभ रंग - पांढरा. 
  4. कर्क राश‍ी भविष्य / Cancer Horoscope Today: राजकीय क्षेत्रातील व्यक्तींच्या लोकांना लाभ होऊ शकतात. नोकरीत यश मिळेल. दाम्पत्य जीवनात सुखी समाधान असेल. धन आगमनाने मन प्रसन्न होईल. बीपीचा त्रास असलेल्या लोकांनी सावधानता बाळगा. शुभ रंग - आकाशी.
  5. सिंह राश‍ी भविष्य / Leo Horoscope Today: निर्णय घेताना काळजी घ्या. विचारपूर्वक निर्णय घ्या. तुम्ही धार्मिक कार्यात व्यस्त राहाल. राजकीय व्यक्तींना विशेष लाभ होतील. लव्ह लाईफ चांगली राहील. शुभ रंग - तांबडा.
  6. कन्या राश‍ी भविष्य / Virgo Horoscope Today: क्रोधावर नियंत्रण ठेवा. कोणतेही निर्णय घाईघाईने घेऊ नका. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांना खुश करण्याचा प्रयत्न कराल. दाम्पत्य जीवनात जोडीदाराच्या आरोग्याची काळजी सतावेल. पोटाचे विकार संभवण्याची शक्यता आहे. शुभ रंग - राखाडी.
  7. तूळ राश‍ी भविष्य / Libra Horoscope Today: व्यापारात मोठी प्रगती होईल. अनेक लाभ होतील. हातात पैसा खेळता राहील. आरोग्याची विशेष काळजी घ्या. आबालवृद्ध तसेच आजारी व्यक्तींनी काळजी घेणे गरजेचे आहे. एखाद्या वादात पडू नका. शुभ रंग - जांभळा. 
  8. वृश्चिक राश‍ी भविष्य / Scorpio Horoscope Today: अनेक समस्यांचे निराकरण होईल. धन आगमन होईल. लव्ह लाईफ चांगली राहील. व्यवसायात नव्या संधी उपलब्ध होतील. शुभ रंग - हिरवा.
  9. धनु राश‍ी भविष्य / Sagittarius Horoscope Today: व्यवसायात मोठे यश मिळेल. मीडिया तसेच आयटीशी संबंधित व्यक्ती आपल्या कामाने संतुष्ट असतील. विद्यार्थ्यांना नव्या संधी उपलब्ध होतील. दिवस तुमच्यासाठी प्रसन्नता वाढवणारा असेल. आरोग्याच्या तक्रारी संभवू शकतात. शुभ रंग - लाल. 
  10. मकर राश‍ी भविष्य / Capricorn Horoscope Today: मीडिया तसेच आयटी क्षेत्रातील व्यक्तींना हा दिवस यशदायी ठरणार आहे. राजकारणात या व्यक्ती आपल्या उच्च नेत्यांना कामाने खुश करतील. वैवाहिक जीवनात प्रेम वाढेल. आरोग्य चांगले राहील. शुभ रंग - हिरवा.
  11. कुंभ राश‍ी भविष्य / Aquarius Horoscope Today: एखाद्या कामामध्ये तुम्ही दिवसभर व्यस्त असाल. प्रसन्नता वाढवणारा दिवस असेल. धन आगमनाची शक्यता आहे. लव्ह लाईफ चांगली असेल. दाम्पत्य जीवनात रागावर नियंत्रण ठेवा. शुभ रंग - पिवळा. 
  12. मीन राश‍ी भविष्य / Pisces Horoscope Today: तुमच्यासाठी धावपळीचा दिवस आहे. एखाद्या नव्या व्यवसायाबाबत योजना आखाल. दाम्पत्य जीवनात आनंदीआनंद राहील. शुभ रंग - पांढरा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी