Daily Horoscope : राशीभविष्य : सोमवार ४ जुलै २०२२, कसा जाईल आजचा दिवस

daily horoscope monday 4 july 2022 daily rashi bhavishaya in marathi : कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस आणि कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ रंग काय आहे या सर्वांची सविस्तर माहिती

daily horoscope monday 4 july 2022 daily rashi bhavishaya in marathi
Daily Horoscope : राशीभविष्य : सोमवार ४ जुलै २०२२  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • Daily Horoscope : राशीभविष्य : सोमवार ४ जुलै २०२२
  • जाणून घ्या कसा जाईल आजचा दिवस
  • कोणत्या राशीचे काय आहे आजचे भविष्य

daily horoscope monday 4 july 2022 daily rashi bhavishaya in marathi : कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस आणि कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ रंग काय आहे या सर्वांची सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा. जाणून घ्या मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या बारा राशींसाठी कसा असेल दिवस?

वाचा : धर्म-कर्म-भविष्यभविष्यात कायआध्यात्म

  1. मेष राशी भविष्य / Aries Horoscope Today: वरिष्ठांची आणि ज्येष्ठांची मर्जी संपादन करणे हिताचे. अनुभवींचे मार्गदर्शन लाभाचे. नियोजन करून काम केल्यास यशाची शक्यता वाढते हे लक्षात ठेवा. शुभ रंग : पांढरा
  2. वृषभ राशी भविष्य / Tauras Horoscope Today:  वेळ आणि पैसा यांचे व्यवस्थापन करणे हिताचे. आर्थिक नियोजन लाभाचे. आपली सामाजिक प्रतिष्ठा जपा आणि तुमच्याविषयीची विश्वासार्हता वाढेल असे वर्तन कराल तरच प्रगती कराल. शुभ रंग : हिरवा
  3. मिथुन राशी भविष्य / Gemini Horoscope Today: तब्येत जपा, स्वतःची आणि जवळच्या व्यक्तींची काळजी घ्या. क्षमता ओळखून आव्हाने स्वीकारा. रागावर नियंत्रण ठेवणे हिताचे. शुभ रंग : गुलाबी
  4. कर्क राशी भविष्य / Cancer Horoscope Today:  कामाच्या नियोजनावर भर द्या. मुख्य हेतू डोळ्यांपुढे ठेवून कार्यरत राहणे हिताचे. वाद टाळणे आणि कायदा पाळणे लाभाचे. शुभ रंग : पांढरा
  5. सिंह राशी भविष्य / Leo Horoscope Today: परिस्थितीशी आणि सहकाऱ्यांशी जुळवून घेणे हिताचे. वेळ पाहून निर्णय घेणे आणि अंमलात आणणे लाभाचे. आत्मविश्वास आणि क्षमतेचे तसेच वास्तवाचे भान राखणे महत्त्वाचे. शुभ रंग : केशरी
  6. कन्या राशी भविष्य / Virgo Horoscope Today: प्रगती होईल. आनंदी घटना घडतील. जवळच्यांना वेळ द्याल. स्वतःची क्षमता ओळखून नियोजन करून कामं केल्यास यश मिळेल. शुभ रंग : पिवळा
  7. तूळ राशी भविष्य / Libra Horoscope Today: दिवस मजेत जाईल. वेळ आणि पैसा यांचे नियोजन करणे महत्त्वाचे. जवळच्यांना वेळ द्याल. ज्येष्ठ आणि वरिष्ठ यांच्याशी जुळवून घ्याल. शुभ रंग : पांढरा
  8. वृश्चिक राशी भविष्य / Scorpio Horoscope Today: नियम आणि कायदे पाळणे आणि प्रलोभने टाळणे हिताचे. तब्येत जपा. आर्थिक नियोजनावर भर देणे फायद्याचे. शुभ रंग : लाल
  9. धनु राशी भविष्य / Sagittarius Horoscope Today: माणसं ओळखणं आणि माणसं जोडणं लाभाचं ठरेल. जिभेवर साखर आणि डोक्यावर बर्फ ठेवून वागणे फायद्याचे ठरेल. नियोजन हिताचे ठरेल. शुभ रंग : पिवळा
  10. मकर राशी भविष्य / Capricorn Horoscope Today: गोड बोलणे, मुद्देसूद बोलणे आणि मर्यादीत बोलणे ही त्रिसूत्री फायद्याची ठरेल. वाद टाळणे आणि स्वतःला जपणे फायद्याचे. शुभ रंग : जांभळा
  11. कुंभ राशी भविष्य / Aquarius Horoscope Today: प्रगती होईल, उत्साह वाढेल. कौतुक होईल. प्रतिष्ठा वाढेल. खर्च जपून करणे हिताचे. शुभ रंग : निळा
  12. मीन राशी भविष्य / Pisces Horoscope Today: नियोजन हिताचे. सावध राहणे लाभाचे. आर्थिक नियोजनावर भर देणे फायद्याचे. वाद टाळणे हिताचे. तब्येत जपा. शुभ रंग : गुलाबी

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी