Daily Horoscope,26 March 2023 : आज 'या' पाच राशींच्या नशीबाचे दरवाजे उघडणार; जाणून घ्या रविवारचा दिवस कसा असेल

Daily Horoscope,26 March 2023 : आज कर्क, सिंहसह अनेक राशींना धनलाभ होणार आहे. आज बहेतुक राशींचे आर्थिक स्थिती मजबूत राहणार आहे. रविवार 26 मार्चचा दिवस हा बारा राशींना लकी दिवस ठरेल. चला तर सविस्तरपणे आपण रविवारचं राशीभविष्य जाणून घेणार आहोत....

 Daily Horoscope: Rashi Bhavishya 26 March 2023
कोण-कोणाला पावणार खंडोबा देव; जाणून घ्या रविवारचं राशीभविष्य  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • रविवार 26 मार्चचा दिवस हा बारा राशींना लकी दिवस ठरेल?
  • आज कर्क, सिंहसह अनेक राशींना धनलाभ होणार आहे.
  • जाणून घ्या आजचं राशीभविष्य

Rashi Bhavishya 26 March 2023:  आज कर्क, सिंहसह अनेक राशींना धनलाभ होणार आहे. आज बहेतुक राशींचे आर्थिक स्थिती मजबूत राहणार आहे. रविवार 26 मार्चचा दिवस हा बारा राशींना लकी दिवस ठरेल. चला तर सविस्तरपणे आपण रविवारचं राशीभविष्य जाणून घेणार आहोत..... (daily Horoscope: Rashi Bhavishya 26 March 2023, Horoscope in Marathi)

अधिक वाचा  : मासिक पाळीच्या दरम्यान खाऊ नका ही फळं​

मेष 

आज मेष राशीसाठी भारी दिवस असेल. जर कोणी व्यावसायिक असेल त्यांना आज बहुणी करण्यास खूप वाट पाहावी लागेल.  एकंदरीत आजचा दिवस कमासाईसाठी साधारण असेल. कर्ज घेण्याचा विचार करत असेल तर आज तो निर्णय घेऊ नये. तर नोकर वर्गासाठी मध्यम असेल. विद्यार्थ्यांना आजचा दिवस मोलाचा सल्ला मिळवून देणारा ठरू शकतो.  शुभ रंग - लाल 

वृषभ

वृषभ राशीच्या लोकांनी आज घाई करणे टाळावे. आज घाईगडबडीत कोणतेही काम करू नका. अन्यथा तुमचे नुकसान होऊ शकते. जर घाईत निर्णय घेण्याची वेळ आली तर समजून-उमजून तो निर्णय घ्यावा. अडकलेली कामे सांयकाळापर्यंत पूर्ण होतील. शुभ रंग- राखाडी 

अधिक वाचा  : तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे फळांचा राजा

मिथुन 

आज या राशीतील काही लोकांना मेहनत करावी लागेल. परंतु मेहनत जास्त घेतली म्हणून निराश होण्याची गरज नाही कारण त्याचे चांगले फळ तुम्हाला मिळणार आहेत. आज काही लोकांना तब्येतीची कणकण जाणवेल. त्यामुळे साधरण अशक्तपणा वाटत असला तरी डॉक्टरकडे जावे. मुलांकडून तुम्हाला आनंदाची बातमी आद मिळू शकते. सायंकाळी कुटुंबियांसोबतचा वेळ आनंदाचा जाईल, तर काहींच्याघऱी पाहुणे येऊ शकतील. शुभ रंग - गुलाबी 

कर्क 

कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस उत्तम असणार आहे. कामात यश मिळण्यासाठी तुम्हाला थोडी जास्त मेहनत घ्यावी लागेल.  व्यावसायिकांना आजचा दिवस स्पर्धेचा राहील. परंतु दिवसाशेवटी कमाई चांगली होईल. महिलांना आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यावे. प्रेमी लोकांसाठी आजचा दिवस भारी असेल. परगावी असलेला आपला प्रिय व्यक्ती आज भेटू शकतो. शुभ रंग- केसरी 

अधिक वाचा  : लग्नाला उशिर कराल तर बाप बनण्यास होईल अडचण

सिंह 

आई-वडिलांचा आशीर्वाद या राशीच्या लोकांना आज मिळेल. आई-वडिलांच्या आशीवार्दामुळे अडकलेली कामं पूर्ण होतील. आज या राशीतील बहुतेकांची आर्थिक स्थिती चांगली असेल. प्रेमी लोकांनी आज आपल्या वागण्यावर नियंत्रण ठेवावे. ज्या लोकांचा मित्र परिवार जास्त आहे त्यांनी निरर्थक वादापासून दूर राहवे. नाहीतर काहीतरी समस्या तुमच्या दारावर येईल. व्यावसियकांनी आज मोठा करार करू नये. शुभ रंग- पांढरा. 

कन्या

या राशीतील अनेकांना आज कमाईचा किंवा उत्पन्नाचा नवा मार्ग मिळेल. आई-वडिलांच्या आशीर्वादामुळे तुमही अडचणींना मात देऊ शकाल. आज तुमचा अडकलेला पैसा मिळेल. तर कोही लोकांच्या पत्नीला आज शारीरिक कष्ट होऊ शकतात, त्यामुळे त्यांनी आप्लया पत्नीची काळजी घ्यावी. शुभ रंग - पिवळा 

अधिक वाचा  : टक्कल पडू नये यासाठी वापरा हे 10 सर्वोत्तम नैसर्गिक केस तेल

तुळ 

आज तुळ राशीतील लोकांसाठी अडचणीचा दिवस ठरेल. मित्र परिवार किंवा नातेवाईकांसोबत याचे वाद-विवाद होऊ शकतील. यामुळे आज आपण आपल्या जीभेवर नियंत्रण ठेवावे.  तर काहीजणांचा कामानिमित्त पळापळ असेल. या राशीतील विद्यार्थ्यांनी आपल्या अभ्यासाकडे लक्ष द्यावे. तर महिलांनी आपल्या पतीच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे. आज मोठा निर्णय घेण्याची वेळ अनेकांवर होणार आहे. अनेकांना आज धनलाभ होण्याची शक्यता आहे. शुभ रंग - निळा 

वृश्चिक

आज या राशीतील लोकांना त्यांचे नशीब साथ देणार आहे. एक चांगली बातमी काहीच्या कानी पडणार आहे. अनेकांचा आर्थिक अडचणीचा प्रश्न मिटणार आहे. तर बहुतेकांना आरोग्याच्या समस्या जाणवतील. त्यामुळे आपल्या आहाराकडे लक्ष द्यावे. महिलांनी आपल्या तब्येतसह मुलींच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे. कुटुंबातील महत्त्वाच्या निर्णयात आज तुमचं मत ऐकून घेतलं जाईल. शुभ रंग - आकाशी 

धनु

या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस उत्तम असेल. आर्थिक अडचणीचं संकट मिटल्यासारखं वाटेल. पैशांची गरज मिटल्याने मनावरचा बोझा कमी होऊन अनेकांची देणी फिटतील. दरम्यान आज प्रेमी लोकांनी संयमाने आपल्या प्रिय व्यक्तीशी बोलावे. आज कुटुंबातील सदस्यांसोबत बाहेर फिरायला जाण्याचा योग आहे. शुभ रंग- लाल 

मकर 

या राशीतील लोकांनी फालतू खर्चापासून वाचावे. आज अतिरिक्त पैसा खर्च होण्याची शक्यता आहे.  महिना अखेर असल्याने नोकरदारांना आर्थिक अडचण जाणवेल. तर काहींना आपला जुना मित्र भेटू शकतो. तर काहींना त्यांच्या व्यवसायात मोठा धनलाभ होण्याची शक्यता आहे. शुभ रंग - पांढरा 

अधिक वाचा  :  अरर्रर सारा खतरनाक! 8 गोष्टींवर लगाम लावत घटवलं 45 किलो वजन

कुंभ  

 कुंभ राशीतील लोकांनी आज आपल्या व्यक्तिमत्त्वावर लक्ष केंद्रीत करावे. तर विद्यार्थ्यांचं आपल्या अभ्यासापासून दुर्लंक्ष होऊ शकते.  नोकरदारांना आज आराम मिळण्याची शक्यता आहे. पंरतु घरी पाहुणे येण्याची शक्यता असल्याने महिलांचे कामे वाढणार आहेत. तर व्यावसियांकांना मोटा जॅकपॉट  लागण्याची शक्यता आहे. शुभ रंग - व्हेलवेट 

मीन

मीन राशीच्या लोकांचे नशीब साथ देईल आणि आज तुमची काही कामे जी अनेक दिवसांपासून लटकत आहेत ती पूर्ण होऊ शकतात. कोणत्याही वादावर तोडगा निघेल. आरोग्याशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागू शकते. आनंददायी व्यक्तिमत्व असल्याने, इतर लोक तुमच्याशी चांगले संबंध ठेवण्याचा प्रयत्न करतील. शुभ रंग - तपकिरी  

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी