Daily Horoscope,25 March 2023 : शनिदेवाच्या कृपेने 5 राशींना आजचा ठरेल लकी; कोणत्या राशींना मिळेल धनलाभ जाणून घ्या आजचं राशीभविष्य

Daily Horoscope in marathi 25 March : शनिवार, 25 मार्च रोजी मेष, वृश्चिक, सिंह, धनु आणि तूळ राशीच्या लोकांना भाग्याचे तारे विशेष लाभ देणार आहेत. यासर्व राशीच्या लोकांना केवळ आर्थिक लाभच नाही तर करिअरच्या संदर्भात उत्कृष्ट संधीही मिळू शकतात. इतर राशींसाठी 25 मार्चचा दिवस कसा असेल हे जाणून घेऊ...

Daily Horoscope: Rashi Bhavishya 25 March 2023, Horoscope in Marathi
कोणत्या राशींना मिळेल धनलाभ जाणून घ्या आजचं राशीभविष्य   |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • यासर्व राशीच्या लोकांना केवळ आर्थिक लाभच नाही तर करिअरच्या संदर्भात उत्कृष्ट संधीही मिळू शकतात.
  • कोणत्या राशीच्या लोकांना भाग्याचे तारे विशेष लाभ देणार
  • शनिदेवाच्या कृपेने 5 राशींना आजचा ठरेल लकी

Daily Horoscope in marathi 25 March : शनिवार, 25 मार्च रोजी मेष, वृश्चिक, सिंह, धनु आणि तूळ  राशीच्या लोकांना भाग्याचे तारे विशेष लाभ देणार आहेत. यासर्व राशीच्या लोकांना केवळ आर्थिक लाभच नाही तर करिअरच्या संदर्भात उत्कृष्ट संधीही मिळू शकतात. इतर राशींसाठी 25 मार्चचा दिवस कसा असेल हे जाणून घेऊ...( Daily Horoscope: Rashi Bhavishya 25 March 2023, Horoscope in Marathi)

अधिक वाचा  : हे आहेत बॉलिवूडमधील अतिशहाणे कलाकार, झालेत ट्रोल

मेष  

या राशींसाठी आजचा दिवस भारी असणार आहे. जे लोक नोकरी करत आहेत आणि व्यावसाय करत आहेत, त्यांना अधिक लाभ होणार आहे. परंतु कोणता मोठा व्यवहार करत असाल तर आज तो व्यवहार सायंकाळ परत करू नका. तर काही लोकांना सरकारकडून विशेष सन्मान मिळण्याची शक्यता आहेत. शुभ रंग - व्हायलेट

अधिक वाचा  : पिवळी साडी नेसून भोजपुरी अभिनेत्रींने लावली आग

वृषभ

आज वृषभ राशीच्या लोकांना त्यांच्या नशिबाची साथ मिळेल.  आज अनेकांना तुम्हाला नवीन गोष्टी केल्यासारखे वाटेल. या राशीतील बहुतेकांना आज यश मिळेल. तर काहींचा प्रवास करण्याचा योग येईल. तर काहीजण कारण नसताना कायद्याच्या कचाट्यात सापडतील. तर घरातील वातावरण आनंदाचे राहील. या राशीतील अनेकांच्या इच्छा पूर्ण होतील. तर प्रेमी लोकांनासाठी आज यश मिळवून देणार दिवस आहे. शुभ रंग - आकाशी 

मिथुन 

 मिथुन राशीसाठीही शनिवारचा दिवस भारी असेल. अनेकांना आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. मित्रांशी सभ्यतेने वागा नाहीतर मैत्री तुटण्याची शक्यता आहे. आज अनेकांना त्याच्या आवडत्या गोष्टी करायला मिळतील. तर प्रेमी जोडप्यांसाठी आजचा विशेष असणार आहे. वैवाहिक जीवनासाठी आज आनंदाचा दिवस आहे. महत्वाच्या निर्णयात तुमच्या पत्नीचा सल्ला कामात येईल. शुभ रंग - लाल

अधिक वाचा  : पोरं अभ्यास करत नसतील तर पालकांनो करा या गोष्टी

कर्क 

कर्क राशीच्या लोकांनाही त्यांचं नशीब त्यांना साथ देत आहे. वैवाहिक आयुष्यात अनेकांना काही अडचणींचा सामना करावा लागेल. तर काही लोकांना तब्येतची समस्या जाणवेल. जे लोक नोकरी करत आहेत त्यांना आजचा दिवस चांगला जाणार आहे. तर व्यावसायकांना साठी आर्थिक लाभाचा दिवस आहे. नवीन व्यवहारात त्यांना मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. शुभ रंग - पिवळा

