Daily Horoscope 9 December: शुक्रवार 'या' राशींसाठी ठरणार खास, वाचा कोणाला काय होणार लाभ

Today's Horoscope 9 December 2022: आजचा दिवस कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल याबाबत सविस्तर माहिती जाणून घ्या. पाहूयात मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या बारा राशींसाठी कसा असेल हा दिवस?

Today's Horoscope
आजचे राशीभविष्य 
थोडं पण कामाचं
  • पाहा आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असणार
  • जाणून घ्या 12 राशींसाठी आजचा दिवस कसा
  • तुमच्या राशीत आज काय लिहिलंय? वाचा

Daily Horoscope in Marathi; 9 december 2022 Rashi Bhavishya: आजचा दिवस कुठल्या राशीसाठी कसा असेल आणि कुठल्या राशीसाठी शुभ रंग काय असेल जाणून घेऊयात. (daily horoscope 9 december rashi bhavishya in marathi aajche rashi bhavishya)

  1. मेष राशी भविष्य / Aries Horoscope Today: ऑफिसमधील काम लवकर आटोपून तुम्ही लवकर निघण्याचा प्रयत्न कराल. आज आर्थिक लाभ होण्याचा योग आहे. जोडीदारासोबत वाद होण्याची शक्यता आहे. आरोग्याची समस्या उद्भवण्याची शक्यता आहे. आजचा शुभ रंग - लाल.
  2. वृषभ राशी भविष्य / Tauras Horoscope Today: आज अशा गोष्टींवर काम करा ज्यामुळे तुमच्या आरोग्य सुदृढ होण्यास मदत होईल. व्यापारात चांगला नफा व्हावा यासाठी तुम्ही मित्रासोबत मिळून काही खास योजना बनवाल. लवकरच चांगली बातमी मिळेल. घाईघाईत कोणताही निर्णय घेऊ नका. आजचा शुभ रंग - राखाडी.
  3. मिथुन राशी भविष्य / Gemini Horoscope Today: कामात मिळत असलेल्या यशामुळे तुमचा उत्साह आणखी वाढेल. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. गरीबांना अन्न, कपडे दान करा. मित्रांकडून चांगले सहकार्य मिळेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. आजचा शुभ रंग - नारंगी.
  4. कर्क राशी भविष्य / Cancer Horoscope Today: आरोग्याची काळजी घ्या. तुमच्या आसपास असलेल्या व्यक्तींमुळे तुम्हाला काम करण्यास प्रोत्साहन मिळेल. अविवाहितांना लवकरच आपला जोडीदार मिळेल. उत्पन्नात वाढ होईल. आजचा शुभ रंग - निळा आणि पांढरा.
  5. सिंह राशी भविष्य / Leo Horoscope Today: सकारात्मक विचारांनी काम करा. शेजारी किंवा मित्र-नातेवाईक आज तुमच्याकडे उधार पैसे मागण्याची शक्यता आहे. वाद-विवाद टाळा. नोकरीच्या शोधात असलेल्यांना अधिक मेहनत करावी लागेल. मानसिक तणाव जाणवेल. आजचा शुभ रंग - निळा.
  6. कन्या राशी भविष्य / Virgo Horoscope Today: आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. एखाद्या व्यक्तीसोबत अचानक झालेली भेट तुम्हाला आनंदीत करेल. छोट्या व्यापाऱ्यांना आर्थिक नुकसान होऊ शकते. मेहनतीचं तुम्हाला फळ नक्की मिळेल. आजचा शुभ रंग - हिरवा आणि लाल. 
  7. तूळ राशी भविष्य / Libra Horoscope Today: थोडा आराम करा. जास्त धावपळ केल्याने थकवा जावण्याची शक्यता आहे. मुलांच्या शिक्षणासाठी खर्च होऊ शकतो. कामात तुम्हाला चांगले यश प्राप्त होईल. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या. आजचा शुभ रंग - नारंगी.
  8. वृश्चिक राशी भविष्य / Scorpio Horoscope Today: दीर्घकाळापासून सुरू असलेल्या आजारपणातून सुटका मिळेल. मित्रांसोबत पार्टी करण्याचं प्लानिंग कराल. जोडीदाराची आवड-निवड याकडे लक्ष द्याल. वैवाहिक आयुष्यात अडचणी येण्याची शक्यता आहे. आजचा शुभ रंग - पांढरा.  
  9. धनु राशी भविष्य / Sagittarius Horoscope Today: आजचा दिवस मित्रांसोबत घालवण्याचं प्लानिंग कराल. प्रवास करताना मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या. गुंतवणूक करण्याचा विचार कराल. आरोग्य उत्तम असेल. आजचा दिवस तुमच्यासाठी खूप खास असणार आहे. आजचा शुभ रंग - पिवळा आणि निळा.
  10. मकर राशी भविष्य / Capricorn Horoscope Today: धावपळीमुळे थोडा थकवा जावण्याची शक्यता आहे. आरोग्याची काळजी घ्या. आई-वडिलांच्या आशीर्वादाने नव्या कामाची सुरुवात कराल. मित्रांसोबत वाद होण्याची शक्यता आहे. जोडीदाराच्या तुमच्याकडून जास्त अपेक्षा असल्याने काही वाद होऊ शकतात. आजचा शुभ रंग - नारंगी. 
  11. कुंभ राशी भविष्य / Aquarius Horoscope Today: अचानक धनलाभ होण्याचा योग आहे. शांत स्वभावामुळे सर्वकाही ठीक कराल. संध्याकाळी प्रिय व्यक्तीसोबत वेळ घालवाल. विवाहित व्यक्तींसाठी आजचा दिवस खूपच खास आहे. आजचा शुभ रंग - पांढरा.
  12. मीन राशी भविष्य / Pisces Horoscope Today: सकारात्मक विचार कायम मनात ठेवा. आर्थिक स्थिती सुधारण्यास सुरुवात होईल. तुमच्या कामाचे कौतुक होईल. आरोग्याची काळजी घ्या. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. आजचा शुभ रंग - निळा आणि नारंगी.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी