Daily Horoscope,monday 20 March: 12 राशीतील 4 राशींना होणार आर्थिक लाभ; जाणून घ्या कसं असेल सोमवारचं राशीभविष्य

दैनिक राशी भविष्य   Daily Horoscope  20 March: सोमवार, 20 मार्च रोजी वृषभ आणि कन्या राशीच्या लोकांना  आनंदाची बातमी मिळेल.  कौटुंबिक शुभ कार्याचा आनंद मिळेल तसेच मकर राशीच्या लोकांना त्यांच्या मनाप्रमाणे लाभ मिळाल्याने आनंद होईल.  नोकरी, व्यवसाय आणि पैशाच्या बाबतीत तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या. 

Daily Horoscope,monday 20 March
Daily Horoscope : 12 राशीतील 4 राशींना होणार आर्थिक लाभ   |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • ग्रह तार्‍यांच्या प्रभावामुळे मिथुन राशीच्या लोकांची काहीतरी मौल्यवान गोष्ट मिळवण्याची इच्छा पूर्ण होईल.
  • वृषभ आणि कन्या राशीच्या लोकांना कौटुंबिक शुभ कार्याचा आनंद मिळेल
  • मकर राशीच्या लोकांना त्यांच्या मनाप्रमाणे लाभ मिळाल्याने आनंद होईल.

Daily Horoscope: सोमवारी चंद्राचा संचार शनीची राशीतील कुंभमध्ये होत आहे.  ग्रह-तार्‍यांच्या प्रभावामुळे मिथुन राशीच्या लोकांची काहीतरी मौल्यवान गोष्ट मिळवण्याची इच्छा पूर्ण होईल. धनु राशीच्या लोकांसाठी सांसारिक सुखांचा उपभोग घेण्याचे साधन वाढतील. 

मेष 

मेष राशीच्या काही लोकांना आजचा दिवस परोपकार करणारा ठरेल. कामाच्या ठिकाणी काही बदल होऊ शकतात, जे तुमच्यासाठी चांगले असतील. ज्यामुळे सहकाऱ्यांचा मूड खराब होऊ शकतो. पण तुम्ही तुमच्या चांगल्या वागण्याने वातावरण सामान्य करू शकाल. शुभ रंग -  पांढरा 

वृषभ 

या राशीच्या लोकांचा आज कुटुंबियांसोबत आनंदाचा काळ जाईल. तर काही जणांना आज  दुपारपर्यंत आनंदाची बातमी मिळेल. आरोग्याबाबत जागरूक राहण्याची गरज आहे. आज काही लोकांच्या घरी पाहुणे येण्याची शक्यता आहे. यामुळे घरातील वातावरण आनंदाचे राहील. शुभ रंग - निळा 

मिथुन

आजचा दिवस या राशीसाठी फायद्याचा असेल. वडिलांचा आशीर्वाद आणि उच्च अधिकार्‍यांच्या कृपेने मिथुन राशीच्या काही लोकांना कोणतीही मौल्यवान वस्तू किंवा संपत्ती मिळण्याची इच्छा पूर्ण होईल. कार्यक्षेत्रात अधिक व्यस्तता राहील आणि आज फालतू खर्च टाळावा लागेल. शुभ रंग - लाल 

कर्क 

या राशीतील काही लोकांना आज आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. राशीच्या स्वामीच्या 9व्या स्थानात गुरुचे संक्रमण अचानक मोठ्या प्रमाणात धनप्राप्ती होऊन धनाची स्थिती मजबूत करेल. व्यावसायिक योजनांना गती मिळेल आणि उत्पन्नाचे नवीन आणि सुरक्षित स्त्रोत निर्माण होतील. शुभ रंग - हिरवा 

सिंह 

सिंह राशीतील जे लोक हे राजकारणात आहेत, त्यांना राजकीय क्षेत्रात यश मिळण्याची शक्यता आहे. बहुतेक जण आपल्या मुलाप्रती असलेली जबाबदारीही पार पडतील. जे लोक व्यावसाय करत आहेत त्यांना आज यश मिळण्याची शक्यता आहे. तर नोकरी करणाऱ्या काही लोकांना उत्पन्नाचा नवीन स्रोत मिळू शकतो. आज काहींना तब्येतची समस्या असेल. शुभ रंग -गुलाबी 

कन्या 

कन्या राशीच्या लोकांना आज उद्योगधंद्यात त्यांच्या तत्परतेचा फायदा होईल. नातेवाईक आणि कौटुंबिक शुभ कार्यातून काहींना आनंद मिळेल. जर विपरीत परिस्थिती उद्भवल्यास रागावर नियंत्रण ठेवावे.  प्रेमींसाठी आजचा दिवस भारी असेल. तर विद्यार्थ्यांसाठीही आजचा दिवस चांगला असेल, करिअरच्या दृष्टीने नवीन मार्ग दिसेल. 

तुळ 

तूळ राशीच्या लोकांना आज शैक्षणिक आणि स्पर्धा क्षेत्रात विशेष यश मिळण्याची संधी आहे. अनेकांना आज उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळतील.  जे लोक भाषण करण्यात पटाईत आहेत त्यांच्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. त्यांच्या वक्तृत्वामुळे त्यांना सन्मान प्राप्त होईल. बहुतेकांना कामामुळे धावपळ करावी लागेल. तर बदलेल्या हवामानाचा परिणाम जाणवेल. प्रेमी लोकांसाठी आज महत्त्वाचा आहे. तर वैवाहिक जोडप्यासाठी आजचा दिवस आनंदाचा असेल. 

वृश्चिक

आज वृश्चिक राशीच्या लोकांची आर्थिक बाजू मजबूत होईल आणि धन, मान, प्रतिष्ठा, कीर्ती यात वाढ होईल. आज नोकरीच्या ठिकाणी रखडलेली कामे पूर्ण होतील आणि प्रियजनांशी भेट होईल. तुम्ही तुमच्या बोलण्यावर संयम ठेवला नाही तर तुम्हाला प्रतिकूल परिस्थितीला सामोरे जावे लागू शकते. शुभ रंग -पिवळा

धनु

धनु राशीच्या लोकांना आज घरगुती वस्तूंवर पैसे खर्च करावे लागतील. सांसारिक सुखाच्या साधनांमध्ये वाढ होईल.  कर्मचारी किंवा नातेवाईकामुळे तणाव वाढू शकतो. पैशाच्या व्यवहारात सावधगिरी बाळगा, अन्यथा पैसे अडकू शकतात. शुभ रंग  - तपकिरी

मकर

मकर राशीच्या लोकांना आज व्यापार क्षेत्रात अनुकूल नफा मिळाल्याने आनंद होईल. आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा मजबूत होईल. तर आज जे लोक व्यवसाय करत आहेत त्यातील काही लोक आपल्या व्यवसायात बदल करण्याचे नियोजन करतील. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस चांगला आहे.  स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना यश मिळेल. तर काहीजण  कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पडतील. शुभ रंग - जांभळा

कुंभ

राशीचा स्वामी शनीच्या प्रथम स्थानामुळे जीवन साथीदाराच्या अचानक शारीरिक त्रासामुळे धावपळ आणि जास्त खर्चाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. मालमत्तेची खरेदी-विक्री करताना त्या मालमत्तेच्या सर्व कायदेशीर बाबींचा गांभीर्याने विचार करावा. 

मीन

मीन राशीच्या लोकांचे वैवाहिक जीवन सुखकर राहील. आज जवळचा आणि दूरचा सकारात्मक प्रवास होऊ शकतो. व्यवसायात वाढत्या प्रगतीमुळे खूप आनंद मिळेल. विद्यार्थ्यांची मानसिक बौद्धिक भार दूर होईल. संध्याकाळी हिंडताना काही महत्त्वाची माहिती मिळू शकते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी