Horoscope Today 27 February 2023 : सोमवारचा दिवस हा महादेवाचा (Lord Shiva) असतो. या दिवशी महादेवाची पूजा केली जाते. महादेवाची पूजा (worship)केल्यानंतर त्यांच्याकडून आपण काही मागितलं तर भोलेनाथ आपली मनातील इच्छा पूर्ण करतात. आज सोमवारचे (monday) भविष्य (Horoscope) ही अशाच प्रकारचे आहे. आजच्या राशीभविष्यात काही राशींवर महादेवाची कृपा असणार आहे. इतर राशीसाठी आठवड्याचा पहिला दिवस सोमवार हा कसा असेल हे जाणून घेऊ. यासाठी आपल्याला खालील राशीभविष्यावर नजर टाकावी लागेल.
(Daily Horoscope, Monday 27 February 2023 Horoscope, Today Horoscope in Marathi)
अधिक वाचा : मराठी राजभाषा दिनानिमित्त पाठवा मराठमोळ्या शुभेच्छा संदेश
मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र फलदायी आहे. कामाच्या ठिकाणी बड्या अधिकाऱ्याशी होणारे मतभेद हानिकारक ठरतील. कामात रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. आजचा दिवस तुमच्यासाठी आत्मपरीक्षण करण्याचा आहे. कोणताही निर्णय काळजीपूर्वक घ्या. शुभ रंग: हिरवा
या राशीतील काही लोकांसाठी आजचा दिवस भारी आहे. पूर्वी तुमचा अपमान करणारे तुमचे नातेवाईक आणि इतर लोक तुमच्याशी चांगले संबंध ठेवतील. आज तुम्ही केलेला नवीन संपर्क तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरेल. जर तुम्ही व्यापारी असाल तर आजचा दिवस कष्टदायक आहे. नवीन काही योजनांवर लक्ष द्या. शुभ रंग: जांभळा
आजचा दिवस या राशीतील लोकांसाठी यश देणारा असेल. तुम्हाला कोणत्याही कामात मोठे यश मिळू शकते. समाजात तुमचा सन्मान वाढेल. नोकरी आणि व्यवसायाशी संबंधित काही समस्या सुटतील. कोणताही व्यवसाय छोटा किंवा मोठा नसतो, यामुळे व्यवसाय सुरू करायचा असेल आजचा योग चांगला आहे. नवीन व्यवसायाची योजना आज कराल. शुभ रंग: निळा
अधिक वाचा : Images द्वारे पाठवा मराठी राजभाषा दिनानिमित्त शुभेच्छा संदेश
आठवड्याच्या पहिल्या दिवशी कर्क राशीचे लोक आनंदी राहतील. कोणत्याही विरोधकांच्या टीकेकडे लक्ष न देता आपले काम करत राहा. यश तुमच्या पायांचे चुंबन घेईल. शुभ रंग: लाल
आज तुमची योजना कोणाला सांगू नका. तुम्ही महत्त्वाची कामे पुढे ढकलण्याचा विचार करू शकता. सध्या तुम्हाला तुमची नाती सांभाळायची आहेत. अनावश्यक काळजी मनाला त्रास देऊ शकते. आज अज्ञात व्यक्तीशी व्यवहार करू नका. शुभ रंग: पांढरा
कन्या राशीच्या लोकांना आठवड्याच्या पहिल्या दिवशी त्यांच्या कार्यक्षेत्रात फायदा होईल. या राशीतील काही लोक हे नातेवाईक आणि कौटुंबिक शुभ कार्यात सहभागी होतील, त्यांना त्या कामात आनंद मिळेल. तुम्हाला तुमचे प्रेम जीवन सुधारण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. नातेसंबंधात सत्य आणि प्रामाणिकपणा ठेवा. शुभ रंग: नारिंगी
अधिक वाचा : स्वस्तातील हनीमूनसाठी भारतातील या ठिकाणी जा
आज पद आणि अधिकाराची महत्त्वाकांक्षा विरोधाला जन्म देईल. समस्यांवर योग्य उपाय न मिळाल्याने मानसिक अस्वस्थता राहील. वर्तमानात केलेल्या प्रयत्नांचा लाभ भविष्यात मिळेल. म्हणूनच दुःखी होऊ नका फक्त तुमचे काम करत राहा. तुम्ही 100 टक्के गुण मिळवाल. तुमच्या संभाव्य चिंता वाढतील. आज तुमचा जोडीदारासोबतचा ताळमेळ काहीसा बिघडू शकतो. शुभ रंग: हिरवा
आजचा दिवस वृश्चिक राशीसाठी चांगला असेल. तुम्ही तुमचं लक्ष्य पूर्ण करण्याची योजना बनवणार. आजचा दिवस नोकरदार वर्गासाठी चांगला आहे. कार्यालयात कामात यश मिळेल. शुभ रंग - नारंगी
अधिक वाचा : दादा! sorry म्हणजे सॉरी नव्हे; काही तरी वेगळचं आहे हे प्रकरण
दैनंदिन कामात निष्काळजीपणा दाखवू नका. भूतकाळाच्या संदर्भात केलेले संशोधन फायदेशीर ठरेल. नवीन संपर्क ज्यांच्याशी झाले असतील त्याचा फायदा पुढील भविष्यात होईल. आज कोणताही मोठा निर्णय घेणे टाळा. तुमचे रोमँटिक जीवन चांगले चालले आहे. तुम्ही एकमेकांना उत्तम प्रकारे पूरक व्हाल. शुभ रंग: गुलाबी
आज नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत प्रतिकूलता होऊ शकते. वैवाहिक जीवनात एखाद्या गोष्टीवरून मतभेद निर्माण होतील. दिवसाच्या उत्तरार्धात अचानक पाहुण्यांच्या आगमनामुळे खर्चात वाढ होईल. शुभ रंग: निळा
अधिक वाचा : तुमचा लूक सुंदर बनवणारे Latest Blouse Designs
आजचा दिवस या राशीसाठी चांगला असेल. तुमची चिकाटी आणि सातत्य तुम्हाला व्यावसायिक आणि भावनिक पातळीवर अडथळे दूर करण्यात मदत करेल. नातेसंबंधांमध्ये विश्वास नसल्यामुळे थोडा त्रास होण्याची शक्यता आहे. आज वाहन, जमीन खरेदी करण्याचा योग आहे. तर नोकरी करणारे लोक आज एका ठिकाणांवरुन दुसऱ्या ठिकाणी जातील. शुभ रंग: पांढरा
अधिक वाचा : होळीसाठी कोकणात जाणाऱ्यांकरिता रेल्वेच्या स्पेशल ट्रेन
तुमच्या राशीचा स्वामी बृहस्पति पहिल्या चढत्या घरात मीन राशीत आहे आणि चंद्र स्वतःच्या राशीत उच्च स्थानी आहे. मुलांशी संबंधित समस्या सोडवण्यात आजचा दिवस जाईल. आज तुमचे जुने नाते उत्कटतेने विकसित होण्यास सुरुवात होईल आणि तुमचा त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलेल. शुभ रंग - पिवळा