Horoscope Rashifal 27 March 2023 : वैदिक ज्योतिषशास्त्रात एकूण 12 राशींचे वर्णन केले आहे. प्रत्येक राशीचा स्वामी एक ग्रह आहे. कुंडलीचे मूल्यमापन ग्रह आणि नक्षत्रांच्या हालचालीवरून केले जाते. राशीभविष्याच्या सहाय्याने, एखादी व्यक्ती त्याच्या भविष्याशी संबंधित चढ-उतार परिस्थितीचा आगाऊ अंदाज लावू शकते, जेणेकरून तो कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यास तयार असेल.
आज तुम्हाला कोणत्या परिस्थितीतून जावे लागेल, ते तुम्ही तुमच्या राशीनुसार जाणून घेता येते. आज 27 मार्च 2023 सोमवार आहे. सोमवार हा भगवान शंकराला समर्पित आहे. आज महादेवाची कोणत्या राशींवर आपली कृपा राहील हे जाणून घेऊ...
अधिक वाचा : तुमच्या या चुका खराब करतील लिव्ह-इन-रिलेशनशिप
या राशीतील लोकांसाठी आजचा दिवस उत्तम असणार आहे. या राशीतील अनेकांना धनलाभ संभवतो. अनेकांच्या कुटुंबात आज सोमवारचा दिवस आनंदाचा राहील.
परिवारासोबत कुठेतरी फिरण्याची योजना आखू शकतात. काही लोकांच्या घरात आज पाहुणे येणार असल्याने त्यांच्या घरात आनंदाचे वातावरण असेल. आपल्या पत्नीच्या आरोग्याची काळजी नवरोबांनी घ्यावी. काही लोकांचा आज खर्च वाढू शकतो. शुभ रंग - भगवा केशरी
अधिक वाचा : उन्हाळ्यात पुण्यात फिरता येणारी ठिकाणं
आजचा दिवस हा साधरण असेल. व्यापार किंवा व्यावसाय करणाऱ्या लोकांना आज नवी पद्धतीनमुळे फायदा होणार आहे. अनेकांना आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. काही वृषभ जातकांना त्यांच्या अनुभवानुसार फायदा होईल.
आज तुमच्या वाणीमध्ये मधुरता असेल. कौटुंबिक जीवन आनंदी राहील. वैवाहिक सुखात वाढ होईल.आज तुम्हाला लांबच्या प्रवासाला जाणे टाळावे लागेल. प्रवास आवश्यक असल्यास अपघात होण्याची शक्यता असल्याने वाहनांचा वापर करताना काळजी घ्या. शुभ रंग - हलका जांभळा
अधिक वाचा : 2023 मधील नववधूंसाठी दागिन्यांचे ट्रेंड
आज अनेकांना आत्मविश्वासाची कमतरता राहील. शांत राहा अनावश्यक राग टाळा. कुटुंबात शांतता राखण्याचा प्रयत्न करा. दूरसंचाराच्या माध्यमातून चांगली बातमी कळेल. आजपासून तुमचा पैसा वाचण्यास सुरुवात होईल. यामुळे गृहलक्ष्मी खूश राहील.
तुमच्या वैयक्तिक जीवनात येत असलेल्या समस्यातून आज सुटका होईल. तुम्ही तुमच्या पैशाचा काही भाग भविष्यासाठीही साठवून ठेवावा. जुन्या योजनेतून चांगला नफा मिळेल असे दिसते. शुभ रंग - पिवळसर
आशा आणि निराशाचे भाव आज मनात फिरु लागतील. शैक्षणिक कामात लक्ष द्या. अडचणी येऊ शकतात. जे जातक हे लेखन कार्यात आहेत, ते त्यांच्या कार्यात व्यस्त राहतील. तसेच बौद्धिक कार्यात व्यस्तता वाढेल.
आज अनेकांना काही नवीन यश मिळू शकते, ज्यामुळे त्यांचे मन दिवसभर प्रसन्न राहील. या राशीतील जे लोक नोकरीच्या शोधार्थ फिरत आहेत, त्यांना आज नोकरी मिळण्याची शक्यता आहे. शुभ रंग -सोनेरी
अधिक वाचा : संसाराचा काडीमोड झाला तर असं रहा खूश
मन अस्वस्थ होईल. स्वत:वर नियंत्रण ठेवा. कोणतीही मालमत्ता उत्पन्नाचे साधन बनू शकते. तुम्ही तुमच्या विरोधकांचा पराभव कराल. एकापेक्षा जास्त स्त्रोतांकडून उत्पन्न मिळेल. घरगुती गरजा पूर्ण होतील. या राशीतील विवाहित लोकांसाठी आजचा सोमवारचा दिवस हा भारी असे.
पती-पत्नी एकमेकांच्या भावना आज चांगल्या प्रकारे समजू शकतील. वडील आणि मुलांमधील नातं अधिक घट्ट होईल. पत्नीसोबत बाहेर फिरायला जाण्याचा निर्णय होऊ शकतो. धार्मिक कार्यात काही लोकं सहभाग घेतील. शुभ रंग -गुलाबी
अधिक वाचा : वजन वाढण्यासाठी ऑफिसमधल्या या सवयी ठरू शकतात कारणीभूत
मनात चढ-उतार असतील. वडिलांच्या तब्येतीची काळजी घ्या. जे उमेदवार नोकरी शोधत आहेत त्यांना त्यांच्या मित्राच्या मदतीने नोकरीच्या संधी मिळू शकते. तुम्हाला तुमच्या उत्पन्नानुसार घरखर्चाचे बजेट बनवावे लागेल, अन्यथा तुम्हाला नंतर अडचणींना सामोरे जावे लागू शकते. शुभ रंग - राखाडी
खूप आत्मविश्वास असेल, पण शांत राहण्याचा प्रयत्न करा. या राशीतील काही आज गुंतवणूक करण्याचा विचार करत आहेत, आणि जर ते मोठी गुंतवणूक करण्याचा विचार करत असतील. त्यांनी अनुभवी लोकांचा सल्ला जरूर घ्यावा. पालकांच्या आशीर्वादाने तुम्ही कोणतेही नवीन काम सुरू करू शकता, ज्याचा तुम्हाला नंतर फायदा होईल. व्यवसायाच्या निमित्ताने प्रवासाला जावे लागेल. हा प्रवास तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. शुभ रंग - जांभळा
अधिक वाचा : अरर्रर सारा खतरनाक! 8 गोष्टींवर लगाम लावत घटवलं 45 किलो वजन
या राशीतील लोकांसाठी आजचा दिवस आहे उत्तम आहे. त्यांना आर्थिक लाभ मिळवून देणारा आहे. परंतु काहींना आरोग्याच्या आणि चिंतेचा दिवस राहील. तर ज्या लोकांच्या घरात कौटुंबिक वाद चालू आहे , ते मिटू शकतात. तर प्रेमी लोकांनी आपल्या प्रेमाचा प्रस्ताव आपल्या घरच्यासमोर मांडल्यास होकार मिळण्याची शक्यता आहे. शुभ रंग - लाल
कुटुंबात धार्मिक कार्य करता येईल. कुटुंबात शांतता राखण्याचा प्रयत्न करा. बहीण-भावांचे सहकार्य मिळेल, आजचा दिवस खूप चांगला आहे. सोमवारचा दिवस या राशीतील लोकांसाठीही चांगला असेल. तुम्ही तुमच्या समजदारीने कामं व्यवस्थितपणे पार पाडाल.
तुमच्या मेहनतीने आणि समर्पणाने यश मिळेल.नोकरदार वर्गासाठी ही आजचा दिवस भारी आहे. कारण त्याच्या मोठ्या अधिकाऱ्यांकडून त्यांचे कौतुक केलं जाणार आहे. शुभ रंग - पांढरा
अधिक वाचा : लवकर वेट लॉस करण्यासाठी रताळं आहे फायदेशीर
मन प्रसन्न राहील, पण संयम ठेवा. आरोग्याबाबत सावध राहा.व्यावसायिकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. आठवड्याचा पहिला दिवस व्यापारी वर्गासाठी उत्तम आहे. त्यांना आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. नवीन गुंतवणुकीत पैसा अडकवण्याची शक्यता आहे.
ज्या लोकांचा पैसा कोणाकडे अडकला आहे त्यांना तो पैसा परत मिळू शकतो. दूर राहणारे प्रेमी लोक आज भेटू शकतात. वैयक्तिक बाबींमध्ये सावध राहावे लागेल. मित्रांसोबत हँग आउट करण्याची योजना आखू शकता. शुभ रंग - तपकिरी
मन शांत राहील, पण तरीही शांत रहा. कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घ्या. तुमचा आनंद आणि समृद्धी वाढल्याने तुमचे मन प्रसन्न राहील. या राशीतील लोक जे व्यावसाय करत आहेत ते आज आपला व्यवसाय विस्तारू शकतात. ज्या लोकांच्या मैत्रीमध्ये वाद झाले असतील तर त्यांचे वाद मिटू शकतात. जे लोकांचे विवाह जुळत नाहीत त्यांना आज नवीन प्रस्ताव येण्याची शक्यता आहे. प्रेमी लोकांचे प्रेम अजून घट्ट होणार, विश्वास वाढणार. तर नोकरदारासाठी आजचा दिवस थोडा त्रासदायक असेल. शुभ रंग- आकाशी
आज तुमचा दिवस चढ-उतारांनी भरलेला असेल. काही जुनाट आजारामुळे तुम्ही खूप चिंतेत असाल. आजचा दिवस अनेकांची चिंता वाढवणारा असला तरी अनेकांना त्यांच्या आवडत्या आणि नवीन व्यक्तींची भेट करून देणारा आहे. परंतु या राशीतील लोकांनी ही गोष्ट लक्षात ठेवावी की, कोणावर डोळे बंद करुन विश्वास ठेवू नये. आज घरातील कामासाठी अतिरिक्त खर्च होऊ शकतो. तर नोकदरांना आजचा दिवस आनंदाचा राहील. शुभ रंग - हिरवा