सिंह 

सिंह राशीच्या लोकांना आज खूप धावपळ करावी लागू शकते. आजचा दिवस अनेकांसाठी खूप व्यस्त असणार आहे, परंतु आपण धर्म, अध्यात्म आणि अभ्यासासाठी वेळ काढू शकतील. कामाच्या ठिकाणी वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामात अडथळा आणू शकतात आणि तुमचे काम बिघडू शकतात. विद्यार्थ्यांनी नवीन संधी शोधाव्या. व्यावसायिकांना आजच दिवस आर्थिक लाभ मिळवून देणारा आहे. तुमचा अडकलेला पैसा परत मिळेल. शुभ रंग - निळा 

अधिक वाचा  : उन्हाळ्यात पुण्यात फिरता येणारी ठिकाणं

कन्या 

कन्या राशीच्या लोकांनी या दिवशी कोणतेही काम करण्यापूर्वी प्रत्येक बाबतीत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. व्यावसाय करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे. कोणता मोठा व्यवहार करत असाल तर जाणकारांचा सल्ला घ्या. काहींच्या घरात आज वाद होण्याची शक्यता आहे. तुमचा जोडीदार तुमच्यावर संशय घेऊ शकतो. एकतर्फी प्रेम करणाऱ्यांनी आज प्रपोज केल्यास त्यांना प्रेम मिळण्याची शक्यता आहे. शुभ रंग -केशरी

तुळ 

आजचा दिवस या राशीतील लोकांसाठी लकी ठरेल. परंतु जे लोक व्यापारी आहेत, त्यांच्यासाठी आजचा दिवस त्रासदायक ठरेल. कारण वाद होण्याची शक्यता आहे. प्रेमी जोडप्यांना आजचा दिवस न विसरणारा असेल. कारण आज तुमच्या जोडीडाराकडून विशेष भेट मिळण्याची शक्यता आहे. जमीन- मालमत्तेवरुन वाद होण्याची शक्यता आहे. शुभ रंग - पिवळा 

अधिक वाचा  : तुमच्या या चुका खराब करतील ​लिव्ह-इन-रिलेशनशिप​

वृश्चिक 

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभ आहे आणि आज तुमची आर्थिक स्थिती मजबूत असेल. कुठेतरी अडकलेले पैसे मिळाल्यास अनेक रखडलेली कामे पूर्ण होतील. दिवसभर लाभाच्या संधी मिळतील. त्यामुळे प्रयत्न करत राहा. कुटुंबात सुख, शांती आणि स्थैर्य राहील आणि संबंध चांगले राहतील. शुभ रंग- गुलाबी 

धनु 

धनु राशीच्या लोकांना आजचा दिवस महत्त्वाचा असेल. प्रत्येक काम त्यांना सावधगिरीने करावे लागेल. तर जे लोक व्यापार करत त्यांना त्यांनी घेतलेल्या जोखीमेचा फायदा होईल. काहींना तब्येतच्या कारणामुळे आपला खिशा रिकामा करावा लागेल.  वाहन चालवत असताना काळजी घ्या. विवाहित जोडप्यांसाठी आजचा दिवस चांगला आहे, घरी पाहुणे येण्याची शक्यता आहे. शुभ रंग -राखाडी 

अधिक वाचा  : 2023 मधील नववधूंसाठी दागिन्यांचे ट्रेंड

मकर

मकर राशीच्या लोकांसाठी करिअर आणि आर्थिक बाबतीत आजचा दिवस सामान्य आहे. काहीजण कामामुळे व्यस्त असतील. ज्या लोकांना भागीदारीत व्यवसाय सुरू केला आहे त्यांना फायदा होणार आहे. व्यापारी लोकांना आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.प्रेमी लोकांनी आपल्या बोलण्यावर संयम ठेवावा.  सासरवासी बायकांना आपल्या सासू-सासऱ्याची सेवा करावी. त्यांना त्याचा फायदा होणार आहे. आज तुम्हाला तुमच्या मुलाच्या किंवा मुलीच्या करिअरबाबत मोठा निर्णय घेऊ शकतात. शुभ रंग - हिरवा 

अधिक वाचा  :  संसाराचा काडीमोड झाला तर असं रहा खूश

कुंभ

कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र राहील. आज आरोग्याची काळजी घ्या. आहाराविषयी काळजी घ्या नाहीतर तब्येत बिघडू शकते. व्यापर करणाऱ्या लोकांना आज धन लाभ होण्याची शक्यता आहे. मोठा व्यवहार तुमच्या बाजूने यशस्वी होईल. आज नवीन व्यक्ती तुमच्या जीवनात येईल. तुमचा अडकलेला पैसा आज परत येईल. यामुळे तुमची अडचण दूर होईल. शुभ रंग- आकाशी 

मीन

मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आर्थिक बाबतीत फायदेशीर राहील. व्यवसायात जोखीम पत्करण्याचे परिणाम आज फायदेशीर ठरतील. संयमाने आणि तुमच्या सौम्य वागणुकीने समस्या दुरुस्त करा आणि तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा. संकटात सापडलेल्या व्यक्तीला मदत केल्याने तुम्हाला फायदा होईल. शुभ रंग - केशरी

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी