आजचे राशीभविष्य, जाणून घ्या आपले शनिवार 19 नोव्हेंबर 2022 चे राशीभविष्य

Daily Horoscope, Saturday 19 November 2022 Horoscope, Today Horoscope in Marathi, Rasheebhavishya in Marathi, Rashibhavishya in Marathi : कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस आणि कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ रंग काय आहे याची सविस्तर माहिती

Daily Horoscope
आजचे राशीभविष्य, जाणून घ्या आपले शनिवार 19 नोव्हेंबर 2022 चे राशीभविष्य  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • आजचे राशीभविष्य, जाणून घ्या आपले शनिवार 19 नोव्हेंबर 2022 चे राशीभविष्य
  • कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस
  • कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ रंग काय आहे

Daily Horoscope, Saturday 19 November 2022 Horoscope, Today Horoscope in Marathi, Rasheebhavishya in Marathi, Rashibhavishya in Marathi : कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस आणि कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ रंग काय आहे याची सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा. जाणून घ्या मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या 12 राशींसाठी कसा असेल आजचा दिवस?

धर्म-कर्म-भविष्य । आध्यात्म । भविष्यात काय

  1. मेष राश‍ी भविष्य / Aries Horoscope Today: बुद्धीचा वापर कराल तर प्रगती कराल. परिस्थितीचा अंदाज घेऊन निर्णय घेणे हिताचे. राजकारणात असलेल्यांसाठी शुभ दिन. यथाशक्ती दानधर्म करणे हिताचे. शुभ रंग : लाल आणि पिवळा
  2. वृषभ राश‍ी भविष्य / Tauras Horoscope Today: नोकरी करणाऱ्यांसाठी चांगला दिवस. वरिष्ठांच्या सूचना नीट समजून घेऊन त्यांचे पालन करा. समोरच्यांना आदर करा, प्रेमात यशस्वी व्हाल. शुभ रंग : पांढरा आणि आकाशी
  3. मिथुन राश‍ी भविष्य / Gemini Horoscope Today: नोकरीत प्रगतीचा योग आहे. अविवाहितांसाठी लग्न जुळून येण्याचा योग आहे. लग्न झाले असेल तर मुल बाळ असेल त्यांच्या आयुष्यात शुभकार्य घडेल आणि त्यातून तुम्हाला आनंद होईल. शुभ रंग : हिरवा आणि आकाशी
  4. कर्क राश‍ी भविष्य / Cancer Horoscope Today: दानधर्म करा आणि गरजूंना मदत करा. दिवस चांगला जाईल. प्रगती होईल. रखडलेली कामं पूर्ण होतील. थोडी हुशारी आपल्यासाठी मोठा लाभ घेऊन येईल. शुभ रंग : लाल आणि पिवळा 
  5. सिंह राश‍ी भविष्य / Leo Horoscope Today: आर्थिक प्रगती होईल. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांची साथ लाभेल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. राजकारणात प्रगती होईल. दिवस उत्तम आहे. शुभ रंग : लाल आणि केशरी
  6. कन्या राश‍ी भविष्य / Virgo Horoscope Today: कौटुंबिक पातळीवर आनंदाची बातमी समजेल. दिवस मजेत जाईल. तब्येत उत्तम राहील. आर्थिक प्रगती होईल. शुभ रंग : हिरवा आणि आकाशी
  7. तूळ राश‍ी भविष्य / Libra Horoscope Today: आर्थिक प्रगतीचा योग आहे. कर्क आणि मीन राशीच्या नागरिकांचे सहकार्य लाभेल. अडचणींतून हुशारीने मार्ग काढाल. कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील. शुभ रंग : लाल आणि केशरी
  8. वृश्चिक राश‍ी भविष्य / Scorpio Horoscope Today: व्यवसायात आव्हानांचा हुशारीने सामना करावा लागेल. नोकरीत प्रगतीचा योग आहे. कर्क आणि मीन राशीच्या नागरिकांचे सहकार्य लाभेल. शुभ रंग : पिवळा आणि लाल
  9. धनु राश‍ी भविष्य / Sagittarius Horoscope Today: दिवस चांगला आहे. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. पण त्यांच्या सूचनांचे समजून घेऊन पालन करणे हिताचे. आर्थिक प्रगती होईल. आर्थिक लाभ होईल. शुभ रंग : जांभळा आणि केशरी
  10. मकर राश‍ी भविष्य / Capricorn Horoscope Today: आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी महत्त्वाची वेळ. व्यवसायाबाबत महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील. गायीला घास भरवा. प्राण्यांची काळजी घेणे आणि गरजूंना मदत करणे हिताचे. लोकांशी प्रेमाने आदराने बोलाल तर त्यांचे सहकार्य मिळवू शकाल. प्रगती होईल. शुभ रंग : निळा आणि आकाशी
  11. कुंभ राश‍ी भविष्य / Aquarius Horoscope Today: विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा दिवस. वेळेचे नियोजन करून हुशारीने काम केल्याने फायदा होईल. शुभ रंग : हिरवा आणि केशरी
  12. मीन राश‍ी भविष्य / Pisces Horoscope Today: प्रगती होईल. वाद टाळा. शब्द जपून वापरणे हिताचे. अन्नदान करणे लाभाचे. शुभ रंग : हिरवा आणि केशरी

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